Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»milk adulteration : ‘या’ जिल्ह्यात दुधाच्या नावाखाली जीवघेणी भेसळ; लाखोंचा मुद्देमाल जप्त
अहिल्यानगर

milk adulteration : ‘या’ जिल्ह्यात दुधाच्या नावाखाली जीवघेणी भेसळ; लाखोंचा मुद्देमाल जप्त

milk adulteration : 'या' जिल्ह्यात दुधाच्या नावाखाली जीवघेणी भेसळ; लाखोंचा मुद्देमाल जप्त
Vinayak LandeBy Vinayak LandeFebruary 15, 2026Updated:February 16, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260215 WA0017
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

milk adulteration : अहिल्यानगर : जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथील रसायनापासून बनावट दूध तयार करणाऱ्या दूध संकलन केंद्रावर स्थानिक गुन्हे शाखेने नुकताच छापा टाकला. या कारवाईत तब्बल 17 लाख 32 हजार 816 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पथक दूध भेसळ प्रकरणांचा तपास करत होते. त्यावेळी रामदास नवनाथ उबाळे (रा. फक्राबाद, ता. जामखेड) हा त्याच्या दूध संकलन केंद्रात रसायनापासून दूध तयार करून ते संकलित दुधात मिसळत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांच्या उपस्थितीत छापा टाकण्यात आला. त्यावेळी समीर कमरुद्दीन शेख (वय 30, रा. उंबरे, ता. राहुरी), आफताब कलीम शेख (वय 28, रा. राहुरी) आणि रामदास नवनाथ उबाळे (वय 46, रा. फक्राबाद, ता. जामखेड) हे तिघे मिळून आढळून आले.

असा आढळला साठा

या छाप्यात 1198 लीटर पॅराफिन केमिकल, 300 किलो पांढरी पावडर आणि 320 लीटर बनावट दूध असा साठा आढळला. या रसायनापासून तब्बल 24 हजार लीटर बनावट दूध तयार करता येत असल्याची माहिती आरोपींनी दिली. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी हे दूध मानवी आरोग्यास अत्यंत घातक असल्याचे सांगितले. या कारवाईत 2 लाख 39 हजार 600 रुपयांचे पॅराफिन ऑईल, 81 हजार 56 रुपयांची पावडर, 12 हजार 160 रुपयांचे बनावट दूध आणि 14 लाख रुपयांची दोन पिकअप वाहने असा एकूण 17 लाख 32 हजार 816 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.

Jamkhed Milk milk adulteration Police Raid
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

PM Surya Ghar Yojana : मोफत वीजेच्या दिशेने महाराष्ट्राची झेप; देशात अव्वल कामगिरी

June 2, 2026

LPG prices : महागाईचा स्फोट! एलपीजी दर दुप्पट; हॉटेल व्यवसाय अडचणीत

June 1, 2026

Rain Alert : मेघगर्जना, वादळी वारे अन् पाऊस; ३ जूनपर्यंत सावध राहा

May 31, 2026
Leave A Reply Cancel Reply

PM Surya Ghar Yojana : मोफत वीजेच्या दिशेने महाराष्ट्राची झेप; देशात अव्वल कामगिरी

June 2, 2026

LPG prices : महागाईचा स्फोट! एलपीजी दर दुप्पट; हॉटेल व्यवसाय अडचणीत

June 1, 2026

Rain Alert : मेघगर्जना, वादळी वारे अन् पाऊस; ३ जूनपर्यंत सावध राहा

May 31, 2026

Ahilyanagar News : ‘बालविवाह मुक्त’ अहिल्यानगरकडे दमदार वाटचाल; प्रशासनाच्या कारवाईमुळे ५५ विवाह रोखले

May 26, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.