Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Ahilyanagar News : एलसीबीचा स्ट्राईक; बार-दुकान फोडणारी टोळी जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त
अहिल्यानगर

Ahilyanagar News : एलसीबीचा स्ट्राईक; बार-दुकान फोडणारी टोळी जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

हॉटेल निलायम बार येथे अज्ञात चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून ३ लाख सहा हजार १९० रुपये किमतीची विदेशी दारू, सिगारेट व सीसीटीव्ही डीव्हीआर चोरून नेला होता.
Vinayak LandeBy Vinayak LandeMay 16, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260516 WA0010
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Ahilyanagar News : अहिल्यानगर : संगमनेर परिसरात बिअर बार व मद्यदुकाने फोडणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड करत मोठे यश मिळविले आहे. या कारवाईत ५ गुन्हे उघडकीस आणून ५ लाख ५५ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

https://jansattatimes.com/wp-content/uploads/2026/05/VID-20260516-WA0011.mp4
संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात कलम ३०३ (२), ३३१(४) अन्वये ३ मे २०२६ रोजी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात फिर्यादी किशोर बाळाजी डोके (रा. खंदरमाळवाडी, ता. संगमनेर) यांच्या हॉटेल निलायम बार येथे अज्ञात चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून ३ लाख सहा हजार १९० रुपये किमतीची विदेशी दारू, सिगारेट व सीसीटीव्ही डीव्हीआर चोरून नेला होता.
या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे यांच्यासह पोलीस अंमलदार गणेश लोंढे, विजय पवार, फुरकान शेख, बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डिले, अमृत आढाव, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत व चालक महादेव भांड यांचे पथक तयार करण्यात आले.
पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे हा गुन्हा हसन हमजा कुट्टी (रा. नाशिक) व त्याच्या साथीदारांनी केल्याचे निष्पन्न केले. त्यानुसार पोलिसांनी नाशिक येथील म्हाडा बिल्डींग, वडाळा परिसरात सापळा रचून आरोपी हसन हमजा कुट्टी, आकाश सचिन सूर्यवंशी, मेहताब गुलाम रसुल अन्सारी यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी त्यांचा साथीदार बंटी दास (रा. झारखंड) हा फरार असल्याचे सांगून गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपींकडून अधिक चौकशी केली असता चोरीचा माल नाशिक जिल्ह्यातील पळसे येथील हॉटेल लकी बार अँड रेस्टॉरंटचे चालक किरण रामदास उगले व विवेक अरुण उगले यांना चोरीचा असल्याचे सांगून विकल्याचे उघड झाले. तसेच विवेक उगले याने चोरीसाठी वाहन उपलब्ध करून दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी किरण रामदास उगले याला ताब्यात घेतले.
या कारवाईत आरोपींकडून ४ लाख ५ हजार १६० रुपये किमतीची विदेशी दारू, १ लाख ५० हजार रुपये किमतीची टाटा इंडिका कार तसेच कटर, मंकी मास्क, एअर पिस्टल, स्क्रू ड्रायव्हर असा एकूण ५ लाख ५५ हजार १६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तपासात आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस आले असून अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील एकूण ५ गुन्हे त्यांच्या नावावर निष्पन्न झाले आहेत. पुढील तपास घारगाव पोलीस ठाणे करीत आहे.
Ahilyanagar News Crime LCB Police Sangamner
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026

Narmada Purana Katha Chikhli : ‘नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !

September 1, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.