Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांमुळेच हिंदू धर्माचे अस्तित्व : स्वामी गोविंददेवगिरी महाराज
अहिल्यानगर

Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांमुळेच हिंदू धर्माचे अस्तित्व : स्वामी गोविंददेवगिरी महाराज

“विश्वाचे मांगल्य साकारणारा हिंदू धर्म केवळ छत्रपती शिवाजी महाराजांमुळे टिकला. विश्वमांगल्याचा विचार हा भारत देशाचा स्थायीभाव आहे,” असे प्रतिपादन प. पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी केले.
Vinayak LandeBy Vinayak LandeSeptember 30, 2026No Comments4 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260930 WA0005
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Chhatrapati Shivaji Maharaj : अहिल्यानगर : “विश्वाचे मांगल्य साकारणारा हिंदू धर्म केवळ छत्रपती शिवाजी महाराजांमुळे टिकला. विश्वमांगल्याचा विचार हा भारत देशाचा स्थायीभाव आहे,” असे प्रतिपादन प. पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी केले. श्री रामकृष्ण सेवा ट्रस्टच्या वतीने नवीन टिळक रोडवरील नंदनवन लॉन्स येथे आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज चरित्र कथा सोहळ्याच्या प्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्याचा प्रारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात झाला.

Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांमुळेच हिंदू धर्माचे अस्तित्व : स्वामी गोविंददेवगिरी महाराज
Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांमुळेच हिंदू धर्माचे अस्तित्व : स्वामी गोविंददेवगिरी महाराज

श्री रामकृष्ण सेवा ट्रस्टच्या वतीने शहरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या शिवचरित्र कथा सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. प्रारंभी ट्रस्टचे अध्यक्ष नंदलाल मणियार, उपाध्यक्ष मोहनलाल मानधना, सचिव सुरेश चांडक, कोषाध्यक्ष मगनभाई पटेल आणि आमदार संग्राम जगताप यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांचा सन्मान करण्यात आला. ‘शिवभारत’ ग्रंथाचे पूजन आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून कथा सोहळ्याचा विधिवत प्रारंभ करण्यात आला.

नंदनवन उद्योग समूहाचे संजय जाधव यांनी स्वागताध्यक्ष या नात्याने स्वामी गोविंददेवगिरी महाराज, उपस्थित मान्यवर आणि श्रोत्यांचे स्वागत केले. श्री रामकृष्ण इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लेझीम आणि ढोलपथकाच्या तालबद्ध वादनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

युवकांनी शिवरायांचे गुण आत्मसात करावेत : आमदार जगताप

आमदार जगताप म्हणाले की, श्री रामकृष्ण सेवा ट्रस्टने शहरात प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित कथा सोहळ्याचे आयोजन केले आहे. युवकांनी मोठ्या संख्येने या सोहळ्याचा लाभ घ्यावा आणि शिवरायांचे विचार, गुण व आदर्श आत्मसात करावेत. शिवरायांच्या जीवनप्रवासातून प्रेरणा घेतल्यास युवकांचे जीवन निश्चितच अधिक समृद्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

युवा पिढीला शिवचरित्राची ओळख होणे काळाची गरज

ट्रस्टचे अध्यक्ष नंदलाल मणियार यांनी प्रास्ताविकात श्री रामकृष्ण सेवा ट्रस्टच्या कार्याचा आढावा घेतला. प. पू. डोंगरे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्टच्या कार्याचा प्रारंभ झाला असून, रामकृष्ण परिवार हा संस्कारांची खाण आहे, असे त्यांनी सांगितले. भारतीय संस्कृती, अध्यात्म, धर्म, राष्ट्रभावना आणि भक्तीचा संदेश देणाऱ्या स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांची अयोध्येतील श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या महासचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले. युवा पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र समजणे ही काळाची गरज असल्याने या कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘शिवभारत’मधून शिवचरित्राचे ऐतिहासिक संदर्भ

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष करून स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी कथा निरूपणाला प्रारंभ केला. शिवचरित्राचे ऐतिहासिक संदर्भ विशद करताना त्यांनी नगर जिल्ह्यातील नेवासा येथील कविंद्र परमानंद यांचा उल्लेख केला. परमानंद हे शिवाजी महाराजांच्या सहवासात होते. त्यांनी लिहिलेला ‘शिवभारत’ हा ग्रंथ तंजावरच्या ग्रंथालयात उपलब्ध झाला असून, शिवाजी महाराजांची संमती घेऊन हा ग्रंथ लिहिण्यात आला, ही विशेष बाब असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय परंपरेत सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना केली जाते. विश्वाचे कल्याण व्हावे, हा भारतीय संस्कृतीचा मूलभूत विचार आहे, असे सांगताना स्वामीजींनी मध्ययुगीन आक्रमणांच्या पार्श्वभूमीवर हिंदू धर्म आणि संस्कृतीसमोरील आव्हानांचा उल्लेख केला. मंदिरांची तोडफोड, गायींची हत्या आणि महिलांवरील अत्याचार यांसारख्या घटनांनी समाजाला मोठ्या संकटांना सामोरे जावे लागल्याचे त्यांनी नमूद केले. समर्थ रामदास स्वामी यांनीही त्या काळातील परिस्थितीचे वर्णन केले असल्याचे त्यांनी सांगितले.

जिजाऊंचे संस्कार अन् शिवरायांचे स्वराज्याचे स्वप्न

शिवचरित्राचे विवेचन करताना स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी शहाजीराजे आणि जिजाबाई यांच्या योगदानावर प्रकाश टाकला. सरदार मालोजीराजे यांचे सुपुत्र शहाजीराजे यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्यातूनच शिवनेरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवरायांचा जन्म झाला, असे त्यांनी सांगितले. जिजाबाईंनी शिवरायांवर केलेले संस्कार त्यांच्या संपूर्ण जीवनप्रवासात प्रेरणादायी ठरले. जिजाबाईंसह दादोजी कोंडदेव आणि सोनोपंत डबीर यांचेही बालशिवाजींच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान होते. शिवरायांची राजमुद्रा संस्कृत भाषेत असल्याने त्यांचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व लक्षात येते, असे त्यांनी नमूद केले. आक्रमणांमुळे उद्ध्वस्त झालेल्या पुण्याचे पुनर्वसन करण्यासाठी बालशिवाजींनी वयाच्या सहाव्या वर्षी सोन्याच्या फाळांनी नांगरणी केल्याची आणि कसबा गणपतीची प्रतिष्ठापना केल्याची परंपरागत ऐतिहासिक कथा त्यांनी सांगितली. शिवरायांची आज्ञापत्रे त्यांच्या सखोल अभ्यासाची, दूरदृष्टीची आणि प्रगल्भ विचारांची साक्ष देतात, असेही स्वामीजी म्हणाले.

मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्यास शरद झंवर, रामेश्वर बिहाणी, हिरालाल पटेल, डॉ. शरद कोलते, विनोद पटेल, पुरुषोत्तम नावंदर, दत्ता जाधव, मंगल जाधव, सुवर्णा जाधव यांच्यासह शहरातील आणि उपनगरांतील नागरिक व धर्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ahilyanagar Chhatrapati Shivaji Maharaj Chhatrapati Shivaji Maharaj Charitra Katha Maharashtra Swami Govinddev Giri Maharaj
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Hospitalization : हॉस्पिटल्स बाराही महिने हाऊसफुल्ल; जीवनशैलीवर आत्मचिंतन हवे!

October 22, 2026

Ahilyanagar Farmers : शेतकऱ्यांसाठी दिलासा; कर्जमुक्तीच्या तिसऱ्या यादीत ४,४१५ नावे !

October 14, 2026

Navratri Festival : मातृशक्तीचा सन्मान हाच नवरात्रोत्सवाचा खरा धर्म

October 12, 2026
Leave A Reply Cancel Reply

Hospitalization : हॉस्पिटल्स बाराही महिने हाऊसफुल्ल; जीवनशैलीवर आत्मचिंतन हवे!

October 22, 2026

Ahilyanagar Farmers : शेतकऱ्यांसाठी दिलासा; कर्जमुक्तीच्या तिसऱ्या यादीत ४,४१५ नावे !

October 14, 2026

Navratri Festival : मातृशक्तीचा सन्मान हाच नवरात्रोत्सवाचा खरा धर्म

October 12, 2026

Shiv Charitra Katha : शिवाजी महाराज केवळ राजे नव्हे, तर राष्ट्रधर्माचे महानायक : स्वामी गोविंददेवगिरी महाराज

October 5, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.