Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»महाराष्ट्र»Ashtavinayak Temple : अष्टविनायक दर्शनाला ब्रेक; मोरगाव-थेऊर-सिद्धटेक ९ जूनपर्यंत बंद
महाराष्ट्र

Ashtavinayak Temple : अष्टविनायक दर्शनाला ब्रेक; मोरगाव-थेऊर-सिद्धटेक ९ जूनपर्यंत बंद

Ashtavinayak Temple : अष्टविनायक दर्शनाला ब्रेक; मोरगाव-थेऊर-सिद्धटेक ९ जूनपर्यंत बंद
Vinayak LandeBy Vinayak LandeMay 11, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260511 WA0011
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Ashtavinayak Temple : पुणे : अष्टविनायक विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या जतन-संवर्धन व दुरुस्ती कामांमुळे मोरगावचे मयुरेश्वर, थेऊरचे चिंतामणी आणि सिद्धटेकचे सिद्धिविनायक मंदिर ही मंदिरे ९ जून २०२६ पर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान या कालावधीत मंदिरातील नित्यपूजा व धार्मिक विधी नियमित सुरू राहणार, मात्र भाविकांना प्रत्यक्ष दर्शनासाठी प्रवेश मिळणार नाही, असे पुरातत्त्व विभागाने स्पष्ट केले आहे.

अष्टविनायक मंदिरापैकी तीन मंदिरांचे जतन, देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामांसाठी चिंचवड देवस्थान ट्रस्टने शासनाचे आभार मानले आहेत. सध्या मोरगाव, थेऊर व सिद्धटेक येथे मुख्य मंदिर तसेच मंदिर परिसरातील संवर्धन व दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर आहेत.
पुरातत्त्व विभागाच्या नियोजनानुसार मंदिरांचा मुख्य गाभारा व सभामंडप यांचे पौराणिक स्वरूप जपत सुबक दगडी बांधकामाद्वारे संवर्धन करण्यात येणार आहे. मात्र, या कामादरम्यान भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती झाल्यास कामात अडथळा निर्माण होण्याची तसेच कामाचा कालावधी वाढण्याची शक्यता असल्याने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंदर्भात पुरातत्त्व विभागाच्या संचालकांनी सह धर्मादाय आयुक्त, पुणे विभाग यांच्याकडे विनंती अर्ज सादर केला होता. त्यानंतर पुरातत्त्व विभाग, मंदिर प्रशासन, पुजारी वर्ग आणि ग्रामस्थ यांचे म्हणणे ऐकून घेत ७ मे २०२६ रोजी सह धर्मादाय आयुक्तांनी मंदिर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सह धर्मादाय आयुक्तांच्या सूचनेनुसार चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळानेही मंदिर बंद ठेवण्याचा ठराव मंजूर केला असून ८ मे २०२६ रोजी संबंधित ठिकाणी ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेऊन याबाबत माहिती देण्यात आली.
या कालावधीत मंदिरांमध्ये नित्य पूजाअर्चा व धार्मिक विधी नियमित सुरू राहणार आहेत. मात्र भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश किंवा प्रत्यक्ष दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार नाही. मंदिरांचे पुजारी, बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी, कर्मचारी व विश्वस्त यांच्याशिवाय अन्य कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Administration Ahilyanagar Ashtavinayak Temple Department of Archaeology Devotee Pune
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026

Narmada Purana Katha Chikhli : ‘नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !

September 1, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.