Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Sri Sathya Sai Rath Yatra :  पुष्पवृष्टी, टाळ-मृदंग अन् जयघोष… श्री सत्यसाईंच्या दिव्य पादुकांनी नगर भक्तिरंगात न्हाले
अहिल्यानगर

Sri Sathya Sai Rath Yatra :  पुष्पवृष्टी, टाळ-मृदंग अन् जयघोष… श्री सत्यसाईंच्या दिव्य पादुकांनी नगर भक्तिरंगात न्हाले

श्री सत्यसाईबाबांच्या दिव्य पादुकांसह आलेल्या प्रेमवाहिनी रथयात्रेचे शहरात जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.
Vinayak LandeBy Vinayak LandeJuly 4, 2026No Comments3 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260704 WA0013 1
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Sri Sathya Sai Rath Yatra : अहिल्यानगर : श्री सत्यसाईबाबांच्या दिव्य पादुकांसह आलेल्या प्रेमवाहिनी रथयात्रेचे शहरात जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. जिल्ह्याच्या वतीने काष्टी येथे स्वागत झाल्यानंतर कायनेटिक चौकापासून मोटारसायकल व सायकल रॅलीसह रथ नगरमध्ये दाखल झाला. सक्कर चौकात रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. श्री सत्यसाईबाबांच्या जयघोषात निघालेल्या शोभायात्रेत घोडेस्वार, तुतारी, बँड पथक, महिला लेझीम, वारकरी विद्यार्थी, बालविकासचा बालचमू आणि शेकडो साईभक्त सहभागी झाले. नवीन टिळक रोडवरील नंदनवन लॉन्स येथे रथयात्रेचे स्वागत करण्यात आले.

Sri Sathya Sai Rath Yatra :  पुष्पवृष्टी, टाळ-मृदंग अन् जयघोष... श्री सत्यसाईंच्या दिव्य पादुकांनी नगर भक्तिरंगात न्हाले
Sri Sathya Sai Rath Yatra :  पुष्पवृष्टी, टाळ-मृदंग अन् जयघोष… श्री सत्यसाईंच्या दिव्य पादुकांनी नगर भक्तिरंगात न्हाले

रथामधील दिव्य पादुकांचे वेदमंत्रांच्या घोषात विधिवत पूजन करण्यात आले. वेदमूर्ती उमेश वाळुंजकर यांनी पौरोहित्य केले. विविध धर्मगुरूंनी सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थना केली. वेदसार पठण, अथर्वशीर्ष, भजन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झाले. शहरातील कलाकारांनी सादर केलेल्या नृत्याविष्कारांना भाविकांनी उत्स्फूर्त दाद दिली. सत्यसाई बालविकासच्या विद्यार्थ्यांनी आणि साईभक्तांनी सादर केलेल्या भजनांनी उपस्थितांना भक्तिरसात तल्लीन केले. कार्यक्रमानंतर सर्वांनी भोजनप्रसादाचा लाभ घेतला.

Sri Sathya Sai Rath Yatra :  पुष्पवृष्टी, टाळ-मृदंग अन् जयघोष... श्री सत्यसाईंच्या दिव्य पादुकांनी नगर भक्तिरंगात न्हाले
Sri Sathya Sai Rath Yatra :  पुष्पवृष्टी, टाळ-मृदंग अन् जयघोष… श्री सत्यसाईंच्या दिव्य पादुकांनी नगर भक्तिरंगात न्हाले

रथयात्रेच्या दुसऱ्या दिवशी पहाटे झालेल्या सवाद्य नगर संकीर्तनाने शहराला भक्तीची मंगलमय जाग दिली. नंदनवन लॉन्स येथून सुरू झालेल्या नगर संकीर्तनाने आंबेडकर स्मारक, हॉटेल यश पॅलेस, आनंदऋषीजी हॉस्पिटल परिसर, मातोश्री पेट्रोलियम, जुना लोखंडी पूल आणि आगरकर मळा मार्गे पुन्हा नंदनवन लॉन्स गाठले. टाळ, मृदंग आणि डफलीच्या सुरेल साथीवर श्रीगणेश, भगवान शंकर, प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण, भगवान विष्णू, श्रीदत्तात्रेय आणि देवीची भजने गात साईभक्तांनी संपूर्ण परिसर साईनामाने दुमदुमून टाकला.

https://jansattatimes.com/wp-content/uploads/2026/07/VID-20260704-WA0012.mp4

विशेष म्हणजे आनंदऋषीजी हॉस्पिटलसमोर थांबून उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या उत्तम आरोग्यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. साईभक्तांची ही भावपूर्ण प्रार्थना पाहून रुग्णांचे नातेवाईकही भारावून गेले. सकाळी वेदमंत्रांच्या घोषात पादुकांचे पूजन करण्यात आले, तर शहर व उपनगरातील भाविकांनी शिस्तबद्ध रांगेत दर्शन घेऊन दिव्य पादुकांचा आशीर्वाद घेतला.

रथयात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी श्री सत्यसाई सेवा संघटनेचे जिल्हाप्रमुख अशोक कुरापाटी, अध्यात्मिक प्रमुख प्रा. ज्योती कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी, स्वयंसेवक आणि शेकडो साईभक्तांनी परिश्रम घेतले. भक्ती, सेवा आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारा हा दोन दिवसांचा सोहळा नगरकरांच्या कायम स्मरणात राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

महापौर म्हणाल्या… ‘नगरकरांचे भाग्य’

महापौर ज्योती गाडे यांनी दिव्य पादुकांचे दर्शन घेऊन पूजन केले. त्यांचा श्री सत्यसाई सेवा संघटनेच्या वतीने शाल व ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्या म्हणाल्या, “मानवता, बंधुत्व आणि ईश्वरी पितृत्वाचा संदेश देणाऱ्या श्री सत्यसाई प्रेमवाहिनी रथयात्रेचे नगरमध्ये आगमन हे नगरकरांचे भाग्य आहे. सत्य, धर्म, शांती, प्रेम आणि एकतेची मूल्ये समाजात रुजविण्याचे कार्य ही रथयात्रा करत आहे. स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देत श्री सत्यसाई सेवा संघटनेने समाजोपयोगी उपक्रम राबविला आहे.”

रथयात्रेची ठळक वैशिष्ट्ये
– दिव्य पादुकांच्या रथावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी.
– टाळ, मृदंग, तुतारी आणि बँडच्या निनादात भव्य शोभायात्रा.
– मोटारसायकल व सायकल रॅलीत युवकांचा उत्स्फूर्त सहभाग.
– विविध धर्मगुरूंच्या उपस्थितीत सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थना.
– वेदसार, अथर्वशीर्ष, भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी.
– पहाटेच्या सवाद्य नगर संकीर्तनाने संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले.
– आनंदऋषीजी हॉस्पिटलसमोर रुग्णांच्या आरोग्यासाठी विशेष प्रार्थना.
– हजारो भाविकांनी दिव्य पादुकांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.

Ahilyanagar Rath Yatra Sai Baba Spiritual Sri Sathya Sai Rath Yatra
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026

Narmada Purana Katha Chikhli : ‘नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !

September 1, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.