Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Radhakrishna Maharaj : शानदार घरं वाढली… पण स्वयंपाकघरातील संस्कार हरवले : राधाकृष्ण महाराज
अहिल्यानगर

Radhakrishna Maharaj : शानदार घरं वाढली… पण स्वयंपाकघरातील संस्कार हरवले : राधाकृष्ण महाराज

Radhakrishna Maharaj : शानदार घरं वाढली… पण स्वयंपाकघरातील संस्कार हरवले : राधाकृष्ण महाराज
Vinayak LandeBy Vinayak LandeApril 6, 2026Updated:April 6, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260406 WA00131
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Radhakrishna Maharaj : अहिल्यानगर : अलिकडे उभारल्या जाणाऱ्या शानदार बंगल्यांत भव्यता वाढत असली, तरी स्वयंपाकघरातील पवित्रता कमी होत चालली आहे, असे स्पष्ट मत प.पू. श्रीराधाकृष्ण महाराजांनी व्यक्त केले. स्वयंपाकघर हे ईश्वराचे प्राकट्य असून सात्त्विक अन्न व शुद्धता हीच घरातील समाधानाची खरी गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी सांगितले.

Radhakrishna Maharaj : शानदार घरं वाढली… पण स्वयंपाकघरातील संस्कार हरवले : राधाकृष्ण महाराज
Radhakrishna Maharaj : शानदार घरं वाढली… पण स्वयंपाकघरातील संस्कार हरवले : राधाकृष्ण महाराज
नगर येथील रामनिवास सतीशचंद्र इंदाणी व इंदाणी परिवारातर्फे नवीन टिळक रोडवरील नंदनवन लॉन्स येथे आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याच्या द्वितीय पुष्पगुंफण प्रसंगी ते बोलत होते.
राधाकृष्ण महाराज म्हणाले, “स्वयंपाकघर भव्य नव्हे, तर सदैव पवित्र असले पाहिजे. “रस के रूप में ईश्वर प्रगट होते है, उसे रसोई कहते हैं. रसोई घर ईश्वर का प्राकट्य है,” असे सांगत त्यांनी स्वयंपाकघराचे आध्यात्मिक महत्त्व विशद केले. स्नान केल्याशिवाय स्वयंपाकघरात पाऊल ठेवू नये. चप्पल घालून तर अजिबात स्वयंपाकघरात जाऊ नये. घरात प्रवेश केल्यावर “मंदिरात आलो” असे वाटले, तरच घर उभारण्याचे सार्थक आहे, असेही त्यांनी सांगितले.
Radhakrishna Maharaj
Radhakrishna Maharaj
महाराज पुढे म्हणाले की, अन्नमय कोषातूनच बाकी कोष कार्य करतात. अन्न उत्तम तर आनंद उत्तम. या आनंदातूनच प्रसन्नता निर्माण होते. स्वयंपाकघराच्या माध्यमातून परिवारातील सर्वांना ईश्वराकडे नेण्याचे अनमोल कार्य गृहिणी करतात. मात्र, अन्न सात्त्विक असणे अत्यंत आवश्यक आहे. स्वयंपाकघर पवित्र झाले, तर घरातील अर्ध्याहून अधिक समस्या कमी होतात, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वेदव्यासांनी १८ हजार श्लोकांचे भागवत महापुराण शुकदेवांना प्रदान केले आणि शुकदेवांनी राजा परिक्षितांना भागवत ऐकवले, अशी माहिती देत महाराजांनी सांगितले की, भागवत कथा कलीयुगातील भाविकांना सत्ययुगात राहण्याचा आनंद देते. दरम्यान, राधाकृष्ण महाराजांच्या अमृतवाणीमधून भागवत कथा श्रवण करण्यासाठी शहराच्या विविध भागातील भाविकांची मोठी गर्दी होत असून त्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे. भजनाचा आनंद लुटताना उपस्थित भाविक देहभान हरपून जात असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.

शुद्ध भावनेने करा भगवंताचे गुणगान

लाखो रुपये कमवणाऱ्यांना देखील उत्तम भोजनाचे खरे सुख मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आलिशान हॉटेलमधील भोजनाची तुलना घरातील भोजनाशी कधीच होऊ शकत नाही. कारण हॉटेलमध्ये प्रधानता धनास असते, तर घरात प्रधानता आपलेपणास, माये-प्रेमास असते.
भगवंताच्या सेवेमुळे जीवनातील दैन्यता दूर होते. मात्र सेवा करताना अहंकार नसावा. अहंकार आल्यास भगवंत सेवा स्वीकारत नाही, असे सांगून राधाकृष्ण महाराजांनी नारद मुनींसारख्या शुद्ध भावनेने भगवंताचे गुणगान करण्याचे आवाहन केले.
Ahilyanagar God Purity Radhakrishna Maharaj Spiritual Gathering
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

PM Surya Ghar Yojana : मोफत वीजेच्या दिशेने महाराष्ट्राची झेप; देशात अव्वल कामगिरी

June 2, 2026

LPG prices : महागाईचा स्फोट! एलपीजी दर दुप्पट; हॉटेल व्यवसाय अडचणीत

June 1, 2026

Rain Alert : मेघगर्जना, वादळी वारे अन् पाऊस; ३ जूनपर्यंत सावध राहा

May 31, 2026
Leave A Reply Cancel Reply

PM Surya Ghar Yojana : मोफत वीजेच्या दिशेने महाराष्ट्राची झेप; देशात अव्वल कामगिरी

June 2, 2026

LPG prices : महागाईचा स्फोट! एलपीजी दर दुप्पट; हॉटेल व्यवसाय अडचणीत

June 1, 2026

Rain Alert : मेघगर्जना, वादळी वारे अन् पाऊस; ३ जूनपर्यंत सावध राहा

May 31, 2026

Ahilyanagar News : ‘बालविवाह मुक्त’ अहिल्यानगरकडे दमदार वाटचाल; प्रशासनाच्या कारवाईमुळे ५५ विवाह रोखले

May 26, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.