Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Radhakrishna Vikhe Patil : टंचाईत निष्काळजीपणा खपवून घेणार नाही; अधिकाऱ्यांना विखे पाटलांचा इशारा
अहिल्यानगर

Radhakrishna Vikhe Patil : टंचाईत निष्काळजीपणा खपवून घेणार नाही; अधिकाऱ्यांना विखे पाटलांचा इशारा

टंचाईच्या काळात नागरिकांना पाणी, पशुधनाला चारा आणि शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध करून देताना प्रशासनाने संवेदनशीलता आणि समन्वयाने काम करावे.
Vinayak LandeBy Vinayak LandeOctober 4, 2026No Comments3 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20261004 WA0008
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Radhakrishna Vikhe Patil : अहिल्यानगर : टंचाईच्या काळात नागरिकांना पाणी, पशुधनाला चारा आणि शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध करून देताना प्रशासनाने संवेदनशीलता आणि समन्वयाने काम करावे. सुविधा देण्यात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.

Radhakrishna Vikhe Patil : टंचाईत निष्काळजीपणा खपवून घेणार नाही; अधिकाऱ्यांना विखे पाटलांचा इशारा
Radhakrishna Vikhe Patil : टंचाईत निष्काळजीपणा खपवून घेणार नाही; अधिकाऱ्यांना विखे पाटलांचा इशारा

कोपरगाव येथील कृष्णाई मंगल कार्यालयात आयोजित तालुकास्तरीय टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विधान परिषद सदस्य विवेक कोल्हे, आमदार आशुतोष काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अपर जिल्हाधिकारी शैलेंद्र हिंगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.

Radhakrishna Vikhe Patil : टंचाईत निष्काळजीपणा खपवून घेणार नाही; अधिकाऱ्यांना विखे पाटलांचा इशारा
Radhakrishna Vikhe Patil : टंचाईत निष्काळजीपणा खपवून घेणार नाही; अधिकाऱ्यांना विखे पाटलांचा इशारा

दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याचे पाणी, पशुधनासाठी चारा आणि शेतीसाठी पाण्याचे नियोजन करावे, असे निर्देश विखे पाटील यांनी दिले. दुष्काळामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे आणि तांत्रिक नोंदी वेळेत पूर्ण कराव्यात. एनडीआरएफ तसेच राज्य मदत व पुनर्वसन विभागामार्फत शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले. नागरिकांच्या मदतीसाठी तहसील कार्यालयात हेल्पलाइन सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

आमदार आशुतोष काळे यांनी दुष्काळी परिस्थितीचा विचार करून चाऱ्याचे नियोजन करण्याची तसेच जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. दरम्यान, बैठकीपूर्वी पालकमंत्री विखे पाटील यांनी चांदेकसारे परिसरातील दुष्काळग्रस्त शेतातील पिकांची पाहणी केली. यावेळी आमदार आशुतोष काळे, नितीन दिनकर यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.

पालखेड कालव्यासाठी सव्वा कोटी

पालखेड कालव्याच्या दुरुस्तीसाठी १ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची घोषणा विखे पाटील यांनी केली. पिकांसाठी पाण्याचे योग्य नियोजन करण्यात आले असून डिसेंबर आणि फेब्रुवारीमध्ये दोन आवर्तनांद्वारे शेतीसाठी पाणी सोडण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. थकीत पाणीपट्टीची वसुली तूर्तास करू नये तसेच यापुढे पाणीपट्टीची मागणी करू नये, असे निर्देशही संबंधित यंत्रणेला देण्यात आले.

वीज भारनियमन कमी करण्याचे निर्देश

शेतीसाठी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी डीपी आणि ट्रान्सफॉर्मरसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. संबंधित ट्रान्सफॉर्मर तातडीने कार्यान्वित करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि वीज भारनियमनाचा कालावधी कमी करावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.

बिबट्याच्या दहशतीवर पिंजरे लावा

चांदगव्हाण परिसरात बिबट्यामुळे निर्माण झालेल्या दहशतीची दखल घेत वनविभागाने तातडीने पिंजरे लावून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही विखे पाटील यांनी दिले.

तीन आवर्तने देण्याची कोल्हेंची मागणी

विधान परिषद सदस्य विवेक कोल्हे यांनी ६३ गावांसाठी रब्बी हंगामात पाण्याची तीन आवर्तने देण्याची मागणी केली. पीक कापणी प्रयोगांमध्ये प्रत्यक्ष कापणी प्रयोगाची नोंद पंचनाम्यात करावी, धोंडेवाडी व वेस येथील पोटखराब क्षेत्राची महसूल विभागाने पाहणी करावी, शेतकऱ्यांना मोफत चारा पिकांचे बियाणे द्यावे आणि उजवा व डावा कालव्यातून समान पद्धतीने पाण्याचा विसर्ग करावा, अशी मागणी त्यांनी केली. रोजगार हमीची कामेही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी केली.

Aashutosh kale Administration Ahilyanagar Radhakrishna Vikhe Patil Vivek kolhe
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Hospitalization : हॉस्पिटल्स बाराही महिने हाऊसफुल्ल; जीवनशैलीवर आत्मचिंतन हवे!

October 22, 2026

Ahilyanagar Farmers : शेतकऱ्यांसाठी दिलासा; कर्जमुक्तीच्या तिसऱ्या यादीत ४,४१५ नावे !

October 14, 2026

Navratri Festival : मातृशक्तीचा सन्मान हाच नवरात्रोत्सवाचा खरा धर्म

October 12, 2026
Leave A Reply Cancel Reply

Hospitalization : हॉस्पिटल्स बाराही महिने हाऊसफुल्ल; जीवनशैलीवर आत्मचिंतन हवे!

October 22, 2026

Ahilyanagar Farmers : शेतकऱ्यांसाठी दिलासा; कर्जमुक्तीच्या तिसऱ्या यादीत ४,४१५ नावे !

October 14, 2026

Navratri Festival : मातृशक्तीचा सन्मान हाच नवरात्रोत्सवाचा खरा धर्म

October 12, 2026

Shiv Charitra Katha : शिवाजी महाराज केवळ राजे नव्हे, तर राष्ट्रधर्माचे महानायक : स्वामी गोविंददेवगिरी महाराज

October 5, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.