Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»महाराष्ट्र»Narmada Purana Katha Nirupan Sohala : नर्मदेच्या तीरी नव्हे; चिखलीतच अवतरली नर्मदामाईची भक्तिधारा
महाराष्ट्र

Narmada Purana Katha Nirupan Sohala : नर्मदेच्या तीरी नव्हे; चिखलीतच अवतरली नर्मदामाईची भक्तिधारा

नर्मदा पुराणातील माहात्म्य, नर्मदाष्टकाचा स्वर आणि ‘नर्मदे हर’च्या जयघोषाने जागृत हनुमान मंदिराचा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला
Vinayak LandeBy Vinayak LandeAugust 25, 2026Updated:August 25, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
file 00000000cf0c820897f3e8116b9f9256 1
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Narmada Purana Katha Nirupan Sohala : चिखली : नर्मदेच्या तीरी नव्हे; चिखलीतील राऊतवाडीतच नर्मदामाईच्या भक्तीची अविरत धारा वाहू लागली. नर्मदा पुराणातील माहात्म्य, नर्मदाष्टकाचा स्वर आणि ‘नर्मदे हर’च्या जयघोषाने जागृत हनुमान मंदिराचा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला; नर्मदा पुराण कथा निरूपण सोहळ्याचा उत्साहात प्रारंभ झाला.

Narmada Purana Katha Nirupan Sohala : नर्मदेच्या तीरी नव्हे; चिखलीतच अवतरली नर्मदामाईची भक्तिधारा
Narmada Purana Katha Nirupan Sohala : नर्मदेच्या तीरी नव्हे; चिखलीतच अवतरली नर्मदामाईची भक्तिधारा
नर्मदामाईच्या नामघोषाने चिखलीतील राऊतवाडी भक्तिरसात न्हाऊन निघाली; नर्मदा पुराणाच्या अमृतकथेने भाविक मंत्रमुग्ध झाले. नर्मदामाहात्म्याच्या निरूपणातून परिक्रमेचे रोमांचकारी अनुभव उलगडताच उपस्थित भाविक भारावून गेले.
Narmada Purana Katha Nirupan Sohala : नर्मदेच्या तीरी नव्हे; चिखलीतच अवतरली नर्मदामाईची भक्तिधारा
Narmada Purana Katha Nirupan Sohala : नर्मदेच्या तीरी नव्हे; चिखलीतच अवतरली नर्मदामाईची भक्तिधारा
कथा सोहळ्याचे आयोजक सुनीलराव वायाळ व शारदाताई वायाळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. हभप ज्योतीताई इंगळे यांनी स्वरचित नामगजर व आरती सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. निलेश इंगळे व सोनल इंगळे या दाम्पत्याच्या हस्ते विधिवत व्यासपीठ पूजन, ग्रंथपूजन व दीपपूजन करण्यात आले.
कथा श्रवणासाठी उपस्थित विनायक लांडे, साहेबराव आहेर, बंकटसिंग शिहरे व दिगंबर आहेर यांनी सादर केलेले नर्मदाष्टक व नर्मदा भजन लक्षवेधी ठरले.
यावेळी कथा निरूपण करताना मिलिंद महाराज चवंडके म्हणाले, भगवान व्यासांनी ६७ हजार ७०० श्लोकांमधून नर्मदेचे माहात्म्य वर्णन केले आहे. आनंददायी, धर्मदायी, पुण्यदायी आणि मोक्षदायी नर्मदामाईचे मनोहारी चरित्र मार्कंडेय मुनींच्या शब्दांतून पुराणात मांडण्यात आले आहे. नर्मदा पुराणाचे श्रवण करताना प्रत्यक्ष नर्मदामाई आपल्या भेटीला आल्याची अनुभूती मिळते.
प्रत्येकाच्या अंत:करणात नर्मदेचे शिवमयी आणि शक्तिमय रूप प्रतिष्ठित व्हावे, हाच कथा आयोजनामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. नर्मदा चरित्र अत्यंत पावन असून ते मनुष्याला पावन करणारे आणि दोष-पापांपासून मुक्त करणारे आहे. सप्त कल्पांचा क्षय झाल्यानंतरही जी अस्तित्वात राहते, ती ‘न मृता, सदा अक्षय’ नर्मदा आहे, असे त्यांनी सांगितले.
मिलिंद महाराज चवंडके यांनी नर्मदेच्या पायी परिक्रमेतील आपले अनुभव कथन केले. त्यांच्या अनुभवांनी उपस्थित भाविक अक्षरशः भारावून गेले; अनेकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.
कार्यक्रमास केशवराव बाहेकर, शेषराव महाराज देशमुख, प्रमोदिनी वडे, कावेरी लोखंडे, उषाताई पाटील, संध्याताई कपाळे, वनिता जवंजाळ, कासाबाई पवार, पुष्पाताई भुतेकर, दुर्गाताई सावके यांच्यासह स्त्री-पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Chikhli Narmada Purana Katha Nirupan Sohala NarmadaKatha NarmadaMahatmya NarmadaPurana
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026

Narmada Purana Katha Chikhli : ‘नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !

September 1, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.