Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Nagardevale : नागरदेवळ्यात मातृत्वाची सुरक्षित वाट; ४५ गर्भवतींची तपासणी, ३ ‘हाय रिस्क’
अहिल्यानगर

Nagardevale : नागरदेवळ्यात मातृत्वाची सुरक्षित वाट; ४५ गर्भवतींची तपासणी, ३ ‘हाय रिस्क’

माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करून ते शून्यावर आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाची सुरुवात केली
Vinayak LandeBy Vinayak LandeAugust 8, 2026Updated:August 8, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260808 WA0018
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Nagardevale : अहिल्यानगर : माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करून ते शून्यावर आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाची सुरुवात केली. याच पार्श्वभूमीवर आज नगर तालुक्यातील नागरदेवळे येथे अभियानांतर्गत गरोदर महिलांची विशेष आरोग्य तपासणी करण्यात आली. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. नीता सोनार यांनी केलेल्या तपासणीत ४५ गरोदर महिलांपैकी तीन महिला (हाय रिस्क) गर्भधारणेच्या असल्याचे निदान झाले. संबंधित महिलांच्या आरोग्यावर आरोग्य विभागाकडून विशेष लक्ष ठेवण्यात आले असून, त्यांना मोफत उपचार व आवश्यक मार्गदर्शन दिले जात आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. 

Nagardevale : नागरदेवळ्यात मातृत्वाची सुरक्षित वाट; ४५ गर्भवतींची तपासणी, ३ ‘हाय रिस्क’
Nagardevale : नागरदेवळ्यात मातृत्वाची सुरक्षित वाट; ४५ गर्भवतींची तपासणी, ३ ‘हाय रिस्क’
नागरदेवळे येथील आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या अभियानात गरोदर मातांची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली. गर्भावस्थेदरम्यान घ्यावयाची काळजी, संतुलित आहार, नियमित तपासणीचे महत्त्व आणि सुरक्षित प्रसूती याबाबत डॉ. सोनार यांनी मार्गदर्शन केले. अतिजोखमीच्या मातांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी आवश्यकतेनुसार कार्यवाही करण्यात आली.
Nagardevale : नागरदेवळ्यात मातृत्वाची सुरक्षित वाट; ६० गर्भवतींची तपासणी, ३ ‘हाय रिस्क’
Nagardevale : नागरदेवळ्यात मातृत्वाची सुरक्षित वाट; ४५ गर्भवतींची तपासणी, ३ ‘हाय रिस्क’
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद काकडे, देवगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हरिभाऊ गाढे, डॉ. सुमैय्या पठाण, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल घंगाळे, महिला आरोग्य पर्यवेक्षिका सुनीता काळे, आरोग्य सेवक सचिन चितळे, विवेक गुंड,  परिचारिका स्मिता गायकवाड, गटप्रवर्तक कल्पना शेंडे, आशासेविका आरती धाडगे, शेहनाज फकीर, विद्या बडेकर, सचिन पातारे आदी उपस्थित होते.

दर महिन्याला ९ तारखेला मोफत सेवा

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाची सुरुवात ९ जून २०१६ रोजी करण्यात आली. या अभियानांतर्गत गर्भावस्थेच्या दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीतील महिलांना दर महिन्याच्या ९ तारखेला मोफत आणि सर्वसमावेशक प्रसूतिपूर्व आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाते. ९ तारखेला सुट्टी असल्यास कामकाजाच्या दिवशी हे अभियान राबविले जाते.
Nagardevale : नागरदेवळ्यात मातृत्वाची सुरक्षित वाट; ६० गर्भवतींची तपासणी, ३ ‘हाय रिस्क’
Nagardevale : नागरदेवळ्यात मातृत्वाची सुरक्षित वाट; ४५ गर्भवतींची तपासणी, ३ ‘हाय रिस्क’

अभियानांतर्गत मोफत प्रसूतिपूर्व आरोग्य सेवा

गर्भवती मातांची आरोग्य तपासणी व प्रयोगशाळा चाचण्या, रक्तदाब व गर्भाच्या हृदयाचे ठोके तपासणी, आवश्यकतेनुसार सोनोग्राफी, अतिजोखमीच्या मातांना संदर्भसेवा, लोह-कॅल्शियमच्या सेवनाबाबत मार्गदर्शन तसेच संस्थात्मक प्रसूती, स्तनपान व प्रसूतीनंतरच्या काळजीबाबत समुपदेशन या सेवा अभियानांतर्गत मोफत दिल्या जातात.

मोफत सुविधांचा लाभ घ्यावा : डॉ. विशाल घंगाळे

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत गरोदर महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वतःची योग्य काळजी घ्यावी. सुरक्षित प्रसूतीसाठी गर्भवती महिलांनी नजीकच्या शासकीय आरोग्य केंद्राशी संपर्क साधून अभियानांतर्गत उपलब्ध असलेल्या मोफत आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा. तसेच सकस व संतुलित आहार घ्यावा, असे आवाहन समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल घंगाळे यांनी केले.
Administration Ahilyanagar Nagardevale Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan SafeMotherhood
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026

Narmada Purana Katha Chikhli : ‘नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !

September 1, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.