Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Drug Free : ड्रग्समुक्त जिल्ह्यासाठी प्रशासनाचा कडक निर्धार; ५५ जणांवर गुन्हे दाखल
अहिल्यानगर

Drug Free : ड्रग्समुक्त जिल्ह्यासाठी प्रशासनाचा कडक निर्धार; ५५ जणांवर गुन्हे दाखल

Drug Free : ड्रग्समुक्त जिल्ह्यासाठी प्रशासनाचा कडक निर्धार; ५५ जणांवर गुन्हे दाखल
Vinayak LandeBy Vinayak LandeApril 29, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260429 WA0012
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Drug Free : अहिल्यानगर : जिल्ह्यात ड्रग्सविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून कारवाईसाठी तपास यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत अमली पदार्थांच्या ४० प्रकरणांमध्ये ५५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय नार्को को-ऑर्डिनेशन सेंटर समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये आदी उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी गिते म्हणाले, “शाळा व महाविद्यालये तसेच गर्दीच्या ठिकाणी पथनाट्यांच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवण्यावर भर द्यावा. तसेच ड्रग्स डिटेक्शन किट्स व टेस्टिंग केमिकल्स यांची उपलब्धता सुनिश्चित करून तपास यंत्रणेला अधिक सक्षम करावे. पोलीस विभाग, एनसीबी तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी केलेल्या कारवाईची माहिती एकत्रित करून अद्ययावत डेटाबेस तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. ड्रग्सविरोधी कारवाईत विभागांमधील समन्वय वाढवून प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात,”असेही त्यांनी स्पष्ट केले.

अशी झाली कारवाई

सहायक पोलीस निरीक्षक भोये म्हणाले, “जिल्ह्यात १ जानेवारी ते २८ एप्रिल २०२६ या कालावधीत अमली पदार्थ बाळगणाऱ्या ९ प्रकरणांमध्ये १२ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच लागवडीच्या २ गुन्ह्यांमध्ये ३ व्यक्तींवर, वाहतुकीसंदर्भातील ३ प्रकरणांमध्ये ८ व्यक्तींवर, तर अमली पदार्थ सेवनाच्या २६ प्रकरणांमध्ये ३२ व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकूण अमली पदार्थांशी संबंधित ४० प्रकरणांमध्ये ५५ व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.”
Administration Ahilyanagar Drug Free Police Social
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026

Narmada Purana Katha Chikhli : ‘नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !

September 1, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.