Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Mavala Warriors : मावळे लढले स्वराज्यासाठी; प्रचारक समर्पित राष्ट्रासाठी!
अहिल्यानगर

Mavala Warriors : मावळे लढले स्वराज्यासाठी; प्रचारक समर्पित राष्ट्रासाठी!

बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद यांच्यासारख्या वीरांनी दाखविलेला त्याग, निष्ठा आणि राष्ट्रधर्माची भावना आजही प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारी आहे.
Vinayak LandeBy Vinayak LandeOctober 3, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20261003 WA00051 1
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Mavala Warriors : अहिल्यानगर : स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावणारे मावळे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामर्थ्याचे खरे आधारस्तंभ होते. बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद यांच्यासारख्या वीरांनी दाखविलेला त्याग, निष्ठा आणि राष्ट्रधर्माची भावना आजही प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारी आहे. याच मावळ्यांच्या समर्पणातून राष्ट्रकार्यासाठी जीवन वाहून घेण्याची प्रेरणा घेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असंख्य प्रचारक कार्यरत आहेत, त्यामुळेच राष्ट्र अधिक सुरक्षित आणि संघटित होत आहे, असा संदेश प. पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी शिवचरित्रातून दिला.

नवीन टिळक रोडवरील नंदनवन लॉन्स येथे श्रीरामकृष्ण सेवा ट्रस्टच्या वतीने आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज चरित्र कथा सोहळ्याच्या चतुर्थ पुष्पात ते बोलत होते. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष नंदलाल मणियार, उपाध्यक्ष मोहनलाल मानधना, सचिव सुरेश चांडक, कोषाध्यक्ष मगनभाई पटेल यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.

नंदनवन उद्योग समूहाचे संजय जाधव यांनी स्वागताध्यक्ष म्हणून स्वागत केले. श्री रामकृष्ण इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला शिवरायांचा पाळणा उपस्थितांना स्फूर्तीदायी ठरला.

स्वामी गोविंददेवगिरी महाराज म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची निष्ठा, त्याग आणि धैर्य हे हिंदवी स्वराज्याच्या उभारणीमागचे मोठे सामर्थ्य होते. देव, देश, धर्म आणि रयतेसाठी जीवन समर्पित करून मावळे शिवरायांच्या सावलीप्रमाणे सदैव त्यांच्या सोबत राहिले. किल्ल्यांचे संरक्षण, शत्रूच्या हालचालींची माहिती मिळविणे, युद्धनीती आखणे, तहाच्या वेळी मुत्सद्देगिरी करणे आणि संकटाच्या प्रसंगी प्राणांची बाजी लावणे, अशी अनेक जबाबदाऱ्या त्यांनी निष्ठेने पार पाडल्या.

बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशीद यांच्या त्यागाचे स्मरण करताना स्वामीजींनी सांगितले की, पन्हाळगड ते विशाळगड हे अंतर अल्पावधीत पार करताना मावळ्यांनी दाखवलेले धैर्य आणि बाजीप्रभूंनी घोडखिंडीत शत्रूला रोखून धरत केलेले बलिदान हे स्वराज्याच्या इतिहासातील प्रेरणादायी अध्याय आहेत. शिवा काशीद यांनी शिवरायांच्या रक्षणासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. अशा वीरांचे चरित्र केवळ ऐकायचे किंवा वाचायचे नसते, तर त्यांच्या त्यागातून देव, देश आणि धर्मासाठी कार्य करण्याची प्रेरणा घ्यायची असते.

‘घोडखिंडी’ला ‘पावनखिंड’ हे नाव देण्यामागेही पुढील पिढ्यांना स्वराज्याची प्रेरणा मिळावी, हा शिवरायांचा दूरदृष्टीचा विचार होता, असे स्वामी गोविंददेवगिरी महाराजांनी स्पष्ट केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून कुलस्वामिनीवरील श्रद्धा, दृढ विश्वास, एकनिष्ठता, प्रामाणिकपणा, राष्ट्रप्रेम, धर्मप्रेम आणि हिंदवी स्वराज्याची तळमळ दिसून येते. शत्रूला गाफील ठेवून केलेला गनिमी कावा, विश्वासू हेरांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे आखलेले डावपेच, संकटाच्या काळातील नियोजन तसेच आरमार उभारण्याचे दूरदृष्टीचे कार्य यामुळे शिवरायांचे नेतृत्व असामान्य ठरते, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास दत्ता जाधव, किरण मणियार, हिरालाल पटेल, विनोद पटेल, बाली जोशी, राजूभाई पटेल, गोपाल मणियार, रविंद्र गुजराथी, प्रदीप पंजाबी, बजरंग दरक, विजय पंजाबी, राजेंद्र खंडेलवाल, राहुल जामगांवकर, हर्षल शहा, पंकज पटेल, मुकुंद जाजू, हर्षा गुजराथी आदी मान्यवरांसह शहर व उपनगरातील हिंदू धर्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिकांसह महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती.

Ahilyanagar Chhatrapati Shivaji Maharaj Maharashtra Mavala Warriors Swami Govinddev Giri Maharaj
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Hospitalization : हॉस्पिटल्स बाराही महिने हाऊसफुल्ल; जीवनशैलीवर आत्मचिंतन हवे!

October 22, 2026

Ahilyanagar Farmers : शेतकऱ्यांसाठी दिलासा; कर्जमुक्तीच्या तिसऱ्या यादीत ४,४१५ नावे !

October 14, 2026

Navratri Festival : मातृशक्तीचा सन्मान हाच नवरात्रोत्सवाचा खरा धर्म

October 12, 2026
Leave A Reply Cancel Reply

Hospitalization : हॉस्पिटल्स बाराही महिने हाऊसफुल्ल; जीवनशैलीवर आत्मचिंतन हवे!

October 22, 2026

Ahilyanagar Farmers : शेतकऱ्यांसाठी दिलासा; कर्जमुक्तीच्या तिसऱ्या यादीत ४,४१५ नावे !

October 14, 2026

Navratri Festival : मातृशक्तीचा सन्मान हाच नवरात्रोत्सवाचा खरा धर्म

October 12, 2026

Shiv Charitra Katha : शिवाजी महाराज केवळ राजे नव्हे, तर राष्ट्रधर्माचे महानायक : स्वामी गोविंददेवगिरी महाराज

October 5, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.