Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»महाराष्ट्र»Simhastha Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ‘फंडिंग पॅकेज’; आखाड्यांना थेट ५ कोटी
महाराष्ट्र

Simhastha Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ‘फंडिंग पॅकेज’; आखाड्यांना थेट ५ कोटी

Simhastha Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ‘फंडिंग पॅकेज’; आखाड्यांना थेट ५ कोटी
Vinayak LandeBy Vinayak LandeMay 13, 2026Updated:May 14, 2026No Comments3 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260513 WA0006
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Simhastha Kumbhmela : मुंबई : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेत प्रति आखाडा ५ कोटी रुपये निधी देण्याची घोषणा केली. कुंभमेळ्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, तसेच आखाड्यांच्या जमिनी अधिग्रहित झाल्यास मोबदला किंवा पर्यायी जमीन दिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Simhastha Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ‘फंडिंग पॅकेज’; आखाड्यांना थेट ५ कोटी
Simhastha Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ‘फंडिंग पॅकेज’; आखाड्यांना थेट ५ कोटी
सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व १३ आखाड्यांचे महंत उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,” कुंभमेळ्याच्या आयोजनात साधू, महंत यांनी दिलेल्या सूचना अत्यंत महत्त्वाच्या असून त्यांच्या मार्गदर्शनातूनच कुंभमेळ्याचे भव्य-दिव्य आयोजन करण्यात येईल. आखाड्यांना आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून वीज देयकांची अदायगी कुंभमेळा प्राधिकरणामार्फत करण्यात येईल. तसेच शासकीय कामासाठी आखाड्यांची जमीन अधिग्रहित झाल्यास मोबदला किंवा पर्यायी जमीन देण्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केली.”
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, “पुढील वर्षीचा कुंभमेळा हा केवळ एका वर्षापुरता नसून पुढील १२ वर्षांसाठी दीर्घकालीन नियोजन करून स्थायी स्वरूपाची विकासकामे केली जात आहेत. नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात अध्यात्मपूरक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न असून कुंड, रामकाल पथ, मंदिर आणि गुफा यांचे जीर्णोद्धार सुरू आहे. त्र्यंबकेश्वर हे देशातील अत्यंत महत्त्वाचे ज्योतिर्लिंग असून गोदावरीच्या उगमस्थानी होणाऱ्या या कुंभमेळ्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. भाविकांसाठी त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात ‘कॉरिडॉर’ उभारण्यात येणार असून आरोग्य व्यवस्थेचा बृहत आराखडाही तयार करण्यात आला आहे. दरम्यान, मागील कुंभमेळ्याच्या तुलनेत यावेळी गोदावरी नदीचे अधिक स्वच्छ स्वरूप दिसेल, असे सांगत नदी स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणावर काम सुरू असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

कुंभमेळ्याच्या सुरक्षेत तडजोड नको : उपमुख्यमंत्री शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुंभमेळ्याच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट केले. भाविकांची सुरक्षा, सुविधा आणि गर्दी नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
सध्या कुंभमेळ्यासाठी ३७७ एकर जमीन आरक्षित करण्यात आली असून आखाड्यांनी अतिरिक्त जमिनीची मागणी केल्याने शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.

६६५ कोटींचा त्र्यंबकेश्वर दर्शन पथ महाप्रकल्प

त्र्यंबकेश्वर येथे दर्शन पथ प्रकल्पासाठी एकूण रुपये ६६५ कोटी खर्च अपेक्षित असून अखंड दर्शनासाठी एकेरी मार्ग प्रणाली राबवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात रुपये २७५ कोटी आणि दुसऱ्या टप्प्यात रुपये ३९० कोटींची कामे होणार आहेत. या प्रकल्पात ९ हजार भाविकांची क्षमता असलेले ‘शिव दर्शन संकुल’, वातानुकूलित हॉल, एलईडी स्क्रीन, ५ मिनिटांत आपत्कालीन निर्गमन क्षमता आणि एआय आधारित गर्दी व्यवस्थापनाची सुविधा असणार आहे. पारंपरिक मराठा शैलीतील काळ्या पाषाणातील बांधकामामुळे त्र्यंबकेश्वरचा धार्मिक व सांस्कृतिक वैभवपूर्ण चेहराही अधिक खुलणार आहे.
Administration Devendra Fadanvis Eknath Shinde Goverment Mumbai Nashik Simhastha Kumbhmela
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Bakri Eid २०२६ : ‘बकरी ईद’चा सण उत्साहात पण नियमांच्या चौकटीतच; जिल्हाधिकाऱ्यांचा स्पष्ट इशारा

May 22, 2026

Cheque Bounce : चेक बाऊन्स प्रकरणी कठोर निकाल; महिलेला तुरुंगवास, लाखोंची नुकसानभरपाई

May 20, 2026

Crime : अहिल्यानगर हादरलं; पुतण्याचा खून करून घर साफ; २४ तासांत गुन्ह्याचा पर्दाफाश

May 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Bakri Eid २०२६ : ‘बकरी ईद’चा सण उत्साहात पण नियमांच्या चौकटीतच; जिल्हाधिकाऱ्यांचा स्पष्ट इशारा

May 22, 2026

Cheque Bounce : चेक बाऊन्स प्रकरणी कठोर निकाल; महिलेला तुरुंगवास, लाखोंची नुकसानभरपाई

May 20, 2026

Crime : अहिल्यानगर हादरलं; पुतण्याचा खून करून घर साफ; २४ तासांत गुन्ह्याचा पर्दाफाश

May 17, 2026

Ahilyanagar News : एलसीबीचा स्ट्राईक; बार-दुकान फोडणारी टोळी जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

May 16, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.