Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»महाराष्ट्र»Pandharpur Wari Health Camp : वारी मार्गावर आता आरोग्याची कवचकुंडले; ‘चरण सेवा’ला प्रारंभ
महाराष्ट्र

Pandharpur Wari Health Camp : वारी मार्गावर आता आरोग्याची कवचकुंडले; ‘चरण सेवा’ला प्रारंभ

Pandharpur Wari Health Camp : वारी मार्गावर आता आरोग्याची कवचकुंडले; 'चरण सेवा'ला प्रारंभ
Vinayak LandeBy Vinayak LandeJune 29, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260629 WA0010
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Pandharpur Wari Health Camp : अहिल्यानगर : आषाढी वारीत लाखो वारकऱ्यांच्या आरोग्यरक्षणासाठी राज्य यंत्रणा सज्ज झाली असून, ‘भक्ती विठोबाची… सेवा आरोग्याची’ या संकल्पनेतून ‘चरण सेवा’ उपक्रमाला प्रारंभ झाला आहे. पालखी मार्गावरील ४०० ठिकाणी १२ हजारांहून अधिक वैद्यकीय कर्मचारी वारकऱ्यांच्या सेवेसाठी कार्यरत राहणार आहेत.

Pandharpur Wari Health Camp : वारी मार्गावर आता आरोग्याची कवचकुंडले; 'चरण सेवा'ला प्रारंभ
Pandharpur Wari Health Camp : वारी मार्गावर आता आरोग्याची कवचकुंडले; ‘चरण सेवा’ला प्रारंभ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमात सातारा, पुणे, सोलापूर, नाशिक, बुलढाणा, अकोला, जालना, बीड, नांदेड, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या ११ जिल्ह्यांतील जिल्हा प्रशासन, शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालये, विविध आरोग्य संस्था, सेवाभावी संघटना आणि स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. १२ हजारांहून अधिक डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवक वारकऱ्यांच्या सेवेसाठी कार्यरत राहणार आहेत.
आषाढी वारीत दररोज अनेक किलोमीटर पायी चालल्यामुळे वारकऱ्यांच्या पायांवर येणारा ताण कमी करण्यासाठी सुमारे ३ हजार लिटर औषधी आयुर्वेदिक तेलाद्वारे पायांची मालिश, फिजिओथेरपी, फोड व सूजेवर उपचार तसेच आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी रुग्णालयात संदर्भित करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पालखी मार्गावर गरजेनुसार रुग्णवाहिका सेवाही सज्ज ठेवण्यात आली आहे.
यासोबतच ८ आरोग्य जनजागृती रथांद्वारे शासनाच्या विविध आरोग्य योजना, स्वच्छतेचे महत्त्व, संसर्गजन्य व पावसाळ्यातील आजारांपासून बचाव आणि निरोगी जीवनशैलीबाबत जनजागृती केली जाणार आहे. निवडक ठिकाणी वारकऱ्यांसाठी योगसत्रांचेही आयोजन करण्यात आले आहे.
गतवर्षी या उपक्रमातून १ लाख ७५ हजारांहून अधिक वारकऱ्यांना थेट आरोग्य सेवा, तर १० लाखांपेक्षा अधिक नागरिकांपर्यंत आरोग्य जनजागृतीचा संदेश पोहोचविण्यात आला होता. यंदा अधिक व्यापक नियोजन करून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सर्व वारकरी, दिंडी प्रमुख आणि पालखी मार्गावरील नागरिकांना या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले असून, “वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा” या भावनेतून ‘चरण सेवा’ अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
Administration Ahilyanagar Ashadhi Wari District Administration Maharashtra Pandharpur Wari Health Camp
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026

Narmada Purana Katha Chikhli : ‘नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !

September 1, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.