Close Menu
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Jansatta Times
Home»महाराष्ट्र»Nath Panth Dnyan Ganga : नाथपंथाच्या ज्ञानगंगेत डुबकी म्हणजे परम भाग्य !
महाराष्ट्र

Nath Panth Dnyan Ganga : नाथपंथाच्या ज्ञानगंगेत डुबकी म्हणजे परम भाग्य !

सर्व संप्रदायांचे उगमस्थान असलेला नाथ संप्रदाय कलीयुगातील मानवाला संकटमुक्तीचा आनंद आणि शाश्वत समाधान देणारा आहे.
Vinayak LandeBy Vinayak LandeSeptember 13, 2026No Comments3 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Follow Us
WhatsApp
IMG 20260907 WA0006
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

Nath Panth Dnyan Ganga : पुणे : “नाथपंथाची ज्ञानगंगा लाभणे हे परम भाग्य आहे. या ज्ञानगंगेच्या तीरापर्यंत येऊनही तिचा लाभ न घेणारे अभागी ठरतात,” असे प्रतिपादन नाथ संप्रदायाचे प्रवचनकार मिलिंद महाराज चवंडके यांनी केले.

Nath Panth Dnyan Ganga : नाथपंथाच्या ज्ञानगंगेत डुबकी म्हणजे परम भाग्य !
Nath Panth Dnyan Ganga : नाथपंथाच्या ज्ञानगंगेत डुबकी म्हणजे परम भाग्य !

सोमवार पेठेतील नरपतगिरी चौक येथील श्री संत गाडगे महाराज आश्रमात मंगळवार पेठेतील श्री देवेंद्रनाथ मठीच्या श्रावण संकल्प सांगता सोहळ्यानिमित्त आयोजित सत्संगात ते बोलत होते. पवित्र श्रावण महिन्यात महिनाभर सुरू असलेल्या जप, पारायण, अखंड धुनी, शोभायात्रा आणि सामूहिक यज्ञ सोहळ्याचा भक्तिमय वातावरणात समारोप झाला.

https://jansattatimes.com/wp-content/uploads/2026/09/VID-20260913-WA0007.mp4

मठाधिपती प.पू. श्री. प्रेमेंद्रनाथ तथा प्रशांतभाऊ चिंचोलकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. “श्री देवेंद्रनाथ मठीतर्फे श्रावण महिन्यात विविध धार्मिक उपक्रमांची परंपरा गेल्या २७ वर्षांपासून अखंड सुरू आहे,” अशी माहिती त्यांनी दिली. विद्या शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

व्दैताव्दैत पीठाधीश्वर प.पू. श्री. गहनेंद्रनाथ तथा जालिंदर बोखारे यांच्या दिव्य सान्निध्यात हा सोहळा पार पडला. नीतेश बांदल व प्रीती बांदल यांनी यजमानपद भूषविले. पौरोहित्य सौरभ पिसे, योगेश उंडाळे व चेतन माळी यांनी केले. यावेळी विरुपाक्षनाथ तथा तात्या सोनवणे, उमाकांत चिंचोलकर (वैराग), गजानन घोरपडे यांच्यासह विविध मठांचे मठाधिपती व नाथभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Nath Panth Dnyan Ganga : नाथपंथाच्या ज्ञानगंगेत डुबकी म्हणजे परम भाग्य !
Nath Panth Dnyan Ganga : नाथपंथाच्या ज्ञानगंगेत डुबकी म्हणजे परम भाग्य !

‘नाथ कार्य हाच जीवनाचा ध्यास’

मिलिंद महाराज चवंडके म्हणाले, “सर्व संप्रदायांचे उगमस्थान असलेला नाथ संप्रदाय कलीयुगातील मानवाला संकटमुक्तीचा आनंद आणि शाश्वत समाधान देणारा आहे.” सद्गुरू श्री देवेंद्रनाथ हे आर्किटेक्ट असूनही नाथ कार्याशी पूर्णपणे समरस झाले होते. मढी येथील प.पू. श्री कानिफनाथ संजीवन समाधी मंदिरात वीज व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यापासून ते गड सुशोभीकरण, मूर्ती प्रतिष्ठापना, हवन आणि अमावस्या वारीची परंपरा निर्माण करण्यापर्यंत त्यांनी नाथ सेवेला मोठे योगदान दिले. देवेंद्रनाथांनी मढीत शिवयाग करून नाथ कार्याला गती दिली. प्रवचनांच्या माध्यमातून ज्ञानयज्ञ आणि हठयोग साधना शिबिरांच्या माध्यमातून साधक घडविले. त्यांच्या शिष्यांनीही नाथ कार्याची परंपरा पुढे नेली. प.पू. श्री देवेंद्रनाथ आणि प.पू. श्री जितेंद्रनाथ यांच्या दिव्य सान्निध्यामुळे गर्भगिरीतील पहिले नाथ संमेलन माझ्या हातून झाले. ‘श्रीकानिफनाथ माहात्म्य’ या रसाळ ओवीबद्ध पोथीची रचनाही करवून घेण्यात आली. आंतरराष्ट्रीय नाथ संमेलनात निमंत्रित वक्ता म्हणून मिळालेला सन्मान हा नाथकृपाच आहे,” असेही त्यांनी सांगितले. कोरोना महामारीच्या काळात श्री कानिफनाथ देवस्थानच्या माध्यमातून सामाजिक, वैद्यकीय व गोरक्षण क्षेत्रात मोठे कार्य झाले. गरजूंपर्यंत महाअन्नदान सेवा पोहोचविण्यासह मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. निफाड येथे नाथ संमेलनासाठी चार-पाच महिने घेतलेले अथक परिश्रम आणि प.पू. श्री देवेंद्रनाथांच्या शिष्यांनी सलग ३६ तास केलेली हवन सेवा यांचाही त्यांनी उल्लेख केला.

https://jansattatimes.com/wp-content/uploads/2026/09/VID-20260907-WA00091.mp4

नाथांचा नित्य अनुभव : मिलिंद महाराज

“नाथ पावलोपावली माझ्यासोबत आहेत. माझे घर सांभाळत माझी काळजी घेत आहेत. नाथ ठरवतील तेच भाविक माझ्या जवळ येतात, याचा अनुभव मला नित्य येतो,” असे सांगताना मिलिंद महाराजांनी विविध अनुभव व उदाहरणे कथन केली.

सेवाभावातून सोहळ्याला भक्तिमय रंग

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक नाथभक्तांनी विविध सेवा बजावल्या. स्वागत सेवा प्रतिभा चिंचोलकर, प्रज्वल चिंचोलकर, प्रमोद चुंबळकर व अरुण पिसे यांनी केली. सुप्रिया मुरमुरे व शलाका हिरवे यांनी आकर्षक रांगोळी सजविली. मोहन झेंडे यांनी शास्त्रोक्त हवनकुंड तयार केले. पूजा मांडणी विशाल कुंभार व विजय पतंगे यांनी, तर व्यासपीठ सजावट सौरभ पिसे, ऋषिकेश सूर्यवंशी व तुषार मुरमुरे यांनी केली. शोभायात्रेचे नियोजन रामचंद्र पतंगे, अभय पवार, विजय कोठारी, प्रदीप चिंचोलकर, संतोष हेंद्रे व शुभम पाटील यांनी केले. स्वयंपाकगृह, भोजनप्रसाद, भजन व इतर सेवांमध्ये नाथभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या विविध सेवांमध्ये अमित पतंगे, प्रसाद चिंबळकर, शुभम पाटील, पार्थ भुजबळ, कामिनी वायकर, सीमा हेंद्रे, रेवा संगम, ऋचा हेंद्रे, चेतना माळी, श्लोक महाडिक, स्वराली चिंबळकर यांच्यासह अनेक नाथभक्तांनी योगदान दिले. उत्साह, सेवाभाव आणि ‘नाथ’ नामस्मरणाने भारलेल्या भक्तिमय वातावरणात श्री देवेंद्रनाथ मठीच्या श्रावण संकल्प सांगता सोहळ्याची सांगता झाली.

Devendranath Math Milind Maharaj Chawandke Nath Bhakti Nath Panth Dnyan Ganga Pune
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Vinayak Lande

Related Posts

Chhatrapati Shivaji Maharaj Charitra Katha : शिवजन्म ते हिंदवी स्वराज्य… अहिल्यानगरात उलगडणार शिवचरित्राचे पर्व!

September 18, 2026

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

Chhatrapati Shivaji Maharaj Charitra Katha : शिवजन्म ते हिंदवी स्वराज्य… अहिल्यानगरात उलगडणार शिवचरित्राचे पर्व!

September 18, 2026

Nath Panth Dnyan Ganga : नाथपंथाच्या ज्ञानगंगेत डुबकी म्हणजे परम भाग्य !

September 13, 2026

Yellow Alert : अहिल्यानगरवर तीन दिवस पावसाचे सावट; ‘येलो अलर्ट’ जारी!

September 11, 2026

Illegal Mawa Production : पारनेरमध्ये मावा निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; एलसीबीची धडक कारवाई

September 10, 2026


 

Jansattatimes.com हे दररोजच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे वृत्तांकन करणारे न्यूज वेब पोर्टल आहे.या पोर्टल वरील बातम्यांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात काही तक्रार असल्यास आमच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.इमेल :jansattatimes99@gmail.com

प्रकाशक/संपादक विनायक लांडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  9405005688

Registration No- UDYAM-MH-01-0280071

 

Jansatta Times
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • अहिल्यानगर
  • महाराष्ट्र
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राजकारण

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.