Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Ganesh Purana : पार्वतीच्या भक्तीतून प्रगटला मृत्तिकेचा गणपती
अहिल्यानगर

Ganesh Purana : पार्वतीच्या भक्तीतून प्रगटला मृत्तिकेचा गणपती

गणेशमंत्राचे अनुष्ठान विघ्नांचा नाश करून भक्तांना इष्ट फल व आनंद देणारे आहे, असे मिलिंद महाराज चवंडके यांनी सांगितले.
Vinayak LandeBy Vinayak LandeSeptember 24, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260924 WA0006
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Ganesh Purana : अहिल्यानगर : देवी पार्वतीच्या भक्तीतून मृत्तिकेचा गणपती सजीव झाला आणि तेव्हापासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशपूजेची परंपरा सुरू झाली. गणेशमंत्राचे अनुष्ठान विघ्नांचा नाश करून भक्तांना इष्ट फल व आनंद देणारे आहे, असे मिलिंद महाराज चवंडके यांनी सांगितले.

https://jansattatimes.com/wp-content/uploads/2026/09/VID-20260924-WA0029.mp4

विश्व हिंदू परिषदेच्या दुर्गावाहिनी जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा संयोजिका जयश्री पोटे यांच्या भिंगार येथील निवासस्थानी आयोजित प्रवचन सोहळ्यात ते बोलत होते. प्रारंभी जयश्री पोटे यांनी मिलिंद महाराजांचे स्वागत केले. विहिंपचे विभाग मंत्री सुनीलराव खिस्ती व अशोक शहापुरे यांच्या हस्ते मिलिंद महाराज चवंडके यांचा सन्मान करण्यात आला.

Ganesh Purana : पार्वतीच्या भक्तीतून प्रगटला मृत्तिकेचा गणपती
Ganesh Purana : पार्वतीच्या भक्तीतून प्रगटला मृत्तिकेचा गणपती

मिलिंद महाराज म्हणाले, “देवाधिदेव महादेवांनी भृगूऋषींना गणपती मंत्राचे सामर्थ्य सांगताना सहा अक्षरी आणि एकाक्षरी गणपती मंत्र श्रेष्ठ असल्याचे स्पष्ट केले आहे. गणपती मंत्राचे अनुष्ठान केल्याने विघ्ने दूर होऊन इष्ट फल प्राप्त होते. गणेश सहस्रनामाचा जप इच्छापूर्तीचा आनंद देतो. भगवान शंकराने गणेश सहस्रनामाचा पाठ आणि एकाक्षरी मंत्राचा जप करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केला. त्याच्या स्मरणार्थ दीपोत्सव साजरा केला जातो,” अशी आख्यायिका त्यांनी सांगितली.

Ganesh Purana : पार्वतीच्या भक्तीतून प्रगटला मृत्तिकेचा गणपती
Ganesh Purana : पार्वतीच्या भक्तीतून प्रगटला मृत्तिकेचा गणपती

“संकष्टी व अंगारकी चतुर्थीचे माहात्म्य, २१ दुर्वांचे महत्त्व आणि गणपतीच्या बारा नावांचे आध्यात्मिक महत्त्व सांगताना त्यांनी गणेश पुराणातील विविध कथा श्रोत्यांसमोर उलगडल्या. सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्ण, लंबोदर, विकट, विघ्ननाशक, गणाधिप, धूम्रकेतू, गणाध्यक्ष, भालचंद्र आणि गजानन या बारा नावांचा जप विघ्ननाशक आहे,” असे त्यांनी सांगितले.

देवी पार्वतीच्या श्वासोच्छ्वासाबरोबर नेत्रातील अलौकिक तेजातून वक्रतुंड प्रगट झाल्याची कथा, तसेच क्षम आणि कुशल या दैत्यांचा बाल गणेशाने पाळण्यात असतानाच केलेला संहार आणि क्रौंच गंधर्वाला मिळालेल्या शापामुळे तो उंदीर होऊन गणपतीचे वाहन बनल्याची कथा सांगत त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

अहिल्यानगरचे ग्रामदैवत विशाल गणपती नाथपंथी असून तीन हातांनी भाविकांना आशीर्वाद देणारे आहे, असे सांगत त्यांनी जिल्ह्यातील गणेशस्थळांचेही महत्त्व विशद केले. पारनेरच्या गणेशखिंडीतील गणपतीचे अंगारकी चतुर्थीशी असलेले महत्त्व, आव्हाने येथील निद्रिस्त गणपतीचे श्रद्धास्थान आणि नवनाथांमधील श्री कानिफनाथ गणेशमंत्रांचा जप करत प्रगट झाल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी विहिंप मातृशक्ती जिल्हा संयोजिका हिरा शहापुरे, मयुरी जोशी, आरती वाघ, श्रेया कदम, ज्येष्ठ पत्रकार सुधीर कुलट, तेजस पोटे, संजय सपकाळ, जनार्दन तांबे, मिलिंद फुंदे, बलराम वाघ, प्रसाद कदम, निखिल शेंडे यांच्यासह द्वारकाधीश कॉलनीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी गणपतीची महाआरती करण्यात आली. त्यानंतर प्रसाद वाटपाने प्रवचन सोहळ्याची सांगता झाली.

Ahilyanagar Bhingaar Ganesh Chaturthi Ganesh Purana Ganpati Bappa ParvatiMata
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Hospitalization : हॉस्पिटल्स बाराही महिने हाऊसफुल्ल; जीवनशैलीवर आत्मचिंतन हवे!

October 22, 2026

Ahilyanagar Farmers : शेतकऱ्यांसाठी दिलासा; कर्जमुक्तीच्या तिसऱ्या यादीत ४,४१५ नावे !

October 14, 2026

Navratri Festival : मातृशक्तीचा सन्मान हाच नवरात्रोत्सवाचा खरा धर्म

October 12, 2026
Leave A Reply Cancel Reply

Hospitalization : हॉस्पिटल्स बाराही महिने हाऊसफुल्ल; जीवनशैलीवर आत्मचिंतन हवे!

October 22, 2026

Ahilyanagar Farmers : शेतकऱ्यांसाठी दिलासा; कर्जमुक्तीच्या तिसऱ्या यादीत ४,४१५ नावे !

October 14, 2026

Navratri Festival : मातृशक्तीचा सन्मान हाच नवरात्रोत्सवाचा खरा धर्म

October 12, 2026

Shiv Charitra Katha : शिवाजी महाराज केवळ राजे नव्हे, तर राष्ट्रधर्माचे महानायक : स्वामी गोविंददेवगिरी महाराज

October 5, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.