Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Shiv Charitra Katha : शिवाजी महाराज केवळ राजे नव्हे, तर राष्ट्रधर्माचे महानायक : स्वामी गोविंददेवगिरी महाराज
अहिल्यानगर

Shiv Charitra Katha : शिवाजी महाराज केवळ राजे नव्हे, तर राष्ट्रधर्माचे महानायक : स्वामी गोविंददेवगिरी महाराज

शिवरायांचे चरित्र हे केवळ इतिहास नसून आजच्या पिढीला राष्ट्रकार्याची दिशा देणारी प्रेरणागाथा आहे, असे प्रतिपादन प. पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी केले.
Vinayak LandeBy Vinayak LandeOctober 5, 2026Updated:October 5, 2026No Comments4 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20261005 WA0010
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Shiv Charitra Katha : अहिल्यानगर : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना शौर्य, त्याग, धर्मनिष्ठा आणि राष्ट्रहिताचा अद्वितीय आदर्श निर्माण केला. शिवरायांचे चरित्र हे केवळ इतिहास नसून आजच्या पिढीला राष्ट्रकार्याची दिशा देणारी प्रेरणागाथा आहे, असे प्रतिपादन प. पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी केले.

Shiv Charitra Katha : शिवाजी महाराज केवळ राजे नव्हे, तर राष्ट्रधर्माचे महानायक : स्वामी गोविंददेवगिरी महाराज
Shiv Charitra Katha : शिवाजी महाराज केवळ राजे नव्हे, तर राष्ट्रधर्माचे महानायक : स्वामी गोविंददेवगिरी महाराज

श्रीरामकृष्ण सेवा ट्रस्टच्या वतीने नवीन टिळक रोडवरील नंदनवन लॉन्स येथे आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज चरित्र कथा सोहळ्याच्या पाचव्या व समारोपाच्या पुष्पात स्वामी गोविंददेवगिरी महाराज बोलत होते. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष नंदलाल मणियार, उपाध्यक्ष मोहनलाल मानधना, सचिव सुरेश चांडक, कोषाध्यक्ष मगनभाई पटेल तसेच सर्वश्री सुमित वर्मा, शरद झंवर, राजेंद्र चोपडा, रामेश्वर बिहाणी, अशोक कानडे, पुरूषोत्तम पटेल, मिलिंद चवंडके, प्रमोद गांधी, पुरूषोत्तम नावंदर यांच्यासह विविध भागांमधून आलेले शिवप्रेमी उपस्थित होते. नंदनवन उद्योग समूहाचे संजय जाधव यांनी स्वागताध्यक्ष या नात्याने स्वागत केले. श्री रामकृष्ण इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी म्हटलेली स्फूर्तीगीते वातावरण शिवमय करणारी ठरली.

स्वामी गोविंददेवगिरी महाराज म्हणाले, “शिवाजी महाराजांचे कार्य केवळ एका घराण्यापुरते किंवा प्रदेशापुरते मर्यादित नव्हते. हिंदू समाजाच्या श्रद्धास्थानांचे रक्षण आणि स्वराज्याची स्थापना हा त्यांच्या कार्याचा व्यापक हेतू होता.” मंदिरांच्या रक्षणासह गोव्यातील सप्तकोटीश्वर मंदिराच्या पुनरुज्जीवनाचाही त्यांनी उल्लेख केला. धर्माच्या नावाखाली होणाऱ्या जबरदस्तीच्या धर्मांतराला शिवरायांनी विरोध केल्याचेही त्यांनी सांगितले.
तानाजींच्या बलिदानातून मावळ्यांचे शौर्य उभे राहिले.

तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा संदर्भ देताना स्वामी म्हणाले की, “आधी लगीन कोंडाण्याचे, मग माझ्या रायबाचे,” या भावनेने तानाजींनी कोंडाण्यावर स्वारी केली. तानाजी धारातीर्थी पडल्यानंतरही सूर्याजी मालुसरे आणि शेलार मामांनी मावळ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले आणि कोंडाणा जिंकून घेतला. संकटाच्या क्षणी नेतृत्व आणि संघटनशक्ती कशी उभी करावी, याचा आदर्श शिवचरित्रातून मिळतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

शिवाजी महाराजांना मोगलांसह इंग्रज, डच, फ्रेंच आणि पोर्तुगीज अशा विविध सत्तांशी संघर्ष करावा लागला. त्याचबरोबर काही मराठा सरदारही त्यांच्या विरोधात उभे राहिले. मात्र शिवाजी महाराजांचे ध्येय केवळ स्वतःच्या घराण्यापुरते नसून स्वराज्य आणि व्यापक राष्ट्रधर्माच्या संकल्पनेशी जोडलेले होते, असे स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी सांगितले.

संघटित कार्यकर्ते हेच राष्ट्रकार्याचे बळ

बुंदेलखंडचे राजकुमार छत्रसाल यांना शिवाजी महाराजांनी संघटन मजबूत करण्याचा दिलेला सल्ला सांगताना स्वामी म्हणाले, “सर्वांच्या अंतःकरणात प्रेरणा निर्माण करून सर्वांना जोडत राहणे हेच खरे राष्ट्रकार्य आहे. सावधान कार्यकर्त्यांमुळेच कार्य सिद्धीस जाते.” शिवाजी महाराजांच्या धार्मिक आचरणाचाही त्यांनी उल्लेख केला. महादेवाची पूजा केल्याशिवाय अन्न ग्रहण न करणारे शिवराय धर्मनिष्ठ आणि राष्ट्रधर्मी व्यक्तिमत्त्व होते, असे त्यांनी सांगितले.

शिवराज्याभिषेकाने स्वराज्याला मिळाली राजमान्यता

शिवराज्याभिषेकाचे महत्त्व विशद करताना स्वामी गोविंददेवगिरी महाराज म्हणाले की, दीर्घकाळ महाराष्ट्राला स्वतंत्र राजा नसल्याने निर्माण झालेली पोकळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने भरून निघाली. धर्म, संस्कृती आणि राष्ट्राच्या पुनरुज्जीवनासाठी काशीचे पंडित गागाभट्ट यांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक व्हावा, अशी भूमिका मांडली. त्यानंतर रायगडावर वेदमंत्रांच्या घोषात आणि मंगलवाद्यांच्या निनादात भव्य शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला.
रायगडाच्या उभारणीत हिरोजी इंदुलकर यांनी दिलेल्या योगदानाचाही स्वामींनी गौरव केला. गडाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर महाराजांनी हिरोजींना “काय पाहिजे, ते माग” असे सांगितले. त्यावेळी हिरोजींनी जगदीश्वर मंदिराच्या पायरीवर आपले नाव कोरण्याची इच्छा व्यक्त केली. सेवाभावाचे प्रतीक असलेली ‘सेवेसी तत्पर हिरोजी इंदुलकर’ ही नोंद आजही त्यांच्या निःस्वार्थ कार्याची साक्ष देत असल्याचे स्वामींनी सांगितले.

शिवराज्याभिषेकाने वातावरण शिवमय

समारोपाच्या पुष्पानिमित्त श्री रामकृष्ण इंग्लिश मीडियम स्कूलच्या ७५ विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत शिवराज्याभिषेक सोहळ्याचे सादरीकरण केले. शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत सुमित संतोष वर्मा यांचे अश्वारूढ आगमन लक्षवेधी ठरले. पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्फूर्तीगीतांनी वातावरण शिवमय झाले.

राष्ट्रधर्मी मराठे, मावळे आणि सर्वसामान्य

जनतेच्या बळावर शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले. त्यांच्या जीवनातील राष्ट्रनिष्ठा, संघटन, शौर्य आणि धर्मसंरक्षणाची प्रेरणा आजच्या पिढीने घ्यावी,” असे आवाहन स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी केले. यावेळी सर्वश्री जगन्नाथ बजाज, प्रविण बजाज, दत्ता जाधव, किरण मणियार, हिरालाल पटेल, विनोद पटेल, बाली जोशी, राजूभाई पटेल, गोपाल मणियार, रविंद्र गुजराथी, प्रदिप पंजाबी, बजरंग दरक, विजय पंजाबी, राजेंद्र खंडेलवाल, राहुल जामगांवकर, हर्षल शहा, पंकज पटेल, मुकुंद जाजू, हर्षा गुजराथी, अभाविपचे आनंद गांधी, व्यंकटेश कुलकर्णी, प्रियांका माने, रोहन भुजबळ, प्रशिक दणाणे, हार्दिक पटेल आदींसह शहरातील आणि उपनगरातील हिंदू धर्म प्रेमी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Administration Ahilyanagar Chhatrapati Shivaji Maharaj Shiv Charitra Katha Swami Govinddev Giri Maharaj
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Hospitalization : हॉस्पिटल्स बाराही महिने हाऊसफुल्ल; जीवनशैलीवर आत्मचिंतन हवे!

October 22, 2026

Ahilyanagar Farmers : शेतकऱ्यांसाठी दिलासा; कर्जमुक्तीच्या तिसऱ्या यादीत ४,४१५ नावे !

October 14, 2026

Navratri Festival : मातृशक्तीचा सन्मान हाच नवरात्रोत्सवाचा खरा धर्म

October 12, 2026
Leave A Reply Cancel Reply

Hospitalization : हॉस्पिटल्स बाराही महिने हाऊसफुल्ल; जीवनशैलीवर आत्मचिंतन हवे!

October 22, 2026

Ahilyanagar Farmers : शेतकऱ्यांसाठी दिलासा; कर्जमुक्तीच्या तिसऱ्या यादीत ४,४१५ नावे !

October 14, 2026

Navratri Festival : मातृशक्तीचा सन्मान हाच नवरात्रोत्सवाचा खरा धर्म

October 12, 2026

Shiv Charitra Katha : शिवाजी महाराज केवळ राजे नव्हे, तर राष्ट्रधर्माचे महानायक : स्वामी गोविंददेवगिरी महाराज

October 5, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.