Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Mahavitran : अवाजवी वीजबिलाविरोधात शेतकऱ्यांचा उद्रेक; सौर प्रकल्प बसूनही लाखोंची वीजबिले
अहिल्यानगर

Mahavitran : अवाजवी वीजबिलाविरोधात शेतकऱ्यांचा उद्रेक; सौर प्रकल्प बसूनही लाखोंची वीजबिले

Mahavitran : अवाजवी वीजबिलाविरोधात शेतकऱ्यांचा उद्रेक; सौर प्रकल्प बसूनही लाखोंची वीजबिले
Vinayak LandeBy Vinayak LandeMarch 4, 2026Updated:March 4, 2026No Comments3 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260304 WA0022
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Mahavitran : अहिल्यानगर : शासनाच्या सौर ऊर्जा योजनेवर विश्वास ठेवून लाखो रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांनाच अवाजवी वीजबिलांचा फटका बसत असल्याची धक्कादायक प्रकरणे जिल्ह्यात उघडकीस आली आहेत. सौर प्रकल्प उभारल्यानंतर वीजबिलात बचत होण्याऐवजी उलट लाखोंची थकबाकी दाखवून वीजपुरवठा खंडित करण्याचे इशारे दिले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

Mahavitran : अवाजवी वीजबिलाविरोधात शेतकऱ्यांचा उद्रेक; सौर प्रकल्प बसूनही लाखोंची वीजबिले
Mahavitran : अवाजवी वीजबिलाविरोधात शेतकऱ्यांचा उद्रेक; सौर प्रकल्प बसूनही लाखोंची वीजबिले
या पार्श्वभूमीवर संतप्त शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादितच्या ग्रामीण उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत संबंधित प्रकरणांची तातडीने तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली.
Mahavitran : अवाजवी वीजबिलाविरोधात शेतकऱ्यांचा उद्रेक; सौर प्रकल्प बसूनही लाखोंची वीजबिले
Mahavitran : अवाजवी वीजबिलाविरोधात शेतकऱ्यांचा उद्रेक; सौर प्रकल्प बसूनही लाखोंची वीजबिले
३ किलोवॅट सौर प्रकल्पानंतरही थकबाकीचा धक्का
टाकळी काझी येथील शेतकरी श्रीमंत उर्फ सचिन म्हस्के यांनी महावितरणची विधिवत परवानगी घेऊन ३ किलोवॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारला. सौर ऊर्जेमुळे वीजबिलात मोठी बचत होईल, अशी अपेक्षा असताना त्यांना उलट हजारो रुपयांची थकबाकी दाखवून अवाजवी बिल पाठवण्यात आल्याचा आरोप आहे. थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा इशाराही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
देवगाव येथील शेतकरी गुलाब मोहन वामन यांनीही सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ३ किलोवॅट सौर प्रकल्प बसविला. मात्र, त्यांना तब्बल ४ लाख ३२ हजार रुपयांचे अविश्वसनीय व तांत्रिकदृष्ट्या अशक्यप्राय बिल पाठवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.दरम्यान, महावितरणच्या ग्रामीण उपविभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर संबंधित बिलांमध्ये कपात करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पोटे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. जिल्हा प्रशासन व महावितरणने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन सौर योजनेवरील शेतकऱ्यांचा विश्वास अबाधित ठेवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

नेट-मीटरिंगमध्ये गंभीर त्रुटींचा आरोप

शेतकऱ्यांच्या मते, नेट-मीटरिंगची योग्य वजावट न करणे, मीटर रीडिंगची अचूक तपासणी न करणे आणि प्रणालीतील तांत्रिक त्रुटी वेळेत दुरुस्त न करणे या बाबींमध्ये गंभीर निष्काळजीपणा झाला आहे. सौर योजनेचा उद्देश वीजबिलात बचत करणे हा असताना उलट प्रचंड थकबाकी दाखविणे हे नियमबाह्य असून योजनेच्या हेतूलाच हरताळ फासणारे असल्याचा आरोप करण्यात आला.

शेतकऱ्यांनी उपस्थित केलेले प्रश्नही गंभीर

– सौर प्रकल्प बसवल्यानंतरही लाखो रुपयांची बिले कशी आकारली जात आहेत?
– नेट-मीटरिंगची अंमलबजावणी योग्य पद्धतीने का होत नाही?
-चुकीचे बिल देऊन वीजपुरवठा खंडित करण्याचा अधिकार कोणत्या नियमांनुसार वापरला जात आहे?
-सौर योजनेवर विश्वास ठेवणाऱ्या शेतकऱ्यांवर आर्थिक दबाव टाकण्याचा हा प्रकार आहे का?

शेतकऱ्यांच्या ठाम मागण्या

दोन्ही प्रकरणांची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करावी. नेट-मीटरिंगची योग्य अंमलबजावणी करून सुधारित व नियमबद्ध बिले द्यावीत. अवाजवी व चुकीची बिले तत्काळ रद्द करावीत. विनाकारण वीजपुरवठा खंडित करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
जिल्हास्तरावर विशेष तपासणी समिती स्थापन करावी.

आंदोलनाचा इशारा

“सौर प्रकल्प बसवणाऱ्या शेतकऱ्यांवर लाखोंची बिले लादून त्यांना आर्थिक संकटात ढकलण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही. ही प्रकरणे तातडीने मार्गी लावली नाहीत तर तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.
Ahilyanagar Farmer Mahavitran Movement Saur prakalpa
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार

July 24, 2026

Shishu Sangopan Sanstha Dindi : विठ्ठलनामाच्या गजरात’ शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी

July 23, 2026

Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

July 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार

July 24, 2026

Shishu Sangopan Sanstha Dindi : विठ्ठलनामाच्या गजरात’ शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी

July 23, 2026

Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

July 22, 2026

District Planning Committee : जिल्हा नियोजन समितीवर संदेश कार्लेंची वर्णी

July 11, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.