Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Rahuri Assembly Election : राहुरी विधानसभा पोटनिवडणूक; निवडणूक खर्चाची काटेकोरपणे तपासणी करा : जिल्हाधिकारी
अहिल्यानगर

Rahuri Assembly Election : राहुरी विधानसभा पोटनिवडणूक; निवडणूक खर्चाची काटेकोरपणे तपासणी करा : जिल्हाधिकारी

Rahuri Assembly Election : राहुरी विधानसभा पोटनिवडणूक; निवडणूक खर्चाची काटेकोरपणे तपासणी करा : जिल्हाधिकारी
Vinayak LandeBy Vinayak LandeMarch 20, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260320 WA0037
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Rahuri Assembly Election : अहिल्यानगर : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक खर्चाची काटेकोरपणे तपासणी करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिली.

राहुरी विधानसभा मतदारसंघाबाबत नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी निवडणूक खर्च निरीक्षक व्ही. कुमार, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके, जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी शैलेश मोरे आदी उपस्थित होते.
Rahuri Assembly Election
Rahuri Assembly Election
राहुरी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेली सर्व भरारी पथके, स्थिर सर्वेक्षण पथके व नियंत्रण कक्षांनी कार्यान्वित करण्यात आले आहे. या सर्व पथकांनी दैनंदिन अहवाल वेळेत सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
खर्च निरीक्षक व्ही. कुमार म्हणाले, ”भारत निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार सर्व नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. बँकांमधील संशयास्पद व्यवहारांची माहिती थेट प्राप्तिकर विभागाला कळवणे गरजेचे आहे. राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाने अवैध मद्य व पैशांच्या वाहतुकीवर कारवाई करावी. स्थिर सर्वेक्षण पथकांनी तपासणी नाक्यांवर चोख बंदोबस्त ठेवावा. तसेच सर्व पथकांच्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करावी व त्यांच्या जागा अद्ययावत कराव्यात. व्हिडिओ सर्वेक्षण पथकाने राजकीय सभांचे चित्रीकरण करताना मंचाचा आकार, खुर्च्यांची सविस्तर नोंद घ्यावी. समाजमाध्यमांवरील प्रचारावरदेखील विशेष लक्ष ठेवावे व उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा ४० लाख रुपये असल्याने खर्चाच्या नोंदी अद्ययावत ठेवाव्यात,” अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
Rahuri Assembly Election
Rahuri Assembly Election

सी-व्हिजिल प्रणालीद्वारे तातडीने निपटारा

सी-व्हिजिल प्रणालीवर येणाऱ्या तक्रारींचे तातडीने निवारण करावे, असे स्पष्ट करत सर्व पथकांनी समन्वयाने काम करून पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रिया पार पाडावी, असे आवाहनही व्ही. कुमार यांनी केले.

४ मे रोजी होणार मतमोजणी

भारत निवडणूक आयोगाने राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. मतदारसंघाच्या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून ४ मे २०२६ रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिली.
Ahilyanagar Candidate Rahuri Rahuri Assembly Election Scrutiny of Election Expenses
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026

Narmada Purana Katha Chikhli : ‘नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !

September 1, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.