Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»महाराष्ट्र»Narmada puran: ‘नर्मदा पुराणवर’ मराठीत प्रवचन; मिलिंद महाराज चवंडके देशात पहिले
महाराष्ट्र

Narmada puran: ‘नर्मदा पुराणवर’ मराठीत प्रवचन; मिलिंद महाराज चवंडके देशात पहिले

Narmada puran: 'नर्मदा पुराणवर' मराठीत प्रवचन; मिलिंद महाराज चवंडके देशात पहिले
Vinayak LandeBy Vinayak LandeFebruary 18, 2026Updated:March 9, 2026No Comments3 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20251213 WA0013
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Narmada puran : नर्मदा मातेच्या दोन्ही तिरांवर मराठी भाषेत ‘नर्मदा पुराण’चा दिव्य संदेश पोहोचवत अहिल्यानगरचे ज्येष्ठ साहित्यिक-पत्रकार हभप मिलिंद महाराज चवंडके यांनी देशात ऐतिहासिक कीर्तिमान प्रस्थापित केले आहे. नर्मदा किनाऱ्यावर मराठीत प्रवचन करणारे ते भारतातील पहिले प्रवचनकार ठरले असून, त्यांच्या या अभूतपूर्व कार्याबद्दल नर्मदा भक्तांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Narmada puran: 'नर्मदा पुराणवर' मराठीत प्रवचन; मिलिंद महाराज चवंडके देशात पहिले
Narmada puran: ‘नर्मदा पुराणवर’ मराठीत प्रवचन; मिलिंद महाराज चवंडके देशात पहिले
नर्मदेची पायी परिक्रमा करताना आणि त्यानंतरही आलेल्या अद्भुत आध्यात्मिक अनुभूतीतून हभप मिलिंद महाराज चवंडके यांनी प्रवचन सेवेच्या माध्यमातून ज्ञानयज्ञ सुरू केला. या प्रवचन सेवेचाच एक भाग म्हणून नर्मदा मातेच्या कृपेने त्यांना नर्मदा पुराणावर थेट नर्मदा नदीच्या घाटांवर प्रवचन करण्याची संधी लाभल्याची अंगावर शहारे आणणारी घटना घडली. पुणे जिल्ह्यातील पाटण येथील हभप कै. काशीनाथ महाराज भोसले यांचे सुपुत्र रामदास भोसले यांनी सेवानिवृत्त पोलिस अधिकारी दिलीप शिंदे आणि सेवानिवृत्त सेल्स टॅक्स निरीक्षक रामचंद्र तरडे यांच्या सहकार्याने बसद्वारे १५ दिवसांची नर्मदा परिक्रमा आयोजित केली होती. या परिक्रमेतील प्रत्येक मुक्कामी नर्मदा नदीच्या घाटांवर ‘नर्मदा पुराण’वर प्रवचन करण्यासाठी हभप मिलिंद महाराज चवंडके यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. परिक्रमेबरोबरच नर्मदा पुराण कथा निरूपण सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती रामदास भोसले यांनी नावनोंदणीच्या वेळी भाविकांना प्रत्यक्ष भेटून दिल्याने भाविक भारावून गेले. बसद्वारे नर्मदा परिक्रमा करतानाच नर्मदा पुराणाचे श्रवण करण्याची संधी मिळणे, हे महाभाग्य असल्याच्या भावना भाविकांनी व्यक्त केल्या.
Narmada puran: 'नर्मदा पुराणवर' मराठीत प्रवचन; मिलिंद महाराज चवंडके देशात पहिले
Narmada puran: ‘नर्मदा पुराणवर’ मराठीत प्रवचन; मिलिंद महाराज चवंडके देशात पहिले

आळंदीहून नर्मदा पुराण घेऊन परिक्रमेचा प्रारंभ

मुंबई येथील शोभा जोशी यांनी मराठीत अनुवादित केलेले आणि पुण्यातील प्रसाद प्रकाशनने प्रकाशित केलेले ‘नर्मदा पुराण’ हभप मिलिंद महाराज चवंडके यांनी आळंदी येथे जाऊन खरेदी केले. यावेळी त्यांनी माऊलींचे आशीर्वाद घेत आध्यात्मिक प्रेरणा स्वीकारली. त्यानंतर तीन वेळा पायी नर्मदा परिक्रमा केलेले पत्रकार विनायक निवृत्ती लांडे यांच्यासमवेत नगर येथून नर्मदा परिक्रमेच्या प्रवासाला प्रस्थान केले.

ओंकारेश्वर येथे संकल्प; नर्मदा मातेच्या कृपेची दिव्य अनुभूती

ओंकारेश्वर येथे नर्मदा नदीच्या पात्राजवळ सर्व भाविकांकडून उजव्या हातात नर्मदा जल घेऊन परिक्रमेचा संकल्प करण्यात आला. संकल्पानंतर अर्पण केलेले जल नर्मदेत सोडल्यानंतर काही क्षणांतच नदीचे पाणी संकल्प स्थळापर्यंत येऊन पोहोचले. हा अद्भुत योग पाहून प्रत्यक्ष नर्मदा माता आपल्या भेटीस आल्याची दिव्य अनुभूती भाविकांनी घेतली. याच पवित्र स्थळी नर्मदा पुराण प्रवचन सेवेचा श्रीगणेशा झाला.

नर्मदा किनाऱ्यावरील पवित्र स्थळी प्रवचन सेवा

ओंकारेश्वर, मिठी तलाई येथील जोग महाराज आश्रम, गरूडेश्वर येथील प.पू. टेंबे स्वामी समाधी मंदिर परिसर, नेमावर येथील सिद्धेश्वर मंदिर प्रांगण, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची राजधानी महेश्वर तसेच नर्मदापुरम् येथील शेठानी घाट अशा विविध पवित्र स्थळी ‘नर्मदा पुराण’वर प्रवचन सोहळा पार पडला. प्रत्येक ठिकाणी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने प्रवचनाचा लाभ घेतला.

मध्यप्रदेशात मराठी प्रवचनाचे विशेष कौतुक

महेश्वर येथे निमाड सांस्कृतिक महोत्सवादरम्यान उपस्थित मध्यप्रदेश शासनाच्या अधिकाऱ्यांनी मराठी भाषेतील प्रवचनाचे विशेष कौतुक केले. “प्रादेशिक भाषांचा भारतीय संस्कृतीच्या जतनात मोठा वाटा आहे. नर्मदा किनारी मराठीत नर्मदा पुराणावर प्रवचन करणारे प्रवचनकार प्रथमच पाहत आहोत,” अशा शब्दांत त्यांनी गौरव केला. हिंदी भाषिक भाविक, साधू-संत आणि पुजारीवृंदांनीही या प्रवचन सेवेचे कौतुक केले.

अखिल भारतीय नर्मदा सेवा संघाकडून गौरव

अखिल भारतीय नर्मदा सेवा संघाचे अहिल्यानगर येथील महासचिव मिलिंद भारदे यांनी नर्मदा किनारी मराठी भाषेत नर्मदा पुराणावर प्रवचन होणे ही ऐतिहासिक घटना असल्याचे सांगितले. हभप मिलिंद महाराज चवंडके हे असे प्रवचन करणारे भारतातील पहिले प्रवचनकार ठरल्याचे त्यांनी नमूद करत संघातर्फे त्यांचा गौरव व अभिनंदन करण्यात आले.

भाविकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू; प्रवचन सेवेबद्दल कृतज्ञता

या परिक्रमेतील पुणे, नाशिक व भिवंडी परिसरातील भाविकांनी नर्मदा किनारी मराठी भाषेत नर्मदा पुराण ऐकण्याचा लाभ मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. प्रवचनकार हभप मिलिंद महाराज चवंडके यांच्यामुळे मातृभाषेत नर्मदा पुराण श्रवण करण्याचे भाग्य लाभल्याची भावना व्यक्त करताना अनेक भाविकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
Ahilyanagar Maharashtra MP Narmada Narmada puran Omkareshwar Pune Sermon
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार

July 24, 2026

Shishu Sangopan Sanstha Dindi : विठ्ठलनामाच्या गजरात’ शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी

July 23, 2026

Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

July 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार

July 24, 2026

Shishu Sangopan Sanstha Dindi : विठ्ठलनामाच्या गजरात’ शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी

July 23, 2026

Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

July 22, 2026

District Planning Committee : जिल्हा नियोजन समितीवर संदेश कार्लेंची वर्णी

July 11, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.