Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»FFS Digital Fertilizer Distribution System : शेतकऱ्यांची आता खतासाठी धावपळ नको; मोबाईलवरच साठा पाहा, खत आरक्षित करा
अहिल्यानगर

FFS Digital Fertilizer Distribution System : शेतकऱ्यांची आता खतासाठी धावपळ नको; मोबाईलवरच साठा पाहा, खत आरक्षित करा

FFS Digital Fertilizer Distribution System : शेतकऱ्यांची आता खतासाठी धावपळ नको; मोबाईलवरच साठा पाहा, खत आरक्षित करा
Vinayak LandeBy Vinayak LandeAugust 20, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260820 WA0016
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

FFS Digital Fertilizer Distribution System : अहिल्यानगर : खतासाठी आता शेतकऱ्यांना दुकानांच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. ‘एफएफएस’ डिजिटल प्रणालीमुळे मोबाईलवरच खताचा उपलब्ध साठा पाहून पसंतीचे केंद्र निवडता येणार असून, आवश्यक खताचे आरक्षणही करता येणार आहे.

FFS Digital Fertilizer Distribution System
FFS Digital Fertilizer Distribution System
शेतकऱ्यांना आवश्यक ते खत पारदर्शक व सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या ‘Framework for Fertilizer Sale (FFS)’ डिजिटल प्रणालीची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.
प्रणालीच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची विशेष आढावा बैठक झाली. यावेळी खत नियोजन, ‘FFS’ ॲपची कार्यपद्धती आणि तंत्रज्ञानाधारित पारदर्शक खत वितरण व्यवस्था याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आधुनिक व पारदर्शक खत वितरणासाठी FFS ॲपचा जास्तीत जास्त वापर करून आवश्यक खतांचे आरक्षण करावे, तसेच ऐन हंगामात होणारी गैरसोय टाळावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले. बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे, विविध रासायनिक खत उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संघटनेचे प्रतिनिधी छबुराव हराळ यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना नेमका काय फायदा?

या डिजिटल प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या सातबारा व पीक नोंदीनुसार जमिनीच्या क्षेत्रफळावर आधारित आवश्यक खताचे प्रमाण सुचविले जाणार आहे. यामध्ये युरिया, डीएपी, एनपीकेएस आदी खतांची पिकाच्या गरजेनुसार शिफारस होणार असल्याने अनावश्यक खत खरेदी टाळता येऊन उत्पादन खर्चात बचत होणार आहे.
विशेष म्हणजे, शेतकरी दुकानात जाण्यापूर्वीच अधिकृत कृषी सेवा केंद्रांवरील उपलब्ध खतसाठा (Live Inventory) पाहून आपल्या पसंतीचे केंद्र निवडू शकतो. ॲपवर आरक्षण केल्यानंतर मिळणारा डिजिटल QR कोड e-PoS मशीनवर स्कॅन करून खत घेता येणार आहे. शेतकरी स्वतः किंवा अधिकृत प्रतिनिधीमार्फत तीन दिवसांच्या आत खत खरेदी करू शकणार आहे.

६५ हजार मेट्रिक टनांहून अधिक खतसाठा

जिल्ह्यात सध्या ६५ हजार मेट्रिक टनांपेक्षा अधिक खतांचा मुबलक साठा उपलब्ध असून खताची टंचाई भासण्याची शक्यता नसल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. खत विक्री परवान्यांचे अद्ययावतीकरण पूर्ण झाले असून उर्वरित प्रकरणांतील तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले.
खत वितरणात पारदर्शकता राहण्यासाठी गोदामातील प्रत्यक्ष साठा आणि e-PoS वरील डिजिटल साठा नियमितपणे अद्ययावत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.
Ahilyanagar Farmers FFS FFS Digital Fertilizer Distribution System
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026

Narmada Purana Katha Chikhli : ‘नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !

September 1, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.