Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Shishu Sangopan Sanstha Dindi : विठ्ठलनामाच्या गजरात’ शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी
अहिल्यानगर

Shishu Sangopan Sanstha Dindi : विठ्ठलनामाच्या गजरात’ शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी

भक्तिमय वातावरणात शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी अहिल्यानगर शहरातून दिमाखात निघाली.
Vinayak LandeBy Vinayak LandeJuly 23, 2026No Comments3 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260723 WA0027
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Shishu Sangopan Sanstha Dindi : अहिल्यानगर : विठ्ठलनामाचा अखंड गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि वारकरी वेशभूषेतील विद्यार्थ्यांचा उत्साह… या भक्तिमय वातावरणात शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी अहिल्यानगर शहरातून दिमाखात निघाली. दिंडीचे शहरभर नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत करत विद्यार्थ्यांच्या संस्कार, भक्ती आणि सामाजिक ऐक्याच्या संदेशाला भरभरून दाद दिली.

Shishu Sangopan Sanstha Dindi : विठ्ठलनामाच्या गजरात’ शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी
Shishu Sangopan Sanstha Dindi : विठ्ठलनामाच्या गजरात’ शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शिशु संगोपन संस्था संचालित सविता रमेश फिरोदिया प्रशाला, श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूल व संलग्न महेंद्र मधुकर वारे कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य दिंडी सोहळ्याने अहिल्यानगर शहर भक्तिमय झाले. बालवाडीपासून इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषेत सहभागी होत विठ्ठलनामाचा गजर, अभंग आणि टाळ-मृदंगाच्या साथीने शहरात भक्तिमय वातावरण निर्माण केले.
Shishu Sangopan Sanstha Dindi : विठ्ठलनामाच्या गजरात’ शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी
Shishu Sangopan Sanstha Dindi : विठ्ठलनामाच्या गजरात’ शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी
सविता रमेश फिरोदिया प्रशाला, वाडिया पार्क रोड येथून दिंडीला प्रारंभ झाला. दिंडी पूजन समारंभाचे उदघाटन कोतवाली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल चिटणीस यांच्या हस्ते झाले. यावेळी शिशु संगोपन संस्थेचे अध्यक्ष दिलीप गुंदेचा, उपाध्यक्ष दशरथ खोसे, सेक्रेटरी र. धों. कासवा, सहसेक्रेटरी राजेश झालानी, खजिनदार ॲड. विजय मुनोत, संजय डागा, एल. के. आव्हाड, बन्सी नन्नवरे, सीमा गुंदेचा, कांचन गावडे, विनोद कटारिया, प्राचार्य दत्तात्रय कसबे, मुख्याध्यापिका योगिता गांधी, विश्वस्त, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आदी उपस्थित होते.
Shishu Sangopan Sanstha Dindi : विठ्ठलनामाच्या गजरात’ शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी
Shishu Sangopan Sanstha Dindi : विठ्ठलनामाच्या गजरात’ शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी
शहरातील विविध मार्गांवरून दिंडी मार्गक्रमण करत असताना नागरिकांनी ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव आणि टाळ्यांच्या कडकडाटात दिंडीचे स्वागत केले. कोतवाली पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिंडीचे विशेष स्वागत करून विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. तसेच संस्थेचे खजिनदार ॲड. विजय मुनोत यांनी बारातोटी कारंजा परिसरात विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले.

संस्कार, शिस्त आणि सामाजिक मूल्यांची गरज

यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक नितीन देशमुख म्हणाले, “विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त आणि सामाजिक मूल्ये रुजविणारे दिंडीसारखे उपक्रम काळाची गरज आहेत. संत परंपरेने समाजाला समता, बंधुता आणि सेवाभावाची शिकवण दिली असून ही परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी शाळा आणि पालकांनी संयुक्तपणे पार पाडली पाहिजे.”
आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान देणे पुरेसे नसून त्यांच्यात सामाजिक जबाबदारी, चांगले संस्कार आणि राष्ट्रप्रेमाची भावना रुजविणे आवश्यक आहे. अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो, असेही देशमुख यांनी सांगितले.

भक्ती, शिस्त आणि एकात्मतेचा संदेश

अध्यक्ष दिलीप गुंदेचा म्हणाले, “विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच संस्कार, संस्कृती आणि सामाजिक मूल्यांची शिकवण देण्यासाठी संस्था सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. आषाढी एकादशीनिमित्त आयोजित ही दिंडी विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, शिस्त, एकात्मता आणि भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान निर्माण करणारी ठरली आहे.”
दिंडीत विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह वारकरी परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या विविध वेशभूषा साकारल्या. विठ्ठलनामाच्या अखंड गजराने आणि टाळ-मृदंगाच्या निनादाने परिसर दुमदुमून गेला. संस्कार, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा दिंडी सोहळा नागरिकांच्या कायम स्मरणात राहील, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
Ahilyanagar News Ashadhi Ekadashi Dindi Sohala Shishu Sangopan Sanstha Dindi Student Dindi
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार

July 24, 2026

Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

July 22, 2026

District Planning Committee : जिल्हा नियोजन समितीवर संदेश कार्लेंची वर्णी

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार

July 24, 2026

Shishu Sangopan Sanstha Dindi : विठ्ठलनामाच्या गजरात’ शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी

July 23, 2026

Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

July 22, 2026

District Planning Committee : जिल्हा नियोजन समितीवर संदेश कार्लेंची वर्णी

July 11, 2026

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.