Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Navratri Festival : मातृशक्तीचा सन्मान हाच नवरात्रोत्सवाचा खरा धर्म
अहिल्यानगर

Navratri Festival : मातृशक्तीचा सन्मान हाच नवरात्रोत्सवाचा खरा धर्म

Vinayak LandeBy Vinayak LandeOctober 12, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20261012 WA0011
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Navratri Festival : अहिल्यानगर : मातृशक्तीचा सन्मान, स्त्रीशक्तीचा गौरव आणि आदिशक्तीची आराधना हाच नवरात्रोत्सवाचा खरा आत्मा आहे. आदिशक्तीचा जागर म्हणजे स्त्रीतत्त्वाचे जागरण असून, नवरात्रातून स्त्रीशक्तीच्या सामर्थ्याचा आणि सन्मानाचा दिव्य संदेश समाजापर्यंत पोहोचतो, असे प्रतिपादन हभप मिलिंद महाराज चवंडके यांनी केले.

Navratri Festival : मातृशक्तीचा सन्मान हाच नवरात्रोत्सवाचा खरा धर्म
Navratri Festival : मातृशक्तीचा सन्मान हाच नवरात्रोत्सवाचा खरा धर्म

नगरमधील महाजन गल्ली येथील सनातन धर्मसभेच्या शारदीय व्याख्यानमालेचा संकल्पपूर्वक विधिवत प्रारंभ हभप मिलिंद महाराज चवंडके आणि सोनाली चवंडके यांच्या हस्ते करण्यात आला. वेदमूर्ती उमेश वाळुंजकर यांनी पौरोहित्य केले. देवी शारदेच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून प्रवचन सोहळ्याचा प्रारंभ झाला. वेदमूर्ती चकोर गुरू मुळे यांच्या वेदमंत्र पठणाने वातावरण भक्तिमय झाले.

नवरात्रोत्सवात कुलस्वामिनीची उपासना, आराधना आणि उपवास आपल्या कुटुंबातील परंपरा व रूढीनुसार श्रद्धापूर्वक करावेत, असे सांगून मिलिंद महाराज म्हणाले की, देवीच्या उपासनेत श्रद्धा, शास्त्राधार आणि विधिपूर्वक आचरण यांना महत्त्व आहे. नवरात्रीत देवीला अर्पण करावयाच्या फुलांच्या माळा, नैवेद्य आणि उपासनेच्या पद्धती याविषयी धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करावा. केवळ बाह्य स्वरूपापेक्षा भक्तीभाव आणि परंपरेचे योग्य आचरण महत्त्वाचे आहे.

कुटुंबातील सुख, शांती व समृद्धीसाठी कुमारिका पूजनाचे महत्त्व विशद करताना त्यांनी स्कंदपुराणातील संदर्भांचा उल्लेख केला. देवी उपासनेसाठी दुर्गाकवच, महिषासुरमर्दिनी स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, श्रीसूक्त, सप्तशृंगी स्तोत्र, अर्गला स्तोत्र आणि भवानी सहस्रनामावली यांसारख्या स्तोत्रांचे पठण व देवीचे ध्यान-प्रार्थना करण्याचे आवाहन त्यांनी केले. कुलदेवतेवरील श्रद्धा दृढ करून कुटुंबाच्या कल्याणासाठी संकल्पपूर्वक उपासना करावी, असेही त्यांनी सांगितले.

नाथभक्तांकडून नवरात्रीत नाथपंथीय अनुष्ठान केले जाते, तसेच श्रीरामरक्षेचेही अनुष्ठान केले जाते, असे नमूद करून ते म्हणाले की, आदिमाता आदिशक्तीपासून प्रकट झालेले स्त्रीतत्त्व शिवशक्तीच्या स्वरूपात विश्वकल्याणाची प्रेरणा देते. स्त्रियांनी आपण आदिशक्तीचे अंश आहोत, हा अभिमान बाळगावा आणि नवरात्रोत्सवातून मिळणारा आत्मसन्मानाचा संदेश आचरणात आणावा.

प्रारंभी धर्मसभेचे मंत्री दिनकर देशमुख व खजिनदार उमेश नगरकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. उपाध्यक्ष हभप निळकंठ महाराज देशमुख यांनी मिलिंद महाराज चवंडके यांचा परिचय करून दिला. यावेळी विश्वस्त समीर उपाध्ये, उदय वैकर, अॅड. अच्युतराव पिंगळे, अनंतराव देशपांडे, विश्व हिंदू परिषदेचे विभागमंत्री सुनीलराव खिस्ती, जिल्हा सहमंत्री शरदराव नगरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हिरालाल पटेल, प्रवीण सोनी, सोन्याबापू मुदळ, मातृशक्तीच्या जिल्हा संयोजिका हिराताई शहापुरे, राणी भागानगरे, सुनंदा पानसरे, साधिका देशमुख यांच्यासह शहरातील विविध भागांतील प्रतिष्ठित भाविक उपस्थित होते. विश्वस्त रमेश देशपांडे यांनी आभार मानले.

Adishakti Ahilyanagar Matrushakti Milind Maharaj Chawandke Navratri Festival Sanatan
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Hospitalization : हॉस्पिटल्स बाराही महिने हाऊसफुल्ल; जीवनशैलीवर आत्मचिंतन हवे!

October 22, 2026

Ahilyanagar Farmers : शेतकऱ्यांसाठी दिलासा; कर्जमुक्तीच्या तिसऱ्या यादीत ४,४१५ नावे !

October 14, 2026

Shiv Charitra Katha : शिवाजी महाराज केवळ राजे नव्हे, तर राष्ट्रधर्माचे महानायक : स्वामी गोविंददेवगिरी महाराज

October 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Hospitalization : हॉस्पिटल्स बाराही महिने हाऊसफुल्ल; जीवनशैलीवर आत्मचिंतन हवे!

October 22, 2026

Ahilyanagar Farmers : शेतकऱ्यांसाठी दिलासा; कर्जमुक्तीच्या तिसऱ्या यादीत ४,४१५ नावे !

October 14, 2026

Navratri Festival : मातृशक्तीचा सन्मान हाच नवरात्रोत्सवाचा खरा धर्म

October 12, 2026

Shiv Charitra Katha : शिवाजी महाराज केवळ राजे नव्हे, तर राष्ट्रधर्माचे महानायक : स्वामी गोविंददेवगिरी महाराज

October 5, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.