Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Rahuri Election : लाखांची आघाडी, विरोधकांचा धुव्वा; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा ऐतिहासिक विजय
अहिल्यानगर

Rahuri Election : लाखांची आघाडी, विरोधकांचा धुव्वा; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा ऐतिहासिक विजय

Rahuri Election : लाखांची आघाडी, विरोधकांचा धुव्वा; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा ऐतिहासिक विजय
Vinayak LandeBy Vinayak LandeMay 4, 2026Updated:May 4, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
images 97
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Rahuri Election  : अहिल्यानगर : राहुरी पोटनिवडणुकीत भाजपचे अक्षय कर्डिले यांनी १ लाख १२ हजार ५८७ मताधिक्याने ऐतिहासिक विजय मिळवत विरोधकांचा धुव्वा उडवला. २७ फेऱ्यांमध्ये पहिल्यापासून आघाडी कायम ठेवत भाजपने राहुरीतील आपला गड पुन्हा मजबूतपणे राखला

 Rahuri Election : लाखांची आघाडी, विरोधकांचा धुव्वा; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा ऐतिहासिक विजय
Rahuri Election : लाखांची आघाडी, विरोधकांचा धुव्वा; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा ऐतिहासिक विजय
अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल अखेर स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर भाजपने अक्षय कर्डिले यांच्यावर विश्वास टाकला होता. त्या विश्वासाला सार्थ ठरवीत अक्षय कर्डिले यांनी विरोधकांचा लाखोच्या मतांनी दारुण पराभव केला आहे.
राहुरी पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले हे महायुतीचे उमेदवार होते. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार ) उमेदवार गोविंद मोकाटे, वंचितचे संतोष चोळके आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे बंडखोर उमेदवार रावसाहेब खेवरे यांचे आव्हान होते. मात्र, अक्षय कर्डिले यांनी मतमोजणीत पहिल्या फेरीपासून आघाडी घेत विरोधकांचा सुपडा साफ केला. त्यामुळे भाजपच्या गोटात उत्साहाचे आणि समाधानाचे वातावरण आहे.
दरम्यान, आज सकाळी मतमोजणीला पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात होता. कडक बंदोबस्तात मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणी प्रक्रियेत पहिल्या फेरीपासूनच कर्डिले यांनी आपली आघाडी कायम ठेवली होती. आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मोठ्या फरकाने मागे टाकत अखेर १ लाख १२ हजार ५८७ मतांनी ऐतिहासिक विजय मिळवला.

मतदारांचा विश्वास जपणारच : कर्डिले

माझे वडील सामान्य लोकांमध्ये राहिले. त्यांनी त्यांचं आयुष्य लोकांच्या सेवेसाठी समर्पित केलं आणि आज त्याचं फळ म्हणून जनतेने आज मला एकटं सोडलं नाही. ही निवडणूक सामान्य जनतेने हातात घेतल्याने विजय सुरुवातीपासूनच निश्चित होता. मतदारांचा विश्वास मी शेवटपर्यंत जपणारच, अशी भावना अक्षय कर्डिले यांनी व्यक्त केली.
Ahilyanagar Akshay kardile BJP Rahuri Election
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026

Narmada Purana Katha Chikhli : ‘नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !

September 1, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.