Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Radhakrishna Vikhe Patil : अहिल्यानगर शहरासाठी सर्वंकष ‘मास्टर प्लॅन’ : मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
अहिल्यानगर

Radhakrishna Vikhe Patil : अहिल्यानगर शहरासाठी सर्वंकष ‘मास्टर प्लॅन’ : मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil : अहिल्यानगर शहरासाठी सर्वंकष ‘मास्टर प्लॅन’ : मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
Vinayak LandeBy Vinayak LandeMarch 8, 2026Updated:March 8, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260308 WA0025
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Radhakrishna Vikhe Patil : अहिल्यानगर : अहिल्यानगर शहराला राज्यातील अग्रगण्य शहर म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी अधिक प्रभावी नियोजनाची गरज आहे. त्यासाठी व्यावसायिक, औद्योगिक आणि नागरीकरणाच्या दृष्टीने शहराचा सर्वंकष विकास साधण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करून तो पूर्णत्वास नेण्यावर भर दिला जाणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

शहरातील गुलमोहर रोड परिसरात नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन उभारण्यात आलेल्या नवीन स्ट्रीट लाईट प्रकल्पाचे उद्घाटन विद्यार्थी आर्या घोडके, पार्थ खंडेलवाल, रिधान शिंदे आणि पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, नगरसेविका गौरी बोरकर, नगरसेवक ऋग्वेद गंधे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने शहराची ओळख निर्माण झाली असून त्या नावाला साजेसा विकास घडवून आणणे ही सर्वांची जबाबदारी आहे. शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी विविध विकासकामांना गती दिली जाईल.
नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून त्याचे नियंत्रण पोलीस अधीक्षक कार्यालयातून केले जात आहे. भविष्यात या यंत्रणेचा अधिक विस्तार करून अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल आणि त्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शहर व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावरही भर दिला जाईल. नागरिकांना सुलभ, सुरक्षित आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देत प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून अहिल्यानगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की, गुलमोहर रोड परिसरातील लहान मुलांनी स्ट्रीट लाईटची लेखी मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेऊन पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिला आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हे काम पूर्ण करण्यात आले. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनी स्वच्छतेची सवय अंगीकारावी, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Ahilyanagar AI Maharashtra Radhakrishna Vikhe Patil Sangram Jagtap Smart City
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026

Narmada Purana Katha Chikhli : ‘नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !

September 1, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.