Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Illegal Gutkha Seized : आलिशान कारमध्ये गुटख्याची तस्करी; एलसीबीच्या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त
अहिल्यानगर

Illegal Gutkha Seized : आलिशान कारमध्ये गुटख्याची तस्करी; एलसीबीच्या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त

Illegal Gutkha Seized : आलिशान कारमध्ये गुटख्याची तस्करी; एलसीबीच्या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त
Vinayak LandeBy Vinayak LandeJune 30, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260630 WA0007
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Illegal Gutkha Seized : अहिल्यानगर : अलिशान कारमधून सुरू असलेल्या प्रतिबंधित गुटख्याच्या काळ्या धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेने श्रीगोंद्यात धडक कारवाई करत तब्बल २८ लाख ८८ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली असून चार फरार आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

https://jansattatimes.com/wp-content/uploads/2026/06/VID-20260630-WA0013.mp4
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २९ जून रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गुप्त माहितीच्या आधारे मुंढेकरवाडी येथे छापा टाकला. त्यावेळी एका घराजवळ उभ्या असलेल्या आलिशान कारमधून दुसऱ्या कारमध्ये गुटख्याच्या गोण्या भरताना तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले.
https://jansattatimes.com/wp-content/uploads/2026/06/VID-20260630-WA0010.mp4
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अमोल रामदास जाधव (वय ३५), अनिल रतन कुरुमकर (वय ४३) आणि फरहान रेहमान बेपारी (वय २३) यांचा समावेश आहे. चौकशीत गुटखा सांगली जिल्ह्यातील जत येथून आणून श्रीगोंदा परिसरात विक्रीसाठी आणल्याची माहिती समोर आली. या प्रकरणात दीपक लोखंडे, अप्पू, माजीद आणि शोयेब तांबोळी हे आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी ६ लाख ३ हजार २०० रुपयांचा आरएमडी, विमल पान मसाला व सुगंधी तंबाखू, २२ लाख रुपयांच्या दोन चारचाकी गाड्या, ३० हजार १३० रुपयांची रोख रक्कम आणि ५५ हजार रुपयांचे तीन मोबाईल असा एकूण २८ लाख ८८ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार मनोज साखरे यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करत आहेत.

जप्त केलेला मुद्देमाल

– दोन चारचाकी वाहने – २२ लाख रुपये
– गुटखा व सुगंधी तंबाखू – ६ लाख ३ हजार २०० रुपये
– रोख रक्कम – ३० हजार १३० रुपये
– तीन मोबाईल – ५५ हजार रुपये
– एकूण जप्ती – २८ लाख ८८ हजार ३३० रुपये
Ahilyanagar Crime News Illegal Gutkha Seized Local Crime Branch Shrigonda
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026

Narmada Purana Katha Chikhli : ‘नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !

September 1, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.