Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Mahavitran : पेट्रोल-डिझेलला ब्रेक; महावितरणकडून ‘ईव्ही’ वापराला गती
अहिल्यानगर

Mahavitran : पेट्रोल-डिझेलला ब्रेक; महावितरणकडून ‘ईव्ही’ वापराला गती

Mahavitran : पेट्रोल-डिझेलला ब्रेक; महावितरणकडून 'ईव्ही' वापराला गती
Vinayak LandeBy Vinayak LandeMay 14, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260514 WA0009
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Mahavitran : अहिल्यानगर : इंधन बचतीसाठी महावितरणने पेट्रोल-डिझेल वाहनांना पर्याय म्हणून विद्युत वाहनांचा वापर सुरू केला असून अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्यासह सर्व संचालकांनी ईव्हीवर ‘स्विच’ केले आहे. राज्य शासनाच्या ईव्ही धोरणानुसार महावितरणच्या ताफ्यात नवीन ईव्ही वाहने दाखल झाली असून आता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयांसाठीही केवळ विद्युत वाहनांचा वापर सुनिश्चित करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.

Mahavitran : पेट्रोल-डिझेलला ब्रेक; महावितरणकडून 'ईव्ही' वापराला गती
Mahavitran : पेट्रोल-डिझेलला ब्रेक; महावितरणकडून ‘ईव्ही’ वापराला गती
पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी पेट्रोल व डिझेलऐवजी विद्युत वाहनांचा वापर करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. या आवाहनाला महावितरणने तत्काळ कृतीशील प्रतिसाद देत एक पाऊल पुढे टाकून विद्युत वाहनांचा वापर सुरू केला आहे.
राज्य शासनाच्या विद्युत वाहन धोरण २०२५ नुसार महावितरणने पेट्रोल-डिझेल वाहनांऐवजी ईव्ही वाहनांना प्राधान्य देत खरेदी प्रक्रिया राबविली. पहिल्या टप्प्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी विद्युत वाहनांची उपलब्धता करून देण्यात आली असून गेल्या आठवड्यात महावितरणच्या ताफ्यात आणखी दहा नवीन ईव्ही वाहने दाखल झाली आहेत.
दरम्यान, इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत उर्वरित विद्युत वाहनांच्या उपलब्धतेसाठी महावितरणकडून विशेष पाठपुरावा करण्यात आला. त्यानुसार गुरुवारी (दि. १४) संचालकांसाठी नवीन ईव्ही वाहने उपलब्ध झाली असून संचालक सचिन तालेवार (संचालन/प्रकल्प), अनुदीप दिघे (वित्त), योगेश गडकरी (वाणिज्य), राजेंद्र पवार (मानव संसाधन) यांनीही तत्काळ विद्युत वाहनांचा वापर सुरू केला आहे.
महावितरण अंतर्गत सर्व मुख्य अभियंता तसेच क्षेत्रीय अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व उपविभागप्रमुख अभियंत्यांच्या कार्यालयातही पेट्रोल-डिझेलऐवजी केवळ विद्युत वाहनांचा वापर होईल, याबाबतची प्रक्रिया वेगाने राबविण्यात येत आहे.
Devendra Fadanvis EV Mahavitran Narendra Modi Petrol- Diesel
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026

Narmada Purana Katha Chikhli : ‘नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !

September 1, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.