Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Women’s Self-Help Groups : बचत गटांची ‘लोकल टू ग्लोबल’ झेप; अहिल्यानगरमध्ये विक्रमी कर्जवाटप
अहिल्यानगर

Women’s Self-Help Groups : बचत गटांची ‘लोकल टू ग्लोबल’ झेप; अहिल्यानगरमध्ये विक्रमी कर्जवाटप

Women's Self-Help Groups : बचत गटांची ‘लोकल टू ग्लोबल’ झेप; अहिल्यानगरमध्ये विक्रमी कर्जवाटप
Vinayak LandeBy Vinayak LandeApril 12, 2026No Comments3 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260412 WA0024
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Women’s Self-Help Groups : अहिल्यानगर : जिल्ह्यात महिला बचत गटांनी ‘लोकल टू ग्लोबल’ यशोगाथा साकारत १६८ कोटींच्या उद्दिष्टावर मात करून तब्बल ३५३ कोटी ९ लाख रुपयांचे विक्रमी कर्जवाटप केले. ३० हजारांहून अधिक बचत गटांशी ३ लाखांपेक्षा जास्त महिला जोडल्या गेल्या असून ‘लखपती दीदी’ अभियानातही अहिल्यानगर जिल्ह्याने आघाडी घेत महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.

Women's Self-Help Groups : बचत गटांची ‘लोकल टू ग्लोबल’ झेप; अहिल्यानगरमध्ये विक्रमी कर्जवाटप
Women’s Self-Help Groups : बचत गटांची ‘लोकल टू ग्लोबल’ झेप; अहिल्यानगरमध्ये विक्रमी कर्जवाटप
जिल्ह्यात सध्या ३० हजार ११२ बचत गट सक्रिय असून, त्यांच्याशी ३ लाख १५ हजारांहून अधिक महिला जोडल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे बँक कर्जवाटपासाठी १६८ कोटी २० लाख रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात तब्बल ३५३ कोटी ९ लाख रुपयांचे विक्रमी कर्जवाटप झाले आहे. ही झेप महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि महिला व बाल विकास विभाग यांच्या समन्वयातून शक्य झाली आहे. या आर्थिक पाठबळामुळे महिलांनी आत्मनिर्भरतेची नवी वाट निवडत ‘लोकल टू ग्लोबल’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे.
Women's Self-Help Groups : बचत गटांची ‘लोकल टू ग्लोबल’ झेप; अहिल्यानगरमध्ये विक्रमी कर्जवाटप
Women’s Self-Help Groups : बचत गटांची ‘लोकल टू ग्लोबल’ झेप; अहिल्यानगरमध्ये विक्रमी कर्जवाटप

‘लखपती दीदी’ उपक्रमात दमदार कामगिरी

केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘लखपती दीदी’ उपक्रमातही जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये १ लाख ८० हजार ४४४ महिलांना लखपती बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत १ लाख ३७ हजार २३४ महिलांनी हा टप्पा यशस्वीपणे गाठला आहे.
उद्योग, शेतीपूरक व्यवसायात महिलांनी
शासनाच्या प्रशिक्षण सुविधा व कर्जपुरवठ्याच्या बळावर महिलांनी विविध उद्योग क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. मसाले, पापड, लोणची, बेकरी उत्पादने, हस्तकला, मेणबत्त्या, रेडीमेड कपडे यासह दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, भाजीपाला उत्पादन अशा शेतीपूरक व्यवसायात महिलांनी आत्मविश्वासाने पाऊल टाकले आहे.

महिलांच्या उत्पादनांना आता व्यापक बाजारपेठ

दर्जेदार उत्पादन, स्थानिक चव, आकर्षक पॅकेजिंग आणि मार्केटिंगच्या जोरावर महिलांच्या उत्पादनांना आता व्यापक बाजारपेठ मिळत आहे. जिल्हास्तरावर प्रदर्शन, मेळावे आयोजित केले जात असून डिजिटल तंत्रज्ञानाचाही प्रभावी वापर सुरू आहे. उमेद अभियानांतर्गत तयार करण्यात आलेल्या ‘उमेद मार्ट’ ई-व्यापार प्लॅटफॉर्मवर जिल्ह्यातील सुमारे १८० उत्पादने ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

महिला उद्योजिकांची स्वतंत्र ओळख

अहिल्यानगर तालुक्यातील मीरा बेरड (स्वामी समर्थ गट), संगमनेरच्या शोभना सोनावणे (माई गट) व ज्योती संस्कर (मी उद्योजिका), पारनेरच्या शिल्पा बेलोटे (राधिका गट), श्रीगोंद्याच्या शीतल गवते, नगरच्या विनया मुळे (श्रीकृष्ण गट) व अश्विनी कोळपकर, श्रीरामपूरच्या ज्योती जगताप व साक्षी आघाडे (साई समृद्धी) तसेच अकोलेच्या शीला इदे (संधान गट) यांनी आपली उत्पादने ‘ब्रँड’ म्हणून विकसित करून बाजारपेठेत वेगळी ओळख निर्माण केली आहे.

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात मोलाची भूमिका

या आर्थिक प्रगतीमुळे पूर्वी कुटुंबात दुय्यम स्थान असलेल्या महिला आज निर्णयक्षम व नेतृत्वक्षम बनल्या आहेत. उत्पन्न वाढल्याने मुलांचे शिक्षण, कुटुंबाचे आरोग्य, पोषण आणि एकूण जीवनमान सुधारले आहे. स्वतः सक्षम व्हा आणि समाजालाही सक्षम करा’ हा संदेश देत महिला बचत गटांनी निर्माण केलेला हा आदर्श जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात मोलाची भूमिका बजावत आहे.
Ahilyanagar DigitalMarketplace SHGMovement UmedAbhiyan UmedMart Women's Self-Help Groups WomenEmpowerment
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

PM Surya Ghar Yojana : मोफत वीजेच्या दिशेने महाराष्ट्राची झेप; देशात अव्वल कामगिरी

June 2, 2026

LPG prices : महागाईचा स्फोट! एलपीजी दर दुप्पट; हॉटेल व्यवसाय अडचणीत

June 1, 2026

Rain Alert : मेघगर्जना, वादळी वारे अन् पाऊस; ३ जूनपर्यंत सावध राहा

May 31, 2026
Leave A Reply Cancel Reply

PM Surya Ghar Yojana : मोफत वीजेच्या दिशेने महाराष्ट्राची झेप; देशात अव्वल कामगिरी

June 2, 2026

LPG prices : महागाईचा स्फोट! एलपीजी दर दुप्पट; हॉटेल व्यवसाय अडचणीत

June 1, 2026

Rain Alert : मेघगर्जना, वादळी वारे अन् पाऊस; ३ जूनपर्यंत सावध राहा

May 31, 2026

Ahilyanagar News : ‘बालविवाह मुक्त’ अहिल्यानगरकडे दमदार वाटचाल; प्रशासनाच्या कारवाईमुळे ५५ विवाह रोखले

May 26, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.