Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Election Commission : राहुरी, बारामती पोटनिवडणुकीचा मुहूर्त ठरला; निवडणूक आयोगाची घोषणा
अहिल्यानगर

Election Commission : राहुरी, बारामती पोटनिवडणुकीचा मुहूर्त ठरला; निवडणूक आयोगाची घोषणा

Election Commission : राहुरी, बारामती पोटनिवडणुकीचा मुहूर्त ठरला; निवडणूक आयोगाची घोषणा
Vinayak LandeBy Vinayak LandeMarch 15, 2026Updated:March 15, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260315 WA0015
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Election Commission : राज्याचं लक्ष लागलेल्या राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीचा अखेर बिगुल वाजला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (ता. १५) तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पद्दुचेरी या ठिकाणच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. या निवडणुकीसोबत महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी व पुणे जिल्ह्यातील बारामती, अशा दोन्ही मतदारसंघाची २३ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. तर ४ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सामना रंगतो की निवडणूक बिनविरोध होते, हे पाहणे गरजेचे आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीचे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे १७ ऑक्टोबर रोजी निधन झाले होते. त्यामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. तसेच दुसरीकडे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारीला विमान दुर्घटनेत निधन झाले होते. यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बारामतीची विधानसभेची जागा पक्षाच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार लढवणार असल्याचे जाहीर केले होते. तर राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून अक्षय कर्डिले, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाकडून माजी आमदार प्राजक्त तनपुरे इच्छुक आहेत. विधानसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केली आहे.
Election Commission : राहुरी, बारामती पोटनिवडणुकीचा मुहूर्त ठरला; निवडणूक आयोगाची घोषणा
Election Commission : राहुरी, बारामती पोटनिवडणुकीचा मुहूर्त ठरला; निवडणूक आयोगाची घोषणा

अन्यथा निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार : मुख्यमंत्री

दरम्यान, आज राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ३९ वा पदवीदान समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी विधानसभा पोटनिवडणुकीबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राहुरी आणि बारामती या दोन्ही जागांवर होणारी निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आमची इच्छा आहे. यासाठी सर्वांनी एकमताने निर्णय घ्यावा. मात्र, जर ही निवडणूक आमच्यावर लादली गेली, तर आम्ही ती पूर्ण ताकदीने लढायला तयार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला.
@Ajit pawar Baramati Devendra Fadanvis Election Commission Prajakta Tanpure Rahuri Shivaji kardile Vidhansabha
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार

July 24, 2026

Shishu Sangopan Sanstha Dindi : विठ्ठलनामाच्या गजरात’ शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी

July 23, 2026

Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

July 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Ashadhi Wari Seva : पंढरीच्या वाटेवर शिधा नव्हे, भक्तीचा प्रसाद : मंगेश महाराज जळगांवकर यांचे गौरवोद्गार

July 24, 2026

Shishu Sangopan Sanstha Dindi : विठ्ठलनामाच्या गजरात’ शिशु संगोपन संस्थेच्या शाळांची भव्य दिंडी

July 23, 2026

Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

July 22, 2026

District Planning Committee : जिल्हा नियोजन समितीवर संदेश कार्लेंची वर्णी

July 11, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.