Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»महाराष्ट्र»Tree plantation : ‘जय बाबाजी’चा वाराणसीत डंका; गंगेच्या साक्षीने वृक्षारोपणात शानदार कामगिरी
महाराष्ट्र

Tree plantation : ‘जय बाबाजी’चा वाराणसीत डंका; गंगेच्या साक्षीने वृक्षारोपणात शानदार कामगिरी

Tree plantation : 'जय बाबाजी'चा वाराणसीत डंका; गंगेच्या साक्षीने वृक्षारोपणात शानदार कामगिरी
Vinayak LandeBy Vinayak LandeMarch 2, 2026Updated:March 2, 2026No Comments3 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260301 WA0023
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Tree plantation : वाराणसी : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते  नुकताच राज्यातील पहिल्या ‘शहरी वन’ प्रकल्पाचा भव्य प्रारंभ झाला. सुजाबाद–डोमरी परिसरातील ३५० बीघा क्षेत्रात उभारण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत एकाच वेळी ३ लाखांहून अधिक रोपांची लागवड करून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. या उपक्रमाची नोंद ग्रीनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होण्यासाठी संबंधित टीम वाराणसीत दाखल झाली होती. विशेष म्हणजे या उपक्रमात महाराष्ट्रातील जय बाबाजी भक्त परिवारातील ६०० साधकांनी गंगा नदीच्या साक्षीने तब्बल दोन सेक्टरमध्ये वृक्षारोपण करून शहरी वन प्रकल्पात सहभाग नोंदवून शानदार कामगिरी केली आहे. त्यामुळे वाराणसी येथील शासनाने त्यांची दखल घेत त्यांचे अभिनंदन केले.

Tree plantation : ''जय बाबाजी'चा वाराणसीत डंका; गंगेच्या साक्षीने वृक्षारोपणात शानदार कामगिरी
Tree plantation : ”जय बाबाजी’चा वाराणसीत डंका; गंगेच्या साक्षीने वृक्षारोपणात शानदार कामगिरी
जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या कृपाशीर्वादाने त्यांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी जगद्गुरू स्वामी शांतीगिरी महाराजांच्या प्रेरणेने क्षेत्र काशी येथील संत जनार्दन स्वामी आश्रमात नुकताच ओम जगद्गुरू जनशांती धर्म समारोह कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जप अनुष्ठान, व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण करण्यात आले. परंतु कार्यक्रमाच्या सांगते आधी जय बाबाजी भक्त परिवारातील भक्तांनी जगद्गुरू शांतीगिरी महाराजांच्या प्रेरणेने झाडे लावा, झाडे जगवा हे ब्रीद जोपासत हजारो वृक्षांची लागवड करून शासनाच्या उपक्रमात दमदार कामगिरी केली आहे.
Tree plantation : ''जय बाबाजी'चा वाराणसीत डंका; गंगेच्या साक्षीने वृक्षारोपणात शानदार कामगिरी
Tree plantation : ”जय बाबाजी’चा वाराणसीत डंका; गंगेच्या साक्षीने वृक्षारोपणात शानदार कामगिरी
यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राकेश त्रिवेदी, नागेश्वर महाराज, अविरमुक्तेश्वर महाराज, डी.सी. गायकवाड, संजय शिंदे, मुकुंद पिंगळे, पोपट सोनवणे, संजय पवार, कडू जगताप, साहेबराव आहेर, मच्छिंद्र कराळे, तुकाराम भोये, अण्णासाहेब गायकवाड, सुमन पैठणकर आदी उपस्थित होते.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ६० घाटांच्या स्वरूपात संपूर्ण वनक्षेत्र विकसित करण्यात आले असून प्रत्येक सेक्टरला काशीतील प्रसिद्ध घाटांची नावे देण्यात आली आहेत. यात दशाश्वमेध, ललिता, मानमंदिर, शीतला, गायघाट आदी घाटांचा समावेश आहे. प्रत्येक सेक्टरमध्ये सुमारे पाच हजार रोपे लावली जाणार असून संपूर्ण परिसर ‘मिनी काशी’सारखा हिरवागार दिसणार आहे.
Tree plantation : ''जय बाबाजी'चा वाराणसीत डंका; गंगेच्या साक्षीने वृक्षारोपणात शानदार कामगिरी
Tree plantation : ”जय बाबाजी’चा वाराणसीत डंका; गंगेच्या साक्षीने वृक्षारोपणात शानदार कामगिरी

मियावाकी पद्धतीचा वापर

या प्रकल्पात जपानी तज्ज्ञ अकीरा मियावाकी यांनी विकसित केलेल्या ‘मियावाकी’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या पद्धतीने रोपे १० पट वेगाने वाढतात व जंगल ३० पट अधिक दाट होते. दोन ते तीन वर्षांत हे जंगल स्वयंपूर्ण (सेल्फ-सस्टेनेबल) बनते.
https://jansattatimes.com/wp-content/uploads/2026/03/VID-20260302-WA0005.mp4

आधुनिक सिंचन व्यवस्था

तीन लाख रोपे जिवंत राहावीत यासाठी १०,८२७ मीटर लांबीची पाइपलाइन, १० बोरवेल आणि ३६० ‘रेन गन’ प्रणाली बसविण्यात आली आहे. नदीकाठची माती सुरक्षित ठेवण्यासाठी शीशम, अर्जुन, सागवान, बांबू, पेरू यांसारख्या २७ देशी प्रजातींची लागवड करण्यात येणार आहे. पर्यटकांसाठी चार किलोमीटर लांबीचा पाथवेही तयार करण्यात आला आहे.
https://jansattatimes.com/wp-content/uploads/2026/03/VID-20260302-WA0010.mp4

उत्पन्नाचे साधनही

हा प्रकल्प केवळ हरित उपक्रम नसून महसुलाचे साधनही ठरणार आहे. मध्य प्रदेशातील एमबीके संस्थेसोबत झालेल्या करारानुसार तिसऱ्या वर्षापासून नगर निगमला दोन कोटी रुपयांपासून सुरुवात होऊन सातव्या वर्षी सात कोटी रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. फुलशेती (गुलाब, चमेली, पारिजात), फळझाडे (आंबा, पेरू, पपई) तसेच अश्वगंधा, शतावरी, गिलोय यांसारख्या औषधी वनस्पतींची लागवडही करण्यात येणार आहे.

आधीचे विक्रम

देशात यापूर्वीही मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचे विक्रम झाले आहेत. २०१७ मध्ये मध्य प्रदेश येथे नर्मदा तीरावर १२ तासांत ६ कोटी रोपे लावण्याचा विक्रम झाला होता. तसेच २०१६ मध्ये उत्तर प्रदेश मध्ये २४ तासांत ५ कोटी रोपे लावण्याची नोंद आहे.

काशीचे वाढते मानांकन

धर्म, संस्कृती आणि पर्यावरण क्षेत्रात वाराणसीने यापूर्वीही अनेक विक्रम नोंदवले आहेत. देव दीपावलीत लाखो दिवे प्रज्वलित करणे, सामूहिक योग आणि शंखनाद, तसेच बनारसी कलेतील विक्रमांमुळे काशीचे नाव जागतिक स्तरावर झळकले आहे.
Janardhan swami Jay Babaji Kashi Maharashtra Shantigiri maharaj Tree plantation Uttar Pradesh Varanasi Verul Yogi Adityanath
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Narmada puran: ‘नर्मदा पुराणवर’ मराठीत प्रवचन; मिलिंद महाराज चवंडके देशात पहिले

February 18, 2026

Mahavitaran : महावितरण’ची स्मार्ट मीटर क्रांती; ग्राहकांच्या वीजबिलात भरघाेस सवलत

February 16, 2026

milk adulteration : ‘या’ जिल्ह्यात दुधाच्या नावाखाली जीवघेणी भेसळ; लाखोंचा मुद्देमाल जप्त

February 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Tree plantation : ‘जय बाबाजी’चा वाराणसीत डंका; गंगेच्या साक्षीने वृक्षारोपणात शानदार कामगिरी

March 2, 2026

Narmada puran: ‘नर्मदा पुराणवर’ मराठीत प्रवचन; मिलिंद महाराज चवंडके देशात पहिले

February 18, 2026

Mahavitaran : महावितरण’ची स्मार्ट मीटर क्रांती; ग्राहकांच्या वीजबिलात भरघाेस सवलत

February 16, 2026

milk adulteration : ‘या’ जिल्ह्यात दुधाच्या नावाखाली जीवघेणी भेसळ; लाखोंचा मुद्देमाल जप्त

February 15, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.