Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Ahilyanagar : ‘ब्लॅक फिल्म’विरोधात पोलिसांची कारवाई; ४५८ वाहनांना ठोठावला लाखोंचा दंड
अहिल्यानगर

Ahilyanagar : ‘ब्लॅक फिल्म’विरोधात पोलिसांची कारवाई; ४५८ वाहनांना ठोठावला लाखोंचा दंड

Ahilyanagar : 'ब्लॅक फिल्म'विरोधात पोलिसांची कारवाई; ४५८ वाहनांना ठोठावला लाखोंचा दंड
Vinayak LandeBy Vinayak LandeFebruary 5, 2026Updated:February 5, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260205 WA0005
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Ahilyanagar : ​अहिल्यानगर : बेकायदेशीरपणे लावण्यात येणाऱ्या ‘ब्लॅक फिल्म’विरोधात जिल्ह्यात प्रादेशिक परिवहन विभागाने पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने विशेष मोहीम राबवली. 28 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात आलेल्या मोहिमेत एकूण 2 हजार 21 वाहनांची तपासणी करण्यात आली. यात नियमांचा भंग केलेल्या 458 वाहनांवर कठोर कारवाई करण्यात आली असून, एकूण 6 लाख 46 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके यांनी दिली.

वाहन तपासणीच्या ​या मोहिमेत सर्व वायुवेग पथके, तसेच जिल्ह्यातील 14 तालुका पथकांमधील मोटार वाहन निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षकांनी सहभाग घेतला. या पथकांनी एकूण 2021 वाहनांची कसून तपासणी केली.
वाहन तपासणीदरम्यान 458 वाहनांवर बेकायदेशीर ब्लॅक फिल्म आढळल्या. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. आकारण्यात आलेल्या 6 लाख 46 हजार रुपये दंडापैकी 37 हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. तसेच संबंधित वाहनांवरील ब्लॅक फिल्म्स काढून टाकण्यात आल्या आहेत.

​या विशेष मोहिमेत ब्लॅक फिल्म व्यतिरिक्त इतर बाबींचीही पडताळणी करण्यात आली. यात वैध विमा नसलेली वाहने, नोंदणी प्रमाणपत्र किंवा वाहन परवाना नसणे, वाहन चालवण्याचा परवाना नसणे, वाहनांतील दिव्यांमधील त्रुटी व वायू प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली.
​
प्रशासनाचे आवाहन

“जिल्ह्यातील वाहन मालक व चालकांनी मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार वाहनांची समोरील (दर्शनी) काच व खिडक्यांच्या काचांवर ब्लॅक फिल्म बसवू नये. कायद्यातील अटी व शर्तींचे तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सहकार्य करावे,” असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी केले आहे.
Ahilyanagar Crime Penalty Police RTO Vehicle
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Tree plantation : ‘जय बाबाजी’चा वाराणसीत डंका; गंगेच्या साक्षीने वृक्षारोपणात शानदार कामगिरी

March 2, 2026

Narmada puran: ‘नर्मदा पुराणवर’ मराठीत प्रवचन; मिलिंद महाराज चवंडके देशात पहिले

February 18, 2026

Mahavitaran : महावितरण’ची स्मार्ट मीटर क्रांती; ग्राहकांच्या वीजबिलात भरघाेस सवलत

February 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

Tree plantation : ‘जय बाबाजी’चा वाराणसीत डंका; गंगेच्या साक्षीने वृक्षारोपणात शानदार कामगिरी

March 2, 2026

Narmada puran: ‘नर्मदा पुराणवर’ मराठीत प्रवचन; मिलिंद महाराज चवंडके देशात पहिले

February 18, 2026

Mahavitaran : महावितरण’ची स्मार्ट मीटर क्रांती; ग्राहकांच्या वीजबिलात भरघाेस सवलत

February 16, 2026

milk adulteration : ‘या’ जिल्ह्यात दुधाच्या नावाखाली जीवघेणी भेसळ; लाखोंचा मुद्देमाल जप्त

February 15, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.