Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Petrol – Diesel : ‘हा’ नियम मोडला तर थेट गुन्हा; जिल्हादंडाधिकाऱ्यांचा पेट्रोल पंप चालकांना कडक इशारा
अहिल्यानगर

Petrol – Diesel : ‘हा’ नियम मोडला तर थेट गुन्हा; जिल्हादंडाधिकाऱ्यांचा पेट्रोल पंप चालकांना कडक इशारा

Petrol - Diesel : 'हा' नियम मोडला तर थेट गुन्हा; जिल्हादंडाधिकाऱ्यांचा पेट्रोल पंप चालकांना कडक इशारा
Vinayak LandeBy Vinayak LandeMarch 27, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
Petrol Diesel News : जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा; अफवा पसरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल
Petrol Diesel News : जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा; अफवा पसरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Petrol – Diesel : अहिल्यानगर : जिल्ह्यात कॅन, प्लास्टिक बाटली, डबा किंवा कोणत्याही भांड्यात पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. पेट्रोल पंप चालकांनी इंधन फक्त वाहनांच्या इंधन टाकीतच भरावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी काढले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास पेट्रोल पंप चालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

Petrol - Diesel : 'हा' नियम मोडला तर थेट गुन्हा; जिल्हादंडाधिकाऱ्यांचा पेट्रोल पंप चालकांना कडक इशारा
Petrol – Diesel : ‘हा’ नियम मोडला तर थेट गुन्हा; जिल्हादंडाधिकाऱ्यांचा पेट्रोल पंप चालकांना कडक इशारा
सध्या सोशल मीडियावर पेट्रोल डिझेलच्या तुटवडा बाबत अफवा पसरत आहे. याच पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पेट्रोलियम नियम २००२ मधील तरतुदींच्या आधारे हे आदेश तत्काळ प्रभावाने लागू केले आहेत. आदेशानुसार पेट्रोल पंप चालकांनी कोणत्याही परिस्थितीत सुट्या स्वरूपात इंधन देऊ नये, अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे.
प्रशासनाने सर्व पेट्रोल पंपांना सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवणे तसेच इंधन विक्रीच्या नोंदी नियमितपणे ठेवणे बंधनकारक केले आहे. या आदेशाचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी पेट्रोल पंप मालक व व्यवस्थापकांवर राहणार आहे.
दरम्यान, आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर पेट्रोलियम नियम २००२, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत दंडात्मक व फौजदारी स्वरूपाची कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

संयम राखण्याचे प्रशासनाचे आवाहन

अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध राहावा, यासाठी पेट्रोलियम कंपन्यांच्या व्यवस्थापकांना विशेष निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता संयम राखण्याचे आवाहन केले आहे.
Administration Ahilyanagar Jilhadhikari Petrol- Diesel Police
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Shri Indresh Upadhyay : श्रीकृष्णाचं नामचिंतन हाच मुक्तीचा महामार्ग; इंद्रेश उपाध्याय यांचे प्रतिपादन

April 16, 2026

Dr. Babasaheb Ambedkar : बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच राष्ट्राचा खरा आधार ; जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन

April 14, 2026

Women’s Self-Help Groups : बचत गटांची ‘लोकल टू ग्लोबल’ झेप; अहिल्यानगरमध्ये विक्रमी कर्जवाटप

April 12, 2026
Leave A Reply Cancel Reply

Shri Indresh Upadhyay : श्रीकृष्णाचं नामचिंतन हाच मुक्तीचा महामार्ग; इंद्रेश उपाध्याय यांचे प्रतिपादन

April 16, 2026

Dr. Babasaheb Ambedkar : बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच राष्ट्राचा खरा आधार ; जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन

April 14, 2026

Women’s Self-Help Groups : बचत गटांची ‘लोकल टू ग्लोबल’ झेप; अहिल्यानगरमध्ये विक्रमी कर्जवाटप

April 12, 2026

Avdhut Dada Guru : दादागुरु महाराजांचे अहिल्यानगरीत प्रथमच आगमन; भक्तांसाठी पर्वणी

April 9, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.