Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»LPG prices : महागाईचा स्फोट! एलपीजी दर दुप्पट; हॉटेल व्यवसाय अडचणीत
अहिल्यानगर

LPG prices : महागाईचा स्फोट! एलपीजी दर दुप्पट; हॉटेल व्यवसाय अडचणीत

गॅस, इंधन आणि वाहतूक खर्चात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरिंग व्यवसायिकांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
Vinayak LandeBy Vinayak LandeJune 1, 2026No Comments1 Min Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
images 19
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

LPG prices : व्यावसायिक एलपीजी गॅसच्या दरांनी अवघ्या पाच महिन्यांत दुप्पट उसळी घेतल्याने हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरिंग व्यवसायासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. पेट्रोल-डिझेलनंतर आता गॅस दरवाढीने महागाईच्या आगीत आणखी तेल ओतले आहे.

LPG prices : महागाईचा स्फोट! एलपीजी दर दुप्पट; हॉटेल व्यवसाय अडचणीत
LPG prices : महागाईचा स्फोट! एलपीजी दर दुप्पट; हॉटेल व्यवसाय अडचणीत
नव्या दरानुसार, दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ४२ रुपयांची वाढ होऊन तो आता ३,११३.५० रुपयांना मिळणार आहे. कोलकात्यात सर्वाधिक ५३.५० रुपयांची वाढ झाली असून तेथील दर ३,२५५.५० रुपयांवर पोहोचले आहेत. केवळ मोठ्या सिलेंडरपुरतेच हे संकट मर्यादित नसून, ५ किलोच्या फ्री ट्रेड एलपीजी सिलेंडरच्या किमतीतही ११ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत हा सिलेंडर आता ८२१.५० रुपयांना मिळणार असून, विद्यार्थी, नोकरदार आणि एकटे राहणाऱ्या नागरिकांच्या खिशावर त्याचा थेट परिणाम होणार आहे.
विशेष म्हणजे, जानेवारी २०२६ मध्ये दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत १,६९१.५० रुपये होती. मात्र केवळ पाच महिन्यांत ती तब्बल १,४२२ रुपयांनी वाढून ३,११३.५० रुपयांवर पोहोचली आहे. या अभूतपूर्व दरवाढीमुळे व्यावसायिक वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

गॅस, इंधन आणि वाहतूक खर्चात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरिंग व्यवसायिकांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. वाढीव खर्चाचा भार ग्राहकांवर टाकायचा की स्वतः सहन करायचा, असा पेच अनेक व्यावसायिकांसमोर निर्माण झाला आहे.

Administration Citizen LPG Prices
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

PM Surya Ghar Yojana : मोफत वीजेच्या दिशेने महाराष्ट्राची झेप; देशात अव्वल कामगिरी

June 2, 2026

Rain Alert : मेघगर्जना, वादळी वारे अन् पाऊस; ३ जूनपर्यंत सावध राहा

May 31, 2026

Ahilyanagar News : ‘बालविवाह मुक्त’ अहिल्यानगरकडे दमदार वाटचाल; प्रशासनाच्या कारवाईमुळे ५५ विवाह रोखले

May 26, 2026
Leave A Reply Cancel Reply

PM Surya Ghar Yojana : मोफत वीजेच्या दिशेने महाराष्ट्राची झेप; देशात अव्वल कामगिरी

June 2, 2026

LPG prices : महागाईचा स्फोट! एलपीजी दर दुप्पट; हॉटेल व्यवसाय अडचणीत

June 1, 2026

Rain Alert : मेघगर्जना, वादळी वारे अन् पाऊस; ३ जूनपर्यंत सावध राहा

May 31, 2026

Ahilyanagar News : ‘बालविवाह मुक्त’ अहिल्यानगरकडे दमदार वाटचाल; प्रशासनाच्या कारवाईमुळे ५५ विवाह रोखले

May 26, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.