Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Census : जनगणनेच्या कामात दिरंगाई चालणार नाही; जिल्हाधिकार्‍यांचे स्पष्ट निर्देश
अहिल्यानगर

Census : जनगणनेच्या कामात दिरंगाई चालणार नाही; जिल्हाधिकार्‍यांचे स्पष्ट निर्देश

Census : जनगणनेच्या कामात दिरंगाई चालणार नाही; जिल्हाधिकार्‍यांचे स्पष्ट निर्देश
Vinayak LandeBy Vinayak LandeApril 19, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260419 WA0021
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Census : अहिल्यानगर : आगामी राष्ट्रीय जनगणनेच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेले घरयादी गटनिश्चिती व सीमांकन तसेच नकाशे तयार करण्याचे काम दिलेल्या मुदतीत पूर्ण करावे, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या. जनगणनेसारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या कामात कोणतीही दिरंगाई चालणार नसून, आवश्यक तेथे सुटीच्या दिवशीही काम सुरू ठेवून २० एप्रिलच्या आत काम पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

Census
Census
जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी तसेच जनगणनेचे नोडल अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी तालुका व नगरपरिषदनिहाय प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. काही ठिकाणी काम संथगतीने सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने गती वाढवून वेळेत काम पूर्ण करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीस अनुपस्थित राहणारे तसेच कामात अपेक्षित प्रगती न दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्वरित सुधारणा करावी, अशा कडक सूचनाही त्यांनी दिल्या.
दरम्यान, जनगणनेसाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या प्रगणक व पर्यवेक्षकांची माहिती सीएमएमएस पोर्टलवर सोमवार सकाळपर्यंत अद्ययावत करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. माहिती भरताना लवकरच सेवानिवृत्त होणारे कर्मचारी किंवा वैद्यकीय रजेवर असलेल्यांची नावे वगळण्याची दक्षता घ्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
एकदा पोर्टलवरील माहिती अंतिम केल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही. त्यामुळे तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून माहितीची अचूकता तपासण्याचे निर्देश देण्यात आले.
यावेळी जनगणनेचे अधिकारी श्रीकांत बनकर यांनी पुढील प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. पर्यवेक्षकीय मंडळ तयार करताना एका प्रगणकाला साधारण ८०० ते ९०० लोकसंख्येचे समान काम दिले जाईल, याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच, प्रगणक व पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण २३ एप्रिलपासून सुरू होणार असून प्रशिक्षणाचा दर्जा राखण्यासाठी दोन तुकड्या एकत्र न करता प्रत्येक तुकडीचे स्वतंत्र प्रशिक्षण घेण्याचे निर्देश देण्यात आले. प्रशिक्षणापूर्वीच नियुक्तीपत्रे व ओळखपत्रे वितरित करण्यात यावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Administration Ahilyanagar Census Jilhadhikari Order
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026

Narmada Purana Katha Chikhli : ‘नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !

September 1, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.