Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
अहिल्यानगर

Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
Vinayak LandeBy Vinayak LandeJuly 22, 2026Updated:July 22, 2026No Comments3 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260722 WA0019
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Radhakrishna Vikhe Patil : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक विकासाला गती मिळाली असून, शेतकरी कल्याण, सिंचन, पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात राज्याने उल्लेखनीय प्रगती केली आहे. शेतकऱ्यांसाठी ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान तसेच कृषी पंपांच्या थकीत वीजबिलांची माफी असे ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतले आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त शिर्डी विधानसभा मतदारसंघातील प्रवरानगर येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ कार्यक्रमात ते बोलत होते.
Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, “स्व. अजित पवार यांनी जलसंपदा क्षेत्रात दूरदृष्टीचे निर्णय घेतले. निळवंडे धरणाच्या पुनर्वसनासाठी प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनीऐवजी आर्थिक मोबदला देण्याच्या निर्णयामुळे पुनर्वसन प्रक्रिया गतिमान झाली. त्यामुळे राज्यातील अनेक सिंचन प्रकल्प मार्गी लागण्यास मदत झाली.
Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जलसंधारण व सिंचन प्रकल्पांना शासनाचे प्राधान्य असल्याचे सांगून त्यांनी गोदावरी खोऱ्यातील पाण्याचा प्रभावी वापर, धरणांची क्षमता वाढविणे, कालव्यांची दुरुस्ती, निळवंडे कालव्याचे काम, साखळी योजना आदी माध्यमातून शेतकऱ्यांना शाश्वत पाणी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले.
शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत अहिल्यानगर जिल्हा राज्यात आघाडीवर असून, महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. एकल महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठीही विशेष उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री पीक विमा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि विविध कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर दिला जात आहे. कृषी विभागाचे काम अधिक गतिमान करण्यासाठी कृषी सहाय्यकांना संगणक संच उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही पालकमंत्र्यांनी नमूद केले.
पाणंद रस्ते, गावनकाशे आणि मूलभूत सुविधांच्या कामांना गती देतानाच सार्वजनिक हिताच्या कामांमध्ये अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी हे अभियान शासनाच्या विविध योजना व सेवा नागरिकांपर्यंत एकाच ठिकाणी पोहोचविणारे महत्त्वपूर्ण माध्यम असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्ह्यातील सर्व तालुके व मतदारसंघांमध्ये अशा स्वरूपाची शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी भूमी अभिलेख, महसूल, पुरवठा, कृषी, नगर विकास, ग्रामविकास, आरोग्य, कौशल्य विकास, पशुसंवर्धन आदी विभागांच्या विविध योजनांतील लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, राहाता नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर, जयश्री थोरात, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे आदी उपस्थित होते.
Agriculture Scheme Devendra Fadnavis Farmer Loan Waiver Maharashtra Radhakrishna Vikhe Patil
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Narmada Purana Katha Chikhli : ‘नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !

September 1, 2026

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.