Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»महाराष्ट्र»Mahavitaran : महावितरण’ची स्मार्ट मीटर क्रांती; ग्राहकांच्या वीजबिलात भरघाेस सवलत
महाराष्ट्र

Mahavitaran : महावितरण’ची स्मार्ट मीटर क्रांती; ग्राहकांच्या वीजबिलात भरघाेस सवलत

Vinayak LandeBy Vinayak LandeFebruary 16, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260216 WA0027
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Mahavitaran : अहिल्यानगर : स्मार्ट मीटर असलेल्या महावितरणच्या घरगुती ग्राहकांना टीओडी सवलत लागू आहे. त्यामुळे नाशिक परिमंडळातील सव्वातीन लाख घरगुती ग्राहकांना एक महिन्यात तब्बल ३२ लाख रुपयांची भरघोस सवलत मिळाली आहे.

महावितरणच्या घरगुती ग्राहकांना सध्या लागू झालेल्या नवीन दरानुसार सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत दिवसा वापरलेल्या वीज वापरावर वीज बिलात टीओडी सवलत लागू आहे. नाशिक परिमंडळात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मंडळातील ३ लाख १८ हजार ८६१ स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना जानेवारी २०२६ या एका महिन्यात एकूण ३१ लाख ९३ हजार रुपयांची सवलत वीज बिलात मिळाली आहे.
जुलै २०२५ पासून नाशिक परिमंडळ अंतर्गत नाशिक मंडळात १ लाख ५४ हजार ११३ ग्राहकांना १ कोटी ३५ लाख ४४ हजार, मालेगांव मंडळात ३८ हजार ७७२ ग्राहकांना १८ लाख ४७ हजार तर अहिल्यानगर मंडळात १ लाख २५ हजार ९७६ ग्राहकांना ८८ लाख ६४ हजार असे एकूण नाशिक परिमंडळात ३ लाख १८ हजार ८६१ ग्राहकांना सवलत मिळाली आहे.
महावितरणकडून राज्यातील घरगुती वीज ग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी मीटरच्या माध्यमातून नवा अध्याय सुरू झाला आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील ५ वर्षांसाठी निश्चित केलेल्या वीजदरामध्ये घरगुती ग्राहकांना दिवसाच्या वीज वापरामध्ये प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपया सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार घरगुती ग्राहकांना टीओडीप्रमाणे वीज दरात सवलत मिळण्याचा प्रत्यक्ष फायदा १ जुलैपासून सुरु झाला असून महावितरणकडून हे स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहेत.
स्मार्ट टीओडी मीटरचे मासिक रीडिंग स्वयंचलित होणार आहे. कोणताही मानवी हस्तक्षेप नसल्याने बिलिंगच्या तक्रारी जवळपास संपुष्टात येणार आहे. तसेच घरात किती वीज वापरली याची माहिती सर्व माहिती संबंधित ग्राहकाच्या मोबाईल ॲपवर उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे योग्य वीज वापराचे नियोजन करता येईल. यासह ज्यांच्याकडे छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प आहे त्यातून वापरलेल्या व शिल्लक राहिलेल्या विजेचा लेखाजोगा ठेवणे हे या स्मार्ट टीओडी मीटरचे प्रमुख फायदे आहेत.

‘यांना’च मिळणार सवलतीचा लाभ

महावितरणकडून स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहे. त्यामुळे या नव्या मीटरचा कोणताही आर्थिक भुर्दंड ग्राहकांवर नाही. स्मार्ट टीओडी मीटर हे प्रीपेड नाही तर पोस्टपेड आहे. म्हणजे आधी वीज वापरा मग मासिक बिल भरा अशी सध्याची मासिक बिलिंग पद्धत पुढेही राहणार आहे. घरगुती ग्राहकांकडे टीओडी मीटर असल्याशिवाय त्यांना या सवलतीचा लाभ घेता येणार नाही.

 

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

IMD weather update : विजांच्या कडकडाटासह काही भागात पावसाच्या सरी बरसणार; हवामान खात्याचा अंदाज

April 18, 2026

Shri Indresh Upadhyay : श्रीकृष्णाचं नामचिंतन हाच मुक्तीचा महामार्ग; इंद्रेश उपाध्याय यांचे प्रतिपादन

April 16, 2026

Dr. Babasaheb Ambedkar : बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच राष्ट्राचा खरा आधार ; जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन

April 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

IMD weather update : विजांच्या कडकडाटासह काही भागात पावसाच्या सरी बरसणार; हवामान खात्याचा अंदाज

April 18, 2026

Shri Indresh Upadhyay : श्रीकृष्णाचं नामचिंतन हाच मुक्तीचा महामार्ग; इंद्रेश उपाध्याय यांचे प्रतिपादन

April 16, 2026

Dr. Babasaheb Ambedkar : बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच राष्ट्राचा खरा आधार ; जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन

April 14, 2026

Women’s Self-Help Groups : बचत गटांची ‘लोकल टू ग्लोबल’ झेप; अहिल्यानगरमध्ये विक्रमी कर्जवाटप

April 12, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.