Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»महाराष्ट्र»Narmada Mahima : ऋषींच्या तपश्चर्येने पावन नर्मदा; भक्तांच्या मनोरथांची सिद्धिदात्री
महाराष्ट्र

Narmada Mahima : ऋषींच्या तपश्चर्येने पावन नर्मदा; भक्तांच्या मनोरथांची सिद्धिदात्री

नर्मदा पुराणाच्या तृतीय पुष्पात मिलिंद महाराज चवंडके यांनी नर्मदामाई ही भक्तांच्या मनोरथांची सिद्धिदात्री असल्याची महती उलगडली.
Vinayak LandeBy Vinayak LandeAugust 28, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260828 WA0003
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Narmada Mahima : चिखली : कोट्यवधी ऋषींच्या तपश्चर्येने पावन झालेल्या नर्मदामाईच्या महिम्याने चिखलीतील भक्तिरसाला नवी उंची मिळाली. नर्मदा पुराणाच्या तृतीय पुष्पात मिलिंद महाराज चवंडके यांनी नर्मदामाई ही भक्तांच्या मनोरथांची सिद्धिदात्री असल्याची महती उलगडली.

Narmada Mahima : ऋषींच्या तपश्चर्येने पावन नर्मदा; भक्तांच्या मनोरथांची सिद्धिदात्री
Narmada Mahima : ऋषींच्या तपश्चर्येने पावन नर्मदा; भक्तांच्या मनोरथांची सिद्धिदात्री

 जागृत हनुमान मंदिर येथील सभामंडपात श्रावण महिन्यानिमित्त प्रथमच आयोजित नर्मदा कथा निरूपण सोहळ्याचे तृतीय पुष्प गुंफताना ते बोलत होते.

Narmada Mahima : ऋषींच्या तपश्चर्येने पावन नर्मदा; भक्तांच्या मनोरथांची सिद्धिदात्री
Narmada Mahima : ऋषींच्या तपश्चर्येने पावन नर्मदा; भक्तांच्या मनोरथांची सिद्धिदात्री

नर्मदेच्या दोन्ही तीरांवर असंख्य देवमंदिरे, आश्रम आणि पवित्र स्थाने असून, या भूमीवर आजही अनेक साधक विविध प्रकारे तपश्चर्या करीत आहेत. कोणी उग्र तप करतात, कोणी अग्निहोत्र व पंचाग्नी साधना करतात, तर कोणी केवळ जल अथवा वायूचा आहार घेत साधना करतात. अनेक साधक भक्तीमार्गाचा आश्रय घेऊन नर्मदामाईच्या सान्निध्यात आध्यात्मिक साधना करीत असल्याचे मिलिंद महाराजांनी सांगितले.

https://jansattatimes.com/wp-content/uploads/2026/08/VID-20260828-WA0004.mp4

नर्मदा तीरावर महादेवाचे भजन करणाऱ्यास पुनर्जन्माच्या बंधनातून मुक्ती मिळून शाश्वत ब्रह्माची प्राप्ती होते. मन आणि इंद्रिये वश करून नर्मदा तटावर एक महिना निवास करीत भगवान श्रीशंकराची उपासना करणारा साधक श्रीशंकररूप होतो, अशी नर्मदा माहात्म्यातील महतीही त्यांनी विशद केली.

नर्मदा माहात्म्याचे पठण करणाऱ्यांना उत्तम गती प्राप्त होते. धर्मप्राप्तीसाठी नर्मदेची उपासना अत्यंत फलदायी आहे. अनेक जन्मांनंतर प्राप्त झालेल्या मनुष्य जन्मात मोठ्या प्रयासाने भक्तीची उत्पत्ती होते. श्रीनर्मदा जलाने पवित्र झालेले भस्म शरीराला लावणारा साधक पापसमुदायापासून मुक्त होतो. नर्मदा तटावर केलेली साधना शीघ्र फलद्रुप होते, याचा अनुभव आजही अनेक साधक घेत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी नंदिश्वराने शिवालयात देव, ऋषी, सिद्ध आणि गंधर्वांच्या उपस्थितीत गायलेली ‘नंदिगीता’ संसार भयनाशक असून स्वर्ग आणि मोक्ष प्रदान करणारी पवित्र गीता असल्याचे मिलिंद महाराजांनी सांगितले. मार्कंडेय ऋषींनी नर्मदा पुराणात केलेले नंदिगीतेचे वर्णन भाविकांच्या अंतर्मनातील श्रद्धा, भक्ती आणि विश्वास दृढ करणारे असल्याचे त्यांनी विविध दाखल्यांसह स्पष्ट केले. त्यांच्या निरूपणाने उपस्थित भाविक भारावून गेले.

कथा सोहळ्याच्या आयोजक शारदाताई वायाळ यांनी स्वागत केले. हभप ज्योतीताई इंगळे यांनी स्वरचित आरती सादर करून नामगजर केला. गजानन पोफळे, सुषमाताई पोफळे, मंदाकिनीताई भुतेकर आणि ज्योतीताई भुतेकर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

कार्यक्रमास पुष्पाताई भुतेकर, नंदाताई भराड, रेखा इंगळे, मंदाकिनी ढवळे, रोहिणीताई देशमुख, कावेरीताई भराड, उषाताई पाटील, कासाबाई पवार, प्रमोदिनी वडे, चंद्रकला टकले आदी उपस्थित होते.

नर्मदा तटावरील साधना शीघ्र फलद्रुप

– नर्मदा तीरावर महादेवाचे भजन करणाऱ्यास पुनर्जन्मातून मुक्ती
– नर्मदा माहात्म्याचे पठण करणाऱ्यास उत्तम गती
– नर्मदा जलाने पवित्र केलेले भस्म धारण केल्यास पापक्षय
– नर्मदा तटावर एक महिना साधना केल्यास श्रीशंकराची प्रचिती
– नंदिगीता संसारभयाचा नाश करून मोक्षाचा मार्ग दाखविणारी

Bhakti Chikhli MilindMaharajChavandke Narmada Mahima Narmada puran Shravan
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026

Narmada Purana Katha Chikhli : ‘नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !

September 1, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.