Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»अहिल्यानगर»Chhatrapati Shivaji Maharaj Charitra Katha : शिवजन्म ते हिंदवी स्वराज्य… अहिल्यानगरात उलगडणार शिवचरित्राचे पर्व!
अहिल्यानगर

Chhatrapati Shivaji Maharaj Charitra Katha : शिवजन्म ते हिंदवी स्वराज्य… अहिल्यानगरात उलगडणार शिवचरित्राचे पर्व!

श्री रामकृष्ण सेवा ट्रस्टच्या वतीने नवीन टिळक रोडवरील नंदनवन लॉन्स येथे २९ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हा सोहळा रंगणार आहे.
Vinayak LandeBy Vinayak LandeSeptember 18, 2026No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260918 WA0007
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Chhatrapati Shivaji Maharaj Charitra Katha : अहिल्यानगर : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अहिल्यानगर शहरात प्रथमच श्री छत्रपती शिवाजी महाराज चरित्र कथा सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. श्री रामकृष्ण सेवा ट्रस्टच्या वतीने नवीन टिळक रोडवरील नंदनवन लॉन्स येथे २९ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हा सोहळा रंगणार आहे. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे महासचिव प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून शिवचरित्राचे निरूपण होणार असून, ३ ऑक्टोबर रोजी होणारा वैदिक पद्धतीचा शिवराज्याभिषेक सोहळा हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरणार आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Charitra Katha : शिवजन्म ते हिंदवी स्वराज्य... अहिल्यानगरात उलगडणार शिवचरित्राचे पर्व!
Chhatrapati Shivaji Maharaj Charitra Katha : शिवजन्म ते हिंदवी स्वराज्य… अहिल्यानगरात उलगडणार शिवचरित्राचे पर्व!

मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता राजेशाही थाटात या कथा सोहळ्याचा प्रारंभ होईल. २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान दररोज दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत कथा होणार असून, ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत सांगता होईल.

पहिल्या दिवशी शिवजन्मपूर्व काळ, तत्कालीन परिस्थिती, शिवजन्म, स्वराज्याची शपथ आणि संतकार्य यांचे निरूपण होईल. दुसऱ्या दिवशी कान्होजी जेधे, जावळीचा वेढा, प्रतापगडची युद्धनीती आणि अफझलखान वध यांचा इतिहास उलगडला जाणार आहे.

तिसऱ्या दिवशी पावनखिंडीतील शौर्य, चाकणचा रणसंग्राम, लाल महालावरील स्वारी, शाहिस्तेखानावर मात, प्रथम आरमार स्वारी, पुरंदरचा वेढा व तह हे प्रसंग कथेतून मांडले जातील. चौथ्या दिवशी आग्रा येथून सुटका, छत्रसाल बुंदेला यांना प्रेरणा आणि सिंहगडावरील तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा सांगितली जाणार आहे.

३ ऑक्टोबरच्या अंतिम दिवशी महाराजांचे विजय पर्व, शिवराज्याभिषेक, स्वराज्याची स्थापना आणि भारतव्यापी हिंदवी साम्राज्य या विषयांवर कथा निरूपण होईल. याच दिवशी होणारा वैदिक पद्धतीचा शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाचा विशेष आकर्षणबिंदू ठरणार आहे.

या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष नंदनवन उद्योग समूहाचे संजय जाधव असून, मंचचे प्रायोजक शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन आहेत. ३ ऑक्टोबरच्या छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याचे यजमानपद सुमित संतोष वर्मा भूषविणार आहेत.

सोहळ्याच्या नियोजनासाठी संपर्क व समन्वय, मंडप व मंच व्यवस्था, आरती व्यवस्था, निमंत्रण पत्रिका वितरण, प्रचार-प्रसार आणि राज्याभिषेक उत्सव आदी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जय्यत तयारी सुरू आहे.

शिवशाहीच्या इतिहासात योगदान देणाऱ्या अहिल्यानगर शहरात प्रथमच होत असलेल्या या शिवचरित्र कथा सोहळ्यातून युवा पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, विचार, शौर्य आणि स्वराज्याची प्रेरणा जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. नगरकरांनी, विशेषतः युवकांनी, दररोजच्या कथा निरूपणाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन श्री रामकृष्ण सेवा ट्रस्टचे अध्यक्ष नंदलाल मणियार यांच्यासह ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Ahilyanagar Chhatrapati Shivaji Maharaj Charitra Katha Maharashtra Shiv Charitra Swami Govind Giri Maharaj
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Nath Panth Dnyan Ganga : नाथपंथाच्या ज्ञानगंगेत डुबकी म्हणजे परम भाग्य !

September 13, 2026

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

Chhatrapati Shivaji Maharaj Charitra Katha : शिवजन्म ते हिंदवी स्वराज्य… अहिल्यानगरात उलगडणार शिवचरित्राचे पर्व!

September 18, 2026

Nath Panth Dnyan Ganga : नाथपंथाच्या ज्ञानगंगेत डुबकी म्हणजे परम भाग्य !

September 13, 2026

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.