Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Saklai Irrigation Scheme : ‘साकळाई’ला मंत्रिमंडळाची मंजुरी; विखेंनी बजावली महत्त्वाची भूमिका
अहिल्यानगर

Saklai Irrigation Scheme : ‘साकळाई’ला मंत्रिमंडळाची मंजुरी; विखेंनी बजावली महत्त्वाची भूमिका

Saklai Irrigation Scheme : 'साकळाई'ला मंत्रिमंडळाची मंजुरी; विखेंनी बजावली महत्त्वाची भूमिका
Vinayak LandeBy Vinayak LandeApril 1, 2026Updated:April 1, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260401 WA0016
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Saklai Irrigation Scheme : अहिल्यानगर : अहिल्यानगर व श्रीगोंदा तालुक्यातील ३२ गावांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या साकळाई उपसा सिंचन योजनेला आज (बुधवार) मंत्रिमंडळाची अंतिम मंजुरी मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे १२३४ कोटींच्या या प्रकल्पामुळे ९६०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून हिवरे झरे परिसरात जल्लोष साजरा करण्यात आला.

तब्बल अनेक दशकांपासून प्रलंबित असलेली ही योजना अखेर मंजूर झाल्याने परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी १६ एप्रिल २०१९ रोजी वाळकी येथे झालेल्या सभेत साकळाई योजनेला मंजुरी देण्याचा शब्द दिला होता. सात वर्षांनंतर तो शब्द पूर्ण झाल्याने नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
https://jansattatimes.com/wp-content/uploads/2026/04/VID-20260401-WA0013.mp4

विखे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

या योजनेस मंजुरी मिळण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासन पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला. तसेच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनीही केंद्र व राज्य पातळीवर सातत्याने प्रयत्न करत ही योजना मार्गी लावण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. स्थानिक कृती समितीनेही अनेक वर्षे संघर्ष, आंदोलने, बैठका व निवेदने देत हा विषय जिवंत ठेवला होता.
https://jansattatimes.com/wp-content/uploads/2026/04/VID-20260401-WA0011.mp4

१२३४ कोटींचा प्रकल्प; चार वर्षांत पूर्ण होणार

या उपसा सिंचन योजनेचा एकूण खर्च १२३४.१३ कोटी रुपये असून पुढील चार वर्षांत ही योजना पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. साकळाई उपसा सिंचन योजनेअंतर्गत म्हैसगाव येथून चार टप्प्यांत पाणी उचलून श्रीगोंदा व नगर तालुक्यातील ३२ गावांना पाणीपुरवठा केला जाणार आहे.
या प्रकल्पांतर्गत लघू पाझर तलाव, पाझर तलाव, सिमेंट नाला बंधारे, गाव तळी भरून घेणे यासारखी कामे करण्यात येणार आहेत. यासाठी १.६० टीएमसी पाणी सिंचनासाठी व ०.२० टीएमसी पाणी पिण्यासाठी देण्याचे नियोजन आहे.

२०८ मीटर उंचीवर पाणी उपसा

या प्रकल्पासाठी म्हैसगाव येथे तत्काळ पंपगृह उभारण्यात येणार असून त्यानंतर आणखी तीन पंपगृह बांधण्यात येतील. चार पंपगृह व तीन वितरिकांद्वारे हे काम पूर्ण केले जाणार आहे. यामध्ये २०८.३४ मीटर उंचीवर पाणी उपसा करून चिखली व घुटेवाडी येथील डोंगरावरील वितरण हौदात पाणी सोडण्याचे नियोजन आहे. प्रकल्पासाठी एकूण ३९.७१ हेक्टर जमीन आवश्यक असून त्यापैकी ३०.२३ हेक्टर खासगी जमीन संपादित केली जाणार आहे.

हिवरे झरे येथे जल्लोष

साकळाई योजनेला मंजुरी मिळताच हिवरे झरे परिसरात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त आनंदोत्सव साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर, गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला. अनेक वर्षांपासून “साकळाई योजना मंजूर झालीच पाहिजे” अशी मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.

 

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Shri Indresh Upadhyay : श्रीकृष्णाचं नामचिंतन हाच मुक्तीचा महामार्ग; इंद्रेश उपाध्याय यांचे प्रतिपादन

April 16, 2026

Dr. Babasaheb Ambedkar : बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच राष्ट्राचा खरा आधार ; जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन

April 14, 2026

Women’s Self-Help Groups : बचत गटांची ‘लोकल टू ग्लोबल’ झेप; अहिल्यानगरमध्ये विक्रमी कर्जवाटप

April 12, 2026
Leave A Reply Cancel Reply

Shri Indresh Upadhyay : श्रीकृष्णाचं नामचिंतन हाच मुक्तीचा महामार्ग; इंद्रेश उपाध्याय यांचे प्रतिपादन

April 16, 2026

Dr. Babasaheb Ambedkar : बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच राष्ट्राचा खरा आधार ; जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन

April 14, 2026

Women’s Self-Help Groups : बचत गटांची ‘लोकल टू ग्लोबल’ झेप; अहिल्यानगरमध्ये विक्रमी कर्जवाटप

April 12, 2026

Avdhut Dada Guru : दादागुरु महाराजांचे अहिल्यानगरीत प्रथमच आगमन; भक्तांसाठी पर्वणी

April 9, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.