Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Police : गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर कत्तल; ‘या’ जिल्ह्यातून आठ जण हद्दपार
अहिल्यानगर

Police : गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर कत्तल; ‘या’ जिल्ह्यातून आठ जण हद्दपार

Police : गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर कत्तल; 'या' जिल्ह्यातून टोळी तडीपार
Vinayak LandeBy Vinayak LandeFebruary 11, 2026Updated:February 11, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
Shirdi Crime : साईनगरीत हायटेक देहव्यापाराचा पर्दाफाश; चार महिलांची सुखरूप सुटका
Shirdi Crime : साईनगरीत हायटेक देहव्यापाराचा पर्दाफाश; चार महिलांची सुखरूप सुटका
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Police : अहिल्यानगर : गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर कत्तल व गोमांस वाहतूक करणाऱ्या राहता तालुक्यातील ममदापूर येथील आठ जणांच्या टोळीला अहिल्यानगर जिल्ह्यातून तब्बल १८ महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार हद्दपार केलेल्या प्रकरणात टोळी प्रमुख फैजान जब्बार कुरेशी (शेख) (वय २५, रा. कुरेशी मोहल्ला, ममदापूर, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) याच्यासह मुन्तजीर मुनिर कुरेशी (वय २३), अब्दुलकरीम अमिर कुरेशी (वय ५२), मुनिर अमिर कुरेशी (वय ५६), जब्बार हसन कुरेशी (शेख) (वय २३), नाजीम आयुब कुरेशी (वय ३३), वसीम आयुब कुरेशी (वय २७) आणि रिजवान महेबुब कुरेशी (वय २५) यांचा समावेश आहे.
या हद्दपार केलेल्या टोळीवर मागील पाच वर्षात खुनाचा प्रयत्न, गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर वाहतूक व कत्तल तसेच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणारे विविध गुन्हे केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा न झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिणामी, कोणीही उघडपणे तक्रार किंवा साक्ष देण्यासाठी पुढे येत नव्हते.
या पार्श्वभूमीवर लोणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार संबंधितांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग अमोल भारती यांनी चौकशी करून अहवाल सादर केल्यानंतर सखोल तपासाअंती संबंधित आठही जणांना अहिल्यानगर जिल्ह्यातून १८ महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले.

नागरिकांच्या सुरक्षेत वाढ

या कारवाईमुळे राहाता व लोणी परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Ahilyanagar Bovine animals Citizen Exile Police Rahata Report
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan : नागरदेवळ्यात मातृत्वाला आरोग्याची ढाल; ९ गर्भवती ‘हाय रिस्क’

September 9, 2026

Narmada Purana Katha Chikhli : ‘नर्मदे हर हर’च्या गजराने जागृत हनुमान मंदिर भक्तिरसात न्हाले !

September 1, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.