Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Ahilyanagar : शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत; एक दिवस विलंबाने पाणी
अहिल्यानगर

Ahilyanagar : शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत; एक दिवस विलंबाने पाणी

Ahilyanagar : शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत; एक दिवस विलंबाने पाणी
Vinayak LandeBy Vinayak LandeFebruary 7, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260207 WA0009
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Ahilyanagar : अहिल्यानगर : महावितरण विभागाकडून महत्त्वाच्या कामासाठी शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरातील पाणीपुरवठा विस्कळीत होऊन एक दिवस विलंबाने पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

महावितरण विभागाकडून देखभाल व दुरूस्तीच्या कामासाठी आज सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात आला. दरम्यान, या काळात मुळानगर, विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहिल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता आल्या नाही.
त्यामुळे आज शनिवार (ता. 7) रोजी बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्ता, पाइपलाइन रस्ता, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर तसेच सारसनगर, बुरूडगाव रस्ता,
केडगाव, नगर-कल्याण रस्त्यांवरील शिवाजीनगर परिसर भागास सकाळी 11 नंतरच्या पाणी वाटपाच्या भागात पाणी पुरवठा होऊ शकला नाही.
हा पाणी पुरवठा रविवार (ता. 8)
रोजी करण्यात येणार आहे. तसेच रविवारी पाणी पुरवठा होऊ घातलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागात
म्हणजेच मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रस्ता, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, टी. व्ही. सेंटर परिसर, म्युनिसीपल हाडको, स्टेशन रस्ता, आगरकर मळा, विनायक नगर भागात महापालिकेमार्फत पाणी पुरवठा करण्यात येणार नाही. या भागातील
पाणी पुरवठा हा रविवार ऐवजी सोमवार (ता. 9) रोजी करण्यात येईल. तसेच सोमवारी रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच सिध्दार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, आनंदी बाजार, कापड बाजार, ख्रिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने महापालिका कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रस्ता परिसर, सावेडी भागात महापालिकेतर्फे पाणीपुरवठा करण्यात येणार नाही, या भागातील पाणीपुरवठा हा सोमवार ऐवजी मंगळवार (ता. 10) रोजी करण्यात येणार आहे.
तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन, पाण्याचा वापर काटकसरीने करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मनपा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
Administration Ahilyanagar Mahapalika Social Water
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Tree plantation : ‘जय बाबाजी’चा वाराणसीत डंका; गंगेच्या साक्षीने वृक्षारोपणात शानदार कामगिरी

March 2, 2026

Narmada puran: ‘नर्मदा पुराणवर’ मराठीत प्रवचन; मिलिंद महाराज चवंडके देशात पहिले

February 18, 2026

Mahavitaran : महावितरण’ची स्मार्ट मीटर क्रांती; ग्राहकांच्या वीजबिलात भरघाेस सवलत

February 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

Tree plantation : ‘जय बाबाजी’चा वाराणसीत डंका; गंगेच्या साक्षीने वृक्षारोपणात शानदार कामगिरी

March 2, 2026

Narmada puran: ‘नर्मदा पुराणवर’ मराठीत प्रवचन; मिलिंद महाराज चवंडके देशात पहिले

February 18, 2026

Mahavitaran : महावितरण’ची स्मार्ट मीटर क्रांती; ग्राहकांच्या वीजबिलात भरघाेस सवलत

February 16, 2026

milk adulteration : ‘या’ जिल्ह्यात दुधाच्या नावाखाली जीवघेणी भेसळ; लाखोंचा मुद्देमाल जप्त

February 15, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.