Narmada Purana Katha Nirupan Sohala : चिखली : नर्मदेच्या तीरी नव्हे; चिखलीतील राऊतवाडीतच नर्मदामाईच्या भक्तीची अविरत धारा वाहू लागली. नर्मदा पुराणातील माहात्म्य, नर्मदाष्टकाचा स्वर आणि ‘नर्मदे हर’च्या जयघोषाने जागृत हनुमान मंदिराचा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला; नर्मदा पुराण कथा निरूपण सोहळ्याचा उत्साहात प्रारंभ झाला.

नर्मदामाईच्या नामघोषाने चिखलीतील राऊतवाडी भक्तिरसात न्हाऊन निघाली; नर्मदा पुराणाच्या अमृतकथेने भाविक मंत्रमुग्ध झाले. नर्मदामाहात्म्याच्या निरूपणातून परिक्रमेचे रोमांचकारी अनुभव उलगडताच उपस्थित भाविक भारावून गेले.

