Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Avdhut Dada Guru : दादागुरु महाराजांचे अहिल्यानगरीत प्रथमच आगमन; भक्तांसाठी पर्वणी
अहिल्यानगर

Avdhut Dada Guru : दादागुरु महाराजांचे अहिल्यानगरीत प्रथमच आगमन; भक्तांसाठी पर्वणी

Avdhut Dada Guru : दादागुरु महाराजांचे अहिल्यानगरीत प्रथमच आगमन; भक्तांसाठी पर्वणी
Vinayak LandeBy Vinayak LandeApril 9, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260409 WA0009
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Avdhut Dada Guru : अहिल्यानगर : मां नर्मदाचे परम उपासक आणि महायोगी, अवधूत संत श्री दादागुरु महाराज यांचे अहिल्यानगरमध्ये प्रथमच आगमन होत असल्याने भक्तगणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नर्मदा परिक्रमा आणि नर्मदा संवर्धनासाठी सतत पायी प्रवास करणारे दादा गुरुंच्या पावन सानिध्यात दर्शन व आशीर्वादाची पर्वणी भक्तांना लाभत आहे. तरी जास्तीत जास्त भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन गौरव हरबा व रुपेश हरबा यांनी केले आहे.

Avdhut Dada Guru : दादागुरु महाराजांचे अहिल्यानगरीत प्रथमच आगमन; भक्तांसाठी पर्वणी
Avdhut Dada Guru : दादागुरु महाराजांचे अहिल्यानगरीत प्रथमच आगमन; भक्तांसाठी पर्वणी
अवधूत संत दादागुरु महाराज यांचे अहिल्यानगर शहरात उद्या (ता. १०) रोजी सकाळी ११ वाजता आई तुळजाभवानी कॉलनी, सारसनगर येथे आगमन होणार आहे.
संत दादागुरु महाराज गेल्या पाच वर्षांपासून निराहार आहेत. त्यांनी अन्नाचा एक कणही खाल्लेला नाही. एवढेच नाही, तर गेल्या ५ वर्षांच्या कालावधीत त्यांनी लाखो किलोमीटर पायी प्रवासही केला आहे. ते तासन्तास पाण्याचा एक घोट न घेता प्रवचन करतात. एवढेच नाही, तर त्यांच्या वाणीत विलक्षण ऊर्जा जाणवते.
Avdhut Dada Guru : दादागुरु महाराजांचे अहिल्यानगरीत प्रथमच आगमन; भक्तांसाठी पर्वणी
Avdhut Dada Guru : दादागुरु महाराजांचे अहिल्यानगरीत प्रथमच आगमन; भक्तांसाठी पर्वणी
दरम्यान, नर्मदेची पायी परिक्रमा करून दिव्य अनुभूती घेतलेले साहित्यिक- पत्रकार मिलिंद चवंडके यांच्या प्रेरणेतून भगवान हरबा यांनी नर्मदा परिक्रमा करण्याचा निर्णय घेतला. नर्मदा परिक्रमा करत असताना निराहारी संत दादागुरु महाराज यांच्या सान्निध्यात चालण्याचे भाग्य मिलिंद चवंडके यांना लाभले होते. त्यांच्याच मार्गदर्शनामुळे भगवान हरबा यांचा दादागुरु महाराजांच्या व्यवस्थापनाशी संपर्क झाला. दादा गुरु महाराजांच्या दिव्य सान्निध्यात परिक्रमा पूर्ण केल्यानंतर नगर येथे येण्याची विनंती भगवान हरबा यांनी केली होती. ही विनंती दादागुरु महाराजांनी मान्य केल्याने त्यांचे नगर शहरात प्रथमच आगमन निश्चित झाले आहे.
या निमित्ताने दर्शन व सत्संगाचा महासोहळा आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास हिंदू धर्मरक्षक आमदार संग्राम जगताप यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. शहरातील नर्मदा भक्तांनी या सत्संग सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन भगवान हरबा यांनी केले आहे.
Ahilyanagar Avdhut Dada Guru Discourse Maharashtra Sangram Jagtap Spiritual Gathering
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Narmada Purana Katha Chikhli : ‘नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !

September 1, 2026

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.