Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»महाराष्ट्र»Maharashtra Rain Alert : राज्यात वादळी पावसाचा अलर्ट; शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
महाराष्ट्र

Maharashtra Rain Alert : राज्यात वादळी पावसाचा अलर्ट; शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

Maharashtra Rain Alert : राज्यात वादळी पावसाचा अलर्ट; शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
Vinayak LandeBy Vinayak LandeMarch 27, 2026Updated:March 27, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260327 WA0013
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Maharashtra Rain Alert : अहिल्यानगर : हवामान विभागाने वर्तवलेल्या भाकितानुसार राज्यात आठवडाभर आभाळी हवामान राहणार आहे. तसेच ३० व ३१ मार्च रोजी राज्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. हा पाऊस प्रामुख्याने कर्नाटक व तेलंगणा सीमेलगत असलेल्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील सीमावर्ती भागांमध्ये राहण्याची शक्यता आहे.

Maharashtra Rain Alert : राज्यात वादळी पावसाचा अलर्ट; शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
Maharashtra Rain Alert : राज्यात वादळी पावसाचा अलर्ट; शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
३० मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन विजाच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. उर्वरित विदर्भात देखील हवामानात बदल दिसू शकतो. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही. ३१ मार्च रोजी देखील राज्याच्या काही भागांमध्ये या हवामानाचा परिणाम दिसू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

शेतीची कामे नियोजित करावी : कृषी विभाग

शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

PM Surya Ghar Yojana : मोफत वीजेच्या दिशेने महाराष्ट्राची झेप; देशात अव्वल कामगिरी

June 2, 2026

LPG prices : महागाईचा स्फोट! एलपीजी दर दुप्पट; हॉटेल व्यवसाय अडचणीत

June 1, 2026

Rain Alert : मेघगर्जना, वादळी वारे अन् पाऊस; ३ जूनपर्यंत सावध राहा

May 31, 2026
Leave A Reply Cancel Reply

PM Surya Ghar Yojana : मोफत वीजेच्या दिशेने महाराष्ट्राची झेप; देशात अव्वल कामगिरी

June 2, 2026

LPG prices : महागाईचा स्फोट! एलपीजी दर दुप्पट; हॉटेल व्यवसाय अडचणीत

June 1, 2026

Rain Alert : मेघगर्जना, वादळी वारे अन् पाऊस; ३ जूनपर्यंत सावध राहा

May 31, 2026

Ahilyanagar News : ‘बालविवाह मुक्त’ अहिल्यानगरकडे दमदार वाटचाल; प्रशासनाच्या कारवाईमुळे ५५ विवाह रोखले

May 26, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.