Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»महाराष्ट्र»Amarkantak : नर्मदा तट म्हणजे साधना, ध्यान अन् आत्मदर्शनाची पवित्र भूमी!
महाराष्ट्र

Amarkantak : नर्मदा तट म्हणजे साधना, ध्यान अन् आत्मदर्शनाची पवित्र भूमी!

नर्मदा तट हा साधना, जप आणि ध्यानासाठी अत्यंत पवित्र असून भाविकांनी या पावन भूमीचा आध्यात्मिक आनंद लुटावा, असे आवाहन नर्मदा पुराणाचे कथाकार मिलिंद महाराज चवंडके यांनी केले.
Vinayak LandeBy Vinayak LandeAugust 29, 2026Updated:August 29, 2026No Comments3 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260829 WA0021
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Amarkantak : चिखली : भगवान श्रीशंकराने निर्माण केलेल्या पवित्र अमरकंटक पर्वतावरील नर्मदा तटावर आत्मदर्शनाचे परम सुख अनुभवता येते. नर्मदा तट हा साधना, जप आणि ध्यानासाठी अत्यंत पवित्र असून भाविकांनी या पावन भूमीचा आध्यात्मिक आनंद लुटावा, असे आवाहन नर्मदा पुराणचे कथाकार मिलिंद महाराज चवंडके यांनी केले.

Amarkantak : नर्मदा तट म्हणजे साधना, ध्यान अन् आत्मदर्शनाची पवित्र भूमी!
Amarkantak : नर्मदा तट म्हणजे साधना, ध्यान अन् आत्मदर्शनाची पवित्र भूमी!
चिखली येथील जागृत हनुमान मंदिराच्या सभामंडपात श्रावण महिन्यानिमित्त प्रथमच आयोजित नर्मदा कथा निरूपण सोहळ्यातील चतुर्थ पुष्प गुंफताना ते बोलत होते.
Amarkantak : नर्मदा तट म्हणजे साधना, ध्यान अन् आत्मदर्शनाची पवित्र भूमी!
Amarkantak : नर्मदा तट म्हणजे साधना, ध्यान अन् आत्मदर्शनाची पवित्र भूमी!
मिलिंद महाराज चवंडके म्हणाले, “भगवान श्रीशंकराने अत्यंत पवित्र अशा अमरकंटक पर्वताची निर्मिती केली असून श्रीशंकर पार्वतीसह या पर्वतावर नित्य वास करतात. श्रीमार्कंडेय मुनींनी केवळ नर्मदेचे जलप्राशन करून दहा हजार युगांपर्यंत भगवान श्रीशंकराची आराधना केली. त्यामुळे शिवशंकरांनी त्यांना अजरामर होण्याचे वरदान दिले. अमरकंटक येथील नर्मदा तटावर त्यांनी आत्मदर्शनाचे परम सुख प्राप्त केले.
कलिंग देशाच्या पश्चिमेला सिद्धिक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेला अमरकंटक पर्वत आणि तेथील नर्मदा अत्यंत रमणीय व पवित्र आहे. नर्मदा पदोपदी त्रैलोक्याला पवित्र करणारी असल्याचे सांगून त्यांनी नर्मदेच्या महात्म्याचे विविध संदर्भ कथेतून विशद केले. नर्मदेच्या जलात स्नान करून एक रात्र उपवास केल्यास पूर्वजांच्या अनेक पिढ्यांना मोक्षप्राप्ती होते, अशी पुराणातील महतीही त्यांनी कथन केली.
नर्मदेच्या दोन्ही तीरांवरील पवित्र तीर्थांचे महात्म्य एवढे व्यापक आहे की, त्याचे संपूर्ण वर्णन प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही करणे शक्य नाही. अमरकंटक पर्वतापासून समुद्रापर्यंत नर्मदेच्या दोन्ही तीरांवर असंख्य तीर्थक्षेत्रे असल्याचे सांगताना नर्मदा तटावर मंत्रजपाने पापशुद्धी, तर ध्यानाने अनंत फलप्राप्ती होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मिलिंद महाराज चवंडके यांनी आपल्या पायी नर्मदा परिक्रमेदरम्यान आलेले विविध आध्यात्मिक अनुभव व प्रसंग श्रोत्यांसमोर मांडले. त्यांच्या ओघवत्या निरूपणाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.
कथा सोहळ्याच्या आयोजक शारदाताई वायाळ यांनी स्वागत केले. हभप ज्योतीताई इंगळे यांनी स्वरचित आरती सादर करून नामगजर केला. शारदाताई वायाळ, रामेश्वर पवार, प्रीती पवार, संतोष जाधव, बेबी जाधव, वनिता जवंजाळ, दुर्गाताई सावके, संध्याताई कपाळे, उषाताई पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
कार्यक्रमास विजयाताई हिंगे, विमलाताई देशमुख, पार्वतीताई गाडेकर, भागिरथी सोळुंखे, सरलाताई नरवाडे, कमलाताई शिंदे, शकुंतला सोनवणे, पुष्परेखा शिरसाठ, बेबी राजे, सुनीता लोखंडे, आशा सोळुंखे, कमलबाई जेवूघाले यांच्यासह स्त्री-पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
https://jansattatimes.com/wp-content/uploads/2026/08/VID-20260829-WA0023.mp4

गजानन महाराज मंदिरात मिलिंद महाराजांचा सन्मान

चिखलीमध्ये प्रथमच नर्मदा पुराण कथा निरूपण करीत असल्याबद्दल माऊली नगर येथील श्री गजानन महाराज मंदिरात मिलिंद महाराज चवंडके यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या हस्ते महाआरतीही करण्यात आली. यावेळी दुर्गाताई सावके, ज्योतीताई भुतेकर, मंदाताई भुतेकर,सुभाष सावके, मनोहर रिंढे, गणेश भुतेकर, अनंतराव भुतेकर, मनोज खेडेकर, दिलीप काळे, नारायणराव जावळे यांच्यासह नर्मदा पुराण श्रवणासाठी परगावाहून आलेले विनायक लांडे, साहेबराव आहेर, दिगंबर आहेर, बंकटसिंग शिहरे तसेच भाविक उपस्थित होते.
Amarkantak Chikhli MilindMaharajChavandke Narmada Narmada Mahima Narmada puran
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026

Narmada Purana Katha Chikhli : ‘नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !

September 1, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.