Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»LPG GAS : अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका; जिल्ह्यात एलपीजी गॅसचा पुरेसा साठा : जिल्हाधिकारी
अहिल्यानगर

LPG GAS : अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका; जिल्ह्यात एलपीजी गॅसचा पुरेसा साठा : जिल्हाधिकारी

LPG GAS : अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका; जिल्ह्यात एलपीजी गॅसचा पुरेसा साठा
Vinayak LandeBy Vinayak LandeMarch 9, 2026Updated:March 9, 2026No Comments1 Min Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260309 WA0005
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

LPG GAS : अहिल्यानगर :  जिल्ह्यात एलपीजी गॅसच्या पुरवठ्याबाबत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नये. जिल्ह्यात गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांना कोणतीही अडचण येऊ देणार नाही, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिली.

LPG GAS : अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका; जिल्ह्यात एलपीजी गॅसचा पुरेसा साठा
LPG GAS : अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका; जिल्ह्यात एलपीजी गॅसचा पुरेसा साठा
गॅस पुरवठ्याच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले की, जिल्ह्यातील एलपीजी गॅस गोदामांची विशेष पथकामार्फत अचानक तपासणी करण्यात यावी. कृत्रिम टंचाई निर्माण करून नागरिकांची दिशाभूल करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी एम. के. चौधरी, बीपीसीएलचे राजकुमार मिश्रा, तसेच विविध गॅस कंपन्यांचे प्रतिनिधी व वितरक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, ग्राहकांनी गॅस सिलिंडरसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी आणि अधिकृत पुरवठादारांकडूनच गॅस घ्यावा. गॅस वितरण नियमानुसार होत असल्याची खात्री करून घ्यावी तसेच ऑनलाईन नोंदणी करूनच सिलिंडरची मागणी करावी.
गॅस वितरणात पारदर्शकता राखून ग्राहकांना वेळेत सेवा देण्याचे निर्देशही गॅस एजन्सींना देण्यात आले आहेत.

तक्रार असल्यास येथे संपर्क करा

भारत पेट्रोलियम – १८००२२४३४४
इंडियन ऑइल – १८००-२३३३-५५५
हिंदुस्तान पेट्रोलियम – १८००-२३३३-५५५
जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती कक्ष – १०७७

 

Administration Ahilyanagar District Supply Department Jilhadhikari KYC LPG GAS meeting
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026

Narmada Purana Katha Chikhli : ‘नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !

September 1, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.