PM Kisan Yojana : पीएम किसान याेजनेचा (PM Kisan Yojana)२२ वा हप्ता कधी येणार, असा प्रश्न विचारला जात असताना महत्त्वाची अपडेट समाेर आली आहे. किसान सन्मान निधीचा हप्ता सरकारकडून काेणत्याही क्षणी जमा हाेईल. मात्र, त्याआधी शेतकऱ्यांनी केवायसी (KYC)करणे अनिवार्य आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या (Farmer)खात्यात पीएम किसान निधीची रक्कम जमा हाेणार नाही.
अवश्य वाचा : शिक्षकी पेशाला काळीमा; चार अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

पीएम किसान निधीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळत असताे. सध्या फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात किसान सन्मान निधी मिळण्याचे संकेत आहे. केंद्र सरकारकडून या योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात ६,००० रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात, जे दर चार महिन्यांनी थेट लाभार्थी खात्यात जमा होतात. मात्र, त्यासाठी शेतकऱ्यांना किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य असून, केवायसी पूर्ण न केल्यास हप्ता जमा होत नाही. त्यामुळे सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी तत्काळ केवायसी पूर्ण करावी, अन्यथा निधी अडकण्याचा धोका आहे.

नक्की वाचा : गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर कत्तल; ‘या’ जिल्ह्यातून आठ जण हद्दपार
केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात २१ हप्ते जमा झाले आहेत. त्यानंतर शेतकरी २२व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. फेब्रुवारी महिन्यात २२वा हप्ता येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

अशी करा केवायसी
शेतकऱ्यांनी केवायसी करण्यासाठी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे. यानंतर तुम्हाला फार्मर्स कॉर्नर या सेक्शनवर क्लिक करायचे आहे. यानंतर ईकेवायसी या ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर तुमच्या आधारशी लिंक मोबाईल नंबर टाकायचा आहे. यानंतर तुम्हाला ओटीपी टाकायचा आहे. ओटीपी टाकल्यानंतर ईकेवायसी पूर्ण होणार आहे.