Shri Indresh Upadhyay : अहिल्यानगर : कलीयुगाच्या प्रभावातून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाचे नामचिंतन हाच सर्वोत्तम मार्ग आहे, असे प्रतिपादन वृंदावन निवासी परम श्रद्धेय पूज्य इंद्रेश उपाध्याय यांनी अहिल्यानगरमध्ये केले. दरम्यान, दहीहंडी फोडत झालेल्या भव्य नंदोत्सवात हजारो भाविक भक्तिरसात चिंब झाले.

