Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Hindu Janajagruti Samiti : हिंदुस्थान हिंदू राष्ट्र होण्याच्या निर्णायक टप्प्यावर : मिलिंद महाराज चवंडके
अहिल्यानगर

Hindu Janajagruti Samiti : हिंदुस्थान हिंदू राष्ट्र होण्याच्या निर्णायक टप्प्यावर : मिलिंद महाराज चवंडके

Vinayak LandeBy Vinayak LandeAugust 2, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260802 WA0012
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Hindu Janajagruti Samiti : अहिल्यानगर : “हिंदूंचा हिंदुस्थान हिंदू राष्ट्र होण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. राष्ट्र आणि धर्माच्या रक्षणासाठी हिंदूंनी संघटित राहून धर्माचरण करणे, ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन नाथ संप्रदायाचे संशोधक व प्रवचनकार मिलिंद महाराज चवंडके यांनी केले.

Hindu Janajagruti Samiti : हिंदुस्थान हिंदू राष्ट्र होण्याच्या निर्णायक टप्प्यावर : मिलिंद महाराज चवंडके
Hindu Janajagruti Samiti : हिंदुस्थान हिंदू राष्ट्र होण्याच्या निर्णायक टप्प्यावर : मिलिंद महाराज चवंडके
हिंदू जनजागृती समितीतर्फे नेप्ती नाका येथील मार्कंडेय संकुलात आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात गुरूपूजन, सामूहिक नामजप आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाच्या वाचनाने झाली.
Hindu Janajagruti Samiti : हिंदुस्थान हिंदू राष्ट्र होण्याच्या निर्णायक टप्प्यावर : मिलिंद महाराज चवंडके
Hindu Janajagruti Samiti : हिंदुस्थान हिंदू राष्ट्र होण्याच्या निर्णायक टप्प्यावर : मिलिंद महाराज चवंडके
यावेळी बोलताना मिलिंद महाराज चवंडके म्हणाले की, १९९० च्या दशकापासून डॉ. जयंत आठवले यांनी हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेला नवे बळ दिले. भविष्यातील हिंदू राष्ट्र हे राष्ट्रभक्त, सात्त्विक समाज आणि सात्त्विक शासनकर्त्यांवर आधारित असेल. प्रभू श्रीरामांच्या रामराज्याप्रमाणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याप्रमाणे आदर्श राष्ट्र उभारण्यासाठी समाजाने संघटित होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
हिंदू धर्म, भारतीय संस्कृती, गुरुकुल परंपरा, सोळा संस्कार, मंदिरे, सण-उत्सव आणि पारंपरिक मूल्यांचे जतन करण्याचे आवाहन त्यांनी केले. युवक-युवतींनी बलोपासना आणि स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घ्यावे, तसेच आपल्या परिसरात सुसंवाद, आपुलकी आणि सामाजिक ऐक्य वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.
दररोज नामस्मरण, उपासना, मंदिर दर्शन, धर्मकार्यात सहभाग आणि आई-वडिलांसह गुरूंचा सन्मान करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. धर्माभिमान, सात्त्विक जीवनशैली आणि सामाजिक जबाबदारी यांचा स्वीकार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
Hindu Janajagruti Samiti : हिंदुस्थान हिंदू राष्ट्र होण्याच्या निर्णायक टप्प्यावर : मिलिंद महाराज चवंडके
Hindu Janajagruti Samiti : हिंदुस्थान हिंदू राष्ट्र होण्याच्या निर्णायक टप्प्यावर : मिलिंद महाराज चवंडके
यावेळी हिंदू जनजागृती समितीचे रामेश्वर भुकन यांनीही मार्गदर्शन करताना देश आणि धर्मासमोरील विविध आव्हानांचा उल्लेख केला. समाजाने जागरूक राहून देश-धर्मरक्षणासाठी कृतीशील भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रिष्मा सुपलकर यांनी केले. त्यांनीच आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनायक बत्तीन, परमेश्वर गायकवाड, साईराम देवनपेल्ली, मयुर म्याना, शुभदा बत्तीन, मनीषा साळुंके, सविता झावरे, सीमा बडवे यांच्यासह अनेक साधक-साधिकांनी परिश्रम घेतले.
Ahilyanagar GuruPurnima Hindu Janajagruti Samiti India Maharashtra MilindMaharajChavandke
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Narmada Purana Katha Chikhli : ‘नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !

September 1, 2026

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.