Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Nagardevle : निरोगी आई, सुदृढ बाळाचा मंत्र; नागरदेवळेत सुरक्षित मातृत्व अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
अहिल्यानगर

Nagardevle : निरोगी आई, सुदृढ बाळाचा मंत्र; नागरदेवळेत सुरक्षित मातृत्व अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Nagardevle : निरोगी आई, सुदृढ बाळाचा मंत्र; नागरदेवळेत सुरक्षित मातृत्व अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Vinayak LandeBy Vinayak LandeJuly 9, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260709 WA0004
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Nagardevle : अहिल्यानगर : प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत नागरदेवळे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे गरोदर मातांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. या उपक्रमात सरस्वती हॉस्पिटलचे डॉ. अमोल जाधव यांनी गरोदर मातांची सखोल आरोग्य तपासणी करून गर्भावस्थेदरम्यान घ्यावयाची काळजी, संतुलित आहार, नियमित तपासणीचे महत्त्व तसेच सुरक्षित प्रसूतीबाबत मार्गदर्शन केले.

Nagardevle : निरोगी आई, सुदृढ बाळाचा मंत्र; नागरदेवळेत सुरक्षित मातृत्व अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Nagardevle : निरोगी आई, सुदृढ बाळाचा मंत्र; नागरदेवळेत सुरक्षित मातृत्व अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल घंगाळे, आरोग्य सेवक विवेक गुंड, प्रशांत लोंढे, सहायक परिचारिका स्मिता गायकवाड तसेच आशासेविका सोनाली धाडगे, कामिनी खेतमाळस, राझिया शेख, आशा धाडगे, मंगल दळवी, वैष्णवी काटकर आदी उपस्थित होत्या. उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांनी गरोदर महिलांना नियमित तपासणी, लसीकरण, योग्य आहार व आरोग्यविषयक सल्ल्याचे महत्त्व पटवून देत अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान म्हणजे काय?

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान (PMSMA) ही भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाची महत्त्वाकांक्षी योजना असून, प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला सर्व गरोदर महिलांना मोफत आणि दर्जेदार प्रसूतीपूर्व (ANC) तपासणी उपलब्ध करून देण्याचा या अभियानाचा उद्देश आहे.

अभियानाची प्रमुख वैशिष्ट्ये

– गरोदर महिलांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी.
– रक्तदाब, हिमोग्लोबिन, वजन, लघवी, रक्तातील साखर आदी आवश्यक तपासण्या.
– उच्च जोखमीच्या (High-Risk) गर्भधारणेची वेळेत ओळख व पुढील उपचारासाठी संदर्भ.
– योग्य आहार, लसीकरण, औषधे आणि सुरक्षित प्रसूतीबाबत मार्गदर्शन.
– माता व नवजात बालकांचे आरोग्य सुधारून माता-बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे.
Ahilyanagar Health Camp Nagardevle Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan Pregnancy Checkup
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026

Narmada Purana Katha Chikhli : ‘नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !

September 1, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.